অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बनलगाय

बनलगाय

बनलगाय

(क. बळगे, नवलदीमर; इं. टॉल चेस्ट ट्री; लॅ.व्हायटेक्स अल्टिसीमाकुल-व्हर्बिनेसी). हा एक मोठा पानझडी वृक्ष श्रीलंकेतील व भारतातील (प. बंगाल, महाराष्ट्रात पश्चिम घाट, कारवार इ.) जंगलांत सामान्यपणे आढळतो. साल पिवळट करडी, धागेदार व खवलेदार; मोठ्या फांद्या काहीशा लोंबत्या आणि लहाव डहाळ्या चौकोनी दबलेल्या; पाने संयुक्त, ३-५ दली; दले अवृंत (बिनदेठाची), जाडसर, वर हिरवी परंतु खाली पांढरट, लवदार; टोकाची दले १५ X ४ सेंमी., बाजूची १० X ३.५ सेंमी.; परिमंजरीवर[⟶पुषपबंध] मेमध्ये निळसर, विपुल, लहान फुले येतात. फळ अश्मगर्मी (आठळीयुक्त), गोलसर वाटाण्याएवढे, १.२ सेंमी. व्यासाचे, जांभळे व त्यांवर पांढुरक्या ठिपक्यांचे, पसरट व चापट असून संवर्तावर आधारलेले असते. ह्याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे व्हर्बिनेसी कुलात (साग कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. लाकूड पिंगट छटांचे पण करडे, कठीण, टिकाऊ, न चिंबणारे व झिलईस सोपे असून पाण्याशी संपर्क आल्यासही ते चांगले टिकते. सजावटी सामान, गाड्या, कपाटे, घरबांधणी, सिलिपाट व जमीन बनविण्यास ते चांगले असून त्याला मागणीही भरपूर आहे.

 

लेखक: द. सी. चौगले

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate