অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोकळा

पोकळा

पोकळा

(इं. ॲमरँथ; हिं.चौलाई; सं. मारीष; लॅ. ॲमरँथस ब्लायटम, प्रकार ओलेरॅसिया;  कुल-ॲमरँटेसी). ही सु. २०–३० सेंमी. उंच व काहीशी रसाळ, वर्षायू (वर्षभर जगणारी) ⇨ ओषधी भारत व इतर उष्ण प्रदेशांत पालेभाजीकरिता लगवडीत आहे. हिरवा व तांबडा असे हिचे दोन प्रकार आहेत. खोड प्रथम मऊ पण पुढे सूत्रल (धाग्यांनी युक्त) व काहीसे कठीण बनते; पाने तांबड्या प्रकारात काळसर लाल व लांब देठाची असतात. फुले फार लहान, असंख्य व एकलिंगी असतात. (फुलांच्या संरचनेच्या वर्णनासाठी ‘ॲमरँटेसी’ ही नोंद पहावी). फुलोरा कक्षास्थ किंवा अग्रस्थ कणिश; फळ शुष्क (क्लोम); बी बारीक, काळसर लाल व चकाकीत. पोकळा शीतकर (थंडावा देणारा), दीपक (भूक वाढविणारा), बलप्रद व सारक असून त्रिदोषनाशक आहे. बिया भाजून खातात. या वनस्पतीत १०० ग्रॅम मध्ये २·९ ग्रॅम प्रथिने असून १८·१८ मिग्रॅ. लोह असते.

 

 

लेखक - द. सी. चौगले

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/3/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate