অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भादली

भादली

भादली : (लॅ. पॅनिकम पिलोजम; कुल - ग्रॅमिनी). वरी व सावा यांच्या पॅनिकम या वंशातील ही एक उपयुक्त वनस्पती आहे. जगात या वंशाच्या एकूण सु. ५०० जाती असून त्यापैकी भारतात फक्त २३ आहेत. अनेक जाती चराऊ गवतांबद्दल व उपयुक्त धान्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. भादली उष्ण कटिबंधातील अनेक देशांत आढळते. भारतात (ओरिसा, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व तमिळनाडू येथे) आणि आफ्रिकेत पिकविले जाणारे हे एक खरीप गवत आहे. डोंगरावर हलक्या जमिनीत याचे पीक काढतात. हे गवत सु. ०.५ - १ मी. उंच वाढते व याला सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये परिमंजरीवर फुले येतात पुष्पबंध. याचे लालसर पिंगट दाणे (बी) राळ्याप्रमाणे असून ते गरीब लोक शिजवून खातात अगर त्यांचे पीठ करून भाकरी करतात. ह्या गवताचा हिरवा चारा पाळीव जनावरांना खाऊ घालतात.

लेखक - म. वा. ठोंबरे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate