অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फोग

फोग

फोग : ह्या वनस्पतीची फोग , फोगल्ली , फोक , तिरनी इ . नावे सिंधी व पंजाबी भाषांतील असून कॅलि गो नम पॉलिगो नॉ इड् ‌ स ह्या शास्त्रीय नावाने ती ओळखली जाते . फुलझाडांपैकी   वनस्पति ,  आवृ त बीज उपविभाग   द्विदलिकित वर्गातील चुका कुलात हिचा अंतर्भाव असून भारतात  ( महाराष्ट्र , पंजाब व राजस्थान ) व इराण , आर्मेनिया , सिरिया , सिंध व बलुचिस्तान इ . प्रदेशांत तिचा प्रसार झालेला आहे . कॅलिगोनम वंशात एकूण सु . ७५ जाती असून भारतात फोग ही एकच जात आढळते . ही जवळजवळ पर्णहीन झुडपासारखी आणि ताठ र असून  हिच्या फांद्या शूलाकृती  ( लांब व टोकदार ), फिकट व गुळगुळीत असतात ; उपप र्णे आ खू ड , पातळ , पेल्यासारखी असतात.

फुलांचे देठ १·५ - २ ·५ मिमी .  लांब असून लालसर फुले  ( ३ मिमी .  लांब )  बारीक फांद्यांवर एप्रिल ते मेमध्ये उप पर्णां च्या बगलेत झुबक्यांनी येतात . फळ लहान  ( ६ - ८ मिमी .  लांब ), कठीण , चौधारी व परिदलवेष्टित कपाली  (  जाड कवचाचे शुष्क व एकबीजी )  असून त्यावर तांबूस केस असतात  फळ . हिची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ पॉलिगोनेसी कुलात  ( चुका कुलात )  वर्णिल्याप्रमाणे असतात . हिची मुळे ठेवून काताबरोबर उकळून तो रस सुजलेल्या हिरड्यांवर गुळण्या करण्यास देतात . फुलात प्रथिन भरपूर असते .  फुले व कळ्या को शिं बिरी त घालतात ; तसेच त्यांची भाकरी करतात किंवा फुले तुपात किंवा तेलात तळून खातात .

 

संदर्भ  : Kirtikar, K. R.; Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. III, Delhi, 1975 .

लेखक - ज. वि . जमदाडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate