অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भेंडवृक्ष

भेंडवृक्ष

भेंडवृक्ष : (इं. कॉर्कवुड, पिथ ट्री, पाँड अचपल, अ लिगेटर अपल, मंकी अतपल; लॅ. अ नोना पॅलुस्ट्रिस; कुल अ नोनेसी). सुमारे १० - १४ मी. उंचीचा हा सदापर्णीवृक्ष अमेरिकेतील उष्ण प्रदेशात व वेस्ट इंडीजमध्ये ओढे व ओहोळ यांच्या काठाने वा दलदलीच्या जवळपास आढळतो. पाने साधी, एकाआड एक, मऊ व वरून चकाकणारी पण खाली फिकट, आयत-अंडाकृती टोकदार ; फुले सुगंधी, फिकट पांढरी किंवा फिकट हिरवट पिवळी; आतून तळाशी बहुधा गडद तांबडी. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे अतनोनेसीमध्ये (सीताफल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

घोसफळ मांसल, गुळगुळित, प्रथम हिरवे नंतर पिवळट; मगज (गर) अखाद्य. बिया अनेक व सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या). लाकूड हलके व भेंडाप्रमाणे; हे बुचाऐवजी वापरता येत असल्याने त्याचे कॉर्कवुड हे इंग्रजी नाव पडले आहे. अर्थात कॉर्कवुड हे नाव अनेक वनस्पतींना दिलेले आढळते. भारतात हा वृक्ष आढळत असल्याचा उल्लेख नाही.

 

लेखक - प्र. भ. वैद्य

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate