অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोटॅटो व्हाइन

पोटॅटो व्हाइन

पोटॅटो व्हाइन : (इं. बिटरस्वीट; लॅ. सोलॅनम जॅस्मिनॉइंडिस; कुल-सोलॅनेसी). ही सडपातळ पानझडी वेल मूळची दक्षिण अमेरिकेतील (ब्राझील) असून शोभेकरिता भारतात सपाट प्रदेशातील व टेकड्यांवरील बागांतून लावली जाते. जवळच्या वृक्षावर ती खूप उंचीपर्यंत चढत जाते. चांगला निचरा असलेली जमीन व सावली असल्यास छाट कलमे चांगली वाढतात. फांद्या गुळगुळीत व मऊ असतात. पानाचा देठ ४-५ सेंमी. लांब असून संवेदनाक्षमतेमुळे जवळच्या आधाराभोवती गुंडाळून वेलीस चढण्यास मदत करतो.

पाने लहान, साधी चिवट, संमिश्रवर्णी व काहीशी भाल्यासारखी असतात. फुलोरा शेंड्यावर मार्च-ऑक्टोबर या काळात येतो. तो सु. ८ सेंमी. लांब वल्लरीय परिमंजरीसारखा पुष्पबंध असतो; त्यावर ८–१२ फुले असून प्रत्येक फूल सु. २–५ सेंमी. व्यासाचे व पांढरे असते आणि त्यावर निळसर छटा असते; आकार ताऱ्यासारखा असून शोभिवंत दिसतो; संरचना व इतर शारीरिक लक्षणे सामान्यतः ⇨ सोलॅनेसी कुलात (धोतरा कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळे लहान व लाल असून कोंबड्यांना विषारी असतात. पाने व फळे यांत सोलासोडीन असते. फक्त पानात ते १·११% असते; त्यात क्लोरोजेनिक अम्लही असते.

 

लेखक - रा. ना. जोशी

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate