অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुंद्री-चांद

सुंद्री-चांद

सुंद्री-चांद

( सुंद्री; इं. लुकिंग ग्लास प्लँट; लॅ. हेरिटिएरा लिटोरॅलिस; कुल-स्टर्क्युलिएसी ). हा मध्यम आकाराचा लहान वृक्ष उष्णकटिबंधीय देशांच्या (अमेरिकाखेरीज) समुद्रकिनारी आढळतो. हा वृक्ष भारतीय उपखंडात पूर्व आणि पश्चिम द्वीपकल्प, प. बंगाल, अंदमान, उ. कारवार इ. ठिकाणी व म्यानमारमध्ये आढळतो. साल गर्द करडी, उभ्या भेगा असलेली; सर्व कोवळ्या भागावर खाली रुपेरी लव; पाने १२–२० × ५–१० सेंमी.; फुले लहान, नारिंगी व अनेक ; स्त्री-पुष्पे व पुं-पुष्पे संयुक्त मंजरीत असून त्यांना पाकळ्या नसतात. परागकोश पाच असून फुले पावसाळ्यात येतात. फळे एक-त्रिखंडी, प्रत्येक खंड पिंगट व कठीण, २·५– ७·५ सेंमी. लांब; बी २·५ सेंमी. लांब व खाद्य. कोळी लोकांची मासेमारीची जाळी मजबूत करण्यासाठी फळ, बी व काष्ठ यांतील टॅनिन उपयुक्त असते. लाकूड जळणासाठी तसेच बैलगाड्या, नावा वगैरे किरकोळ कामांस वापरतात.

लेखक - भो. सुं. नवलकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate