অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फुडगूस

फुडगूस

(क. मशे, नेट्‍टेरे; लॅ. ऑल्सिओडॅफ्‌ने सेमिकार्पिफोलिया; कुल-लॉरेसी). मध्यम आकारमानाचा व सु. ७·५ - ९ मी. उंचीचा हा सदापर्णी वृक्ष श्रीलंकेत व पश्चिम भारतात (कोकण, कारवार इ.) सदापर्णी वनांत आढळतो. याची साल पिवळसर भुरी, जाड व भेगाळ असते. कोवळे भाग लवदार व इतर गुळगुळीत असतात. पाने साधी, एकाआड एक, अंडाकृती, कुंतसम (भाल्यासारखी)- आयात, साधारण टोकदार व चिवट; फुले पिवळसर हिरवी, कक्षास्थ (बगलेत) परिमंजरीवर [शाखायुक्त फुलोऱ्यावर;  → पुष्पबंध] अथवा पर्णकिणापासून (पान गळाल्यानंतर खोडावर राहणाऱ्या वणापासून) जुलै-डिसेंबर या काळात येतात. मृदुफळे बोरासारखी, १-३ सेंमी. लांब असून ती उन्हाळ्यात येतात. लाकूड गर्द भुरे, मध्यम कठीण व बळकट असून ते इमारती व नावा बांधण्यास उत्तम ठरले आहे. ते ⇨ टेरेडो नावाच्या मृदुकाय (मॉलस्क) प्राण्यापासून सुरक्षित असते.

 

 

पहा : कामट्टी; लॉरेसी.

लेखक-जमदाडे, ज. वि.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 7/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate