অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

श्वेतगंधा

श्वेतगंधा

श्वेतगंधा : (इं. कीपिंग ट्यूबरोज, मादागास्कर जस्मीन, ट्रू स्टेफॅनोटिस; लॅ. स्टेफॅनोटिस फ्लोरिबंडा; कुल-ॲस्क्लेपीएडेसी). एक शोभिवंत वेल. ती मूळची मादागास्कर येथील असून भारतात शोभेकरिता व सुगंधी फुलांकरिता बागांमध्ये लावलेली आढळते. तिचे खोड २.५-४.५ मी. उंच, करड्या-तपकिरी रंगाचे असून त्यावरील पाने समोरासमोर, साधी, जाड, गर्द हिरवी, चिवट, टोकदार, गुळगुळीत, दीर्घवृत्ताकृती किंवा आयत- अंडाकृती असतात. त्यांच्या बगलेत मार्च ते सप्टेंबरात चवरीसारख्या पण द्विशाखी वल्लरी येतात.

श्वेतगंधा : फुलोऱ्यासह फांदी.
फुले लहान, खाली नळीसारखी परंतु वर पसरट, २.५ - ५ सेंमी., पांढरी व सुवासिक असतात. पुष्पमुकुट तळाशी फुगीर व टोकास तबकासारखा असून त्यातील तोरण (कोरोना) पाच कर्णिकार उपांगांचे असते. फळे नियमित येतातच असे नाही. ती ७.५-१० सेंमी. लंबगोल, मांसल असून त्यात केसांचा झुबका असलेल्या अनेक बिया असतात. कलमे व बिया यांव्दारे हिची लागवड करतात. तिला भरपूर सूर्यप्रकाश, सकस व खत घातलेली जमीन आवश्यक असते. मात्र ही फार उंचीच्या प्रदेशांत व फार दमट हवामानात वाढत नाही. कुंडीतील वेल अनेक वर्षे चांगली वाढत राहते.

 

लेखक - कमला श्री. हर्डीकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate