অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पुलुंगा

पुलुंगा

(वारस, वरस, पातंग; क. आडविनुग्गी, बेचडी; गु. वेरास; लॅ.हेटेरोफ्रॅग्मा क्वाड्रिलॉक्युलर; कुल-बिग्नोनिएसी). हा मोठा वृक्ष मध्य प्रदेश व कारवार येथे आणि महाराष्ट्रात सर्वत्र, विशेषतः पानझडी जंगलात आढळतो. साल जाड व तपकिरी असून लहान खवल्यांनी सोलून जाते. पाने संयुक्त, संमुख (समोरासमोर), पिच्छाकृती (पिसासारखी) व मोठी; दले ७–११, कोवळेपणी केसाळ पण पुढे गुळगुळीत; फुले सुवासिक, पांढरी परंतु गुलाबी किनारीची आणि मोठी असून फांद्यांच्या टोकास परिमंजरीवर[→ पुष्पबंध]

फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये येतात. केसरदले चार व दीर्घद्वयी (दोन लांबट व दोन आखूड); संवर्त द्वयोष्ठक व केसाळ पुष्पमुकुट घंटेसारखा [→ फूल]; बोंड लांब, सरळ टोकदार व फुटीर; बिया सपक्ष (पंखधारी) असतात. याचे लाकूड करडे, खरबरीत व साधारण कठीण असून बांधकाम, फळ्या, खेळणी इत्यादींकरिता उपयुक्त असते. लाकडापासून जाळून काढलेले डांबरासारखे तेल कातडीच्या रोगांवर वापरतात.

 

 

स्त्रोत:मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate