অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोपटवेल

पोपटवेल

पोपटवेल : (लॅ. रिस्टोलोकिया ब्रॅसिलेन्सिस; कुल-रिस्टोलोकिएसी) ही मोठी वेल महालता मूळची ब्राझीलमधील असून बागेत सर्वत्र लावलेली आढळते. पाने साधी, हृदयाकृती, मूत्रपिंडाकृती, तळाशी खोलगट व काहीशी टोकदार, लांब देठाची असून एकाआड एक येतात. फुले मोठी, मळकट पिवळी असून त्यांवर जांभळी जाळी व ठिपके आणि खालच्या वाकड्या नळीत गर्द जांभळी असतात. परिदलमंडल पुष्पमुकुटासारखे फूल, दोन ओठांसारखे व एकूण फुलाचा आकार पोपटाच्या चोचीसारखा व डोक्यासारखा असल्याने तसे मराठी नाव पडले. संरचना व शारीरिक लक्षणे रिस्टोलोकिएसी कुलात (ईश्वरी कुलात) वर्णिल्याप्रमाणे. परागणाकरिता कीटकांचा उपयोग विशिष्ट कारायंत्रणेमुळे होतो. फळ (द्वयावृत बोंड) शुष्क व आतील पडद्यांच्या रेषेत तडकणारे असून त्यात अनेक चपट्या सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेल्या) बिया असतात.

रिस्टोलोकिया ऑर्निथोसिफॅला ही जाती ब्राझीलमधीलच असून हिची पाने मोठी व परिदलमंडलाचा वरचा भाग भाल्यासारखा व निमुळत्या टोकाचा असून त्याचा फुगीर भाग पक्ष्याच्या चोचीसारखा असतो, . एलेगन्स (कॅलिको फ्लॉवर), . ग्रँडिफ्लोरा (पेलिकन फ्लॉवर, स्वान फ्लॉवर) आणि . इंडिका (सापसंद) ह्या वेली बागेत शोभेकरिता लावतात.

सावलीकरिता मांडवावर चढविण्यास योग्य कारण वेल जोमाने, जलद व कोठेही वाढते. भरपूर पाने येऊन मांडव लवकर झाकाळतो; यांवर कवक रोग (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीपासून होणारे रोग) किंवा कीड पडत नाही. पक्क्या काष्ठमय फांद्यांच्या छाटकलमांनी मार्च-एप्रिलमध्ये अभिवृद्धी (लागवड) करतात; बियांपासूनही रोपे करून लावतात; साधारणपणे लागवडीनंतर एक वर्षाने फुले येतात. (चित्रपत्रे).

संदर्भ : Pal, B. P. Beautiful Climbers of India, New Delhi, 1960.

लेखक - ज. वि. जमदाडे रा. मो. चौधरी

पोपटवेल : ( १ ) फुलांसह फांदी ( २ ) कळी ( ३ ) फळ

 

 

 

 

 

 

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate