অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तिवर

तिवर

तिवर : (हि. बिना; गु. तवरियान; क. इपती; सं. तुवरा; इं. व्हाइट मॅनग्रोव्ह; लॅ. ऑव्हिसेनिया ऑफिसिनॅलीस; कुल–व्हर्बिनेसी). भारतात सर्वत्र शिवाय श्रीलंका, ब्रम्हदेश, अंदमान व निकोबार येथील समुद्रकिनारी व दलदलीत वाढणारे हे सदापर्णी झुडूप ९–१२ मी. पर्यंत उंच वाढते. याला हवेकडे वाढणारी श्वसनमुळे असतात. पाने (४–७·५ सेंमी.), साधी, साधारण लांबट, वर चकचकीत, खाली पांढुरकी व समोरासमोर असतात. फुले लहान, बिनदेठाची, पिवळी व सुगंधी असून फांद्यांच्या टोकांस, गुच्छाकृती फुलोऱ्यात एप्रिल–जूनमध्ये येतात. त्यांची संरचना आणि इतर सामान्य शारीरिक लक्षणे व्हर्बिनेसी अगर साग कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. बोंड अंडाकृती व टोकदार; बी एकच असून फळातच रुजून प्राथमिक मुळाचा भाग (अपत्यजनन) बाहेर येतो

[ वनश्री (कच्छ वनश्री)]. गळवे पिकण्यास अपक्व बियांचे पोटीस करून बांधतात. साल तुरट, स्तंभक (आकुंचन करणारी); मूळ वाजीकर (कामोत्तेजक); पाने गुरांना चारण्यास आणि लाकूड जळणाकरिता वापरतात. सालीतील टॅनिनामुळे ती कातडी कमाविण्यास उपयुक्त असते. लाकडाची राख कपडे साफ करण्यास आणि चित्रकाराच्या रंगांत मिसळून त्यांचा चिकटपणा वाढविण्यास वापरतात.

लेखक: नवलकर, भो. सुं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 11/24/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate