অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विखारी

विखारी

विखारी: (विखरी, वेखळी, येकाडी; हि. वेहकली; क. तम्माटा; लॅ. पिट्टोस्पोरम फ्लोरिबयंडम कुल-पिट्टोस्पोरेसी). फुलझाडांपैकी हा लहान, सदापर्णी व शोभिवंत वृक्ष, म्यानमारमध्ये (ब्रह्मदेशात) व भारतात (सह्याद्री ते निलगिरीपर्यंत उपोष्ण हिमालयात पंजाब ते सिक्कीम दरम्यान १,५५० मी. उंचीपर्यंत, खासी टेकड्या व मिश्मी, द. अर्काट व सालेम इ.) बहुधा रुक्ष व खडकाळ जागी आढळतो. फांद्या चवरीप्रमाणे असतात.

साल पातळ, फिकट हिरवट भुरी व र्तावर आडव्या वल्करंध्रांच्या ओळी असतात.पाने एकाआड एक एक साधी, गुळगुळीत, भाल्यासारखी व तरंगित कडांची; फुले अनेक, लहान, पिवळी, पंचभागी, द्विलींगी, लवदार असून शेंड्याकडे अनेक शाखायुक्त, संयुक्त गुलुच्छावर  किंवा चवरीसारख्या झुपक्यावर येतात.फळ (बोंड) लहान, शेंदरट पिवळे, विखारी : (१) फळांसह फांदी, (२) फूल, (३) फुलोरा ,(४) किंजपुटाचा आडवा छेद, (५) फळ, (६) फळाची दोन शक्ले, (७) बी.

वाटाण्याएवढे, सहा बीजांचे व काहीसे दबल्यासारखे. तडकल्यावर त्याची दोन सारखी शकले होतात. बी काहीसे कोनयुक्त, गुळगुळीत, शेंदरी किंवा काळपट लाल असून त्याभोवती रेझीनयुक्त चिकट द्रव असतो.

लाकूड पांढरट तपकिरी, चमकदार, मध्यम प्रतीचे कठीण व जड असून ते खेळण्यांसाठी आणि जळण म्हणून वापतात. साल कडू व सुगंधी असून ताजेपणी तिला आल्याप्रमाणे वास येतो. ती कफोत्सारी (कफ पाडून टाकणारी), ज्वरनाशी व मादक असते. तेल बलवर्धक, चर्मरोगनाशक व आरोग्य प्रस्थापक असून संधिवात, छातीचे विकार, लचकणे, खरचटणे, नेत्रदाह इत्यादींवर लावण्यास उपयुक्त असून उपदंश, महारोग, चर्मरोग व जुनाट संविधातावर ते पोटातही देतात.

 

 

 

लेखक - शं. आ. परांडेकर

स्त्रोत -मराठी विश्वकोश

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate