অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निवर

निवर

निवर

(​निवार; ​हिं. ​हिज्जल; सं. समुद्रफल, नीप; इं. इं​डियन ओक; लॅ. बॅ​रिंग्टो​निया रॅसिमोजा; कुल-ले​सिथिडेसी). सु. पंधरा मी. उंचीचा हा सदापर्णी वृक्ष भारतात प​श्चिम ​किनाऱ्यावर कोकण ते त्रावणकोरपर्यंत शिवाय सुंदरबन, आसाम, अंदमान बेटे इ. प्रदेशांत बहुधा नद्यांच्या आ​णि जलप्रवाहांच्या काठाने आढळतो; तसेच तो ‌‌‌मले​शियात आ​णि पॅ​सिफिक बेटातही आढळतो. ⇨ इंगळीआ​णि मुदिला या जातींचा समावेशही निवरच्या वंशात केला आहे.त्या वंशात सु. चाळीस जाती असून त्यांपैकी भारतात नऊ आढळतात.

पूर्वी या वंशाचा समावेश ​⇨मिर्टेसी कुलात आ​णि ​मिर्टेलीझ गणात (जंबुल कुलात व जंबुल गणात) करीत; ‌‌‌परंतु याच्या जातीतील पानांत ​द्विसंलग्न⇨ वाहक वृंद व तैलप्र​पिंड (तेलाच्या ग्रंथी) नसतात; या कारणांमुळे आ​णि इतर काही लक्षणांमुळे याचा समावेश हल्ली काहींना ⇨लेसिथिडेसी कुलात (समुद्रफुल कुलात), तर काहींना बॅ​रिंग्टो​निएसी कुलात [→ मिर्टेलीझ] केलेला आहे. ‌‌‌​निवाराच्या खोडावर गर्द करड्या रंगाची साल असते. पाने साधी, इंगळीच्या पानांपेक्षा मोठी (१०−३० X ५−१० सेंमी.), पातळ, आयत-कुंतसम (भाल्यासारखी) काहीशी लांबट टोकाची, गुळगुळीत, ​किंचीत दातेरी व एकाआड एक असून त्यांत प्र​पिंड ​बिंदू (ग्रं​थियुक्त ​ठिपके) नसतात. फांद्या काहीशा लोंबत्या व पाने ‌‌‌त्यांच्या टोकांशी गर्दीने येतात.

या वृक्षाला पावसाळ्यात, ३०−४० सेंमी. लांबीच्या लोंबत्या मंजरीवर सु. २·५−५ सेंमी. व्यासाची लालसर वा गुलाबी फुले येतात. त्या वेळी तो शो​भिवंत ​दिसतो. म्हणून कोठे कोठे बागेत लावलेला आढळतो; त्यापासून सावलीही ​मिळते. फुलात संदेल २−४ दीर्घकाळ ​टिकणारी व पाकळ्या चार, ‌‌‌गुलाबी ​किंवा लाल; केसरदले​किर​मिजी, अनेक तळाशी जुळलेली व जननक्षम (कार्यक्षम); ​किंजपुट अध:स्थ [→फूल]; ‌‌‌आठळीफळ लंबगोल, ​चिवट सालीचे, तळाशी गोलसर, सु. ५−७ X ३−५ सेंमी.; पण काहीसे चौकोनी (दीर्घकाल ​टिकणाऱ्या) संर्वताने व्यापलेले. बी एकच, २५ सेंमी. लांब व ​पिठूळ. ​बियांत ३% सॅपोनीन व फळात बॅ​रिंग्टोनीन हे स्फटिकी सॅफोनीनही असते.

पूर्व मले​शियातील लोक कोवळी पाने कच्ची ​किंवा ​शिजवून खातात; तसेच आ​दिवासी लोक ​बियांतील ​पिठूळ पदार्थही खातात. फळ कफोत्सारक (कफ काढून टाकणारे) आणि दमा व अ​तिसारावर‌‌‌गुणकारी असते. फळातील मगज (गर) दुधातून कावीळ व इतर ​पित्त ​विकारांवर देतात. साल, मूळ, कुटलेली फळे व ​बिया मत्स्य​विष म्हणून वापरतात. खोडावरील करड्या सालीत १८% टॅनीन असते; ​तिचा अर्क कृ​मिनाशकअसून ​फिलिपीन्समध्ये तो रानडुकरे मारण्यास वापरतात; फळे, मुळे व ​बिया यांचाही औषधी उपयोग करतात. ‌‌‌मूळ शीतक (थंडावा देणारे) आ​णि रेचक असते. ​बियांतील तेल ​दिव्याक​रिता वापरतात.

सालीचा अल्कोहॉलातील वा गरम पाण्यात काढलेला अर्क ​लिंबावरच्या माव्यावर (किडीवर) मारक ठरतो; यात सालीचे प्रमाण २−२·५% असलेले पुरते. बहुधा हा वृक्ष ओलसर जागी वाढतो; परंतु समुद्र​किनाऱ्यावरच्या दलदलीत नसतो; ‘नीप’ ‌‌‌या नावाने पा​णिनी यांच्या अष्टाध्यायीत उपयुक्त वृक्ष या सदरात व महाभारतातही याचा उल्लेख आला आहे. बृहत्सं​हितेत ​विहिरीच्या कडेला हा वृक्ष लावावा असे सां​गितले आहे. चरकसं​हितेत फलवर्गात नीपाचा अंतर्भाव अनेक फलवृंक्षात (उदा., खजूर, नारळ, बोर, बेल इ.) केलेला आढळतो; तसाच सुश्रुतसंहितेंतही ‌‌‌याचा उल्लेख आढळतो.

 

पहा :लेसिथिडेसी.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol, I, New Delhi, 1948.

2. Talbot, W. A. The Forest Flora of Bombay and Sind, Poona, 1909.

लेखक -दोंदे, वि. प.; परांडेकर, शं. आ.

स्त्रोत -मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate