অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दिन विशेष

दिन विशेष

  • अक्षय ऊर्जा दिन- २० ऑगस्ट
  • अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर देण्यासाठी व त्यासंबंधी जागृती करण्यासाठी अक्षय उर्जा दिन साजरा करतात.

  • आंतरराष्ट्रीय ओझोन दिन - १६ सप्टेंबर
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (UNEP) १९९५ सालापासून हा दिवस पाळला जातो.

  • आंतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन - २६ जुलै
  • खारफुटी वनांचे संरक्षण – संवर्धन होण्यासाठी व त्या बाबत जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन साजरा करतात.

  • आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिन- ३ सप्टेंबर
  • गीधांडांच्या संरक्षणाकडे गंभीरपणे पाहिले जावे यासाठी आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिन साजरा करतात.

  • आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन- २२ मे
  • जैवविविधतेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी हा ‘बायोडायव्हर्सिटी डे’ जगभर साजरा केला जातो.

  • आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत पक्षी दिन- १४ मे
  • स्थलांतरीत पक्ष्यांना अधिवास आणि संरक्षण पुरवणे या मूळ संकल्पनांचा प्रसार आणि जाणीव होण्यासाठी हा दिवस पाळतात.

  • जागतिक अधिवास दिन- ३ ऑक्टोंबर
  • मानवी अधिवासाबाबतच्या स्थानिक परिस्थितीचे योग्य निरीक्षण, नोंदी व कृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

  • जागतिक चिमणी दिन - २० मार्च
  • चिमण्यांची घटती संख्या लक्षात घेऊन २०१० सालापासून ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ साजरा केला जाऊ लागला आहे.

  • जागतिक जल दिन- २२ मार्च
  • संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला.

  • जागतिक निसर्ग संवर्धन दिन- २८ जुलै
  • शाश्वत आणि नियंत्रित वापराबद्दल सर्वत्र जनजागृती करण्यासाठी हा ‘नेचर कॉन्झर्वेशन डे’ जगभर पाळला जातो.

  • जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यापूर्वी...!
  • अमेरिकेने बदललेली भूमिका आणि वाढत्या लोकसंख्येचा दबाब या पार्श्वभूमीवर 5 जून रोजीचा पर्यावरण दिन.

  • जागतिक पर्यावरण दिन- ५ जून
  • पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.

  • जागतिक पाणथळ प्रदेश दिन- २ फेब्रुवारी
  • पाणथळ प्रदेशांचे मानवी जीवनातील स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस ‘ वेटलँड्स डे ’ साजरा करतात.

  • जागतिक प्राणी दिन- ४ ऑक्टोंबर
  • सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो.

  • जागतिक महासागर दिन - ८ जून
  • समुद्री जीवांचे संरक्षण होण्यासाठी जागतिक महासागर दिन साजरा करतात.

  • जागतिक लोकसंख्या दिन- १२ जुलै
  • वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणा-या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ११ जुलै हा दिवस इशारा – दिन म्हणून पाळला जातो.

  • जागतिक वन दिन- २१ मार्च
  • बेसुमार जंगलतोड थांबवून जंगलांना संरक्षण मिळण्याच्या उद्देशाने २१ मार्च हा जागतिक वन दिन म्हणून साजरा करतात.

  • जागतिक वन्यजीव दिन- ३ मार्च
  • वन्य जीवांना संरक्षण मिळावे या हेतूने जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो.

  • जागतिक वसुंधरा घटिका दिन- २६ मार्च
  • पृथ्वीच्या संरक्षणासाठी जागतिक वसुंधरा घटिका दिन साजरा करतात.

  • जागतिक वसुंधरा दिन- २२ एप्रिल
  • हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला.

  • जागतिक वृक्ष दिन- २७ सप्टेंबर
  • वृक्ष-संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

  • जागतिक व्याघ्र दिन- २९ जुलै
  • वाघांना संरक्षण मिळावे व त्यासंबंधी जागृती होण्यासाठी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो.

  • जागतिक हरित ग्राहक दिन- २८ सप्टेंबर
  • जीवसृष्टीला धोकादायक असणा-या कच-यावर नियंत्रण ठेवणे हे हरित ग्राहक जीवनशैलीव्दारे आपल्या हातात आहे. यासाठी हा दिवस पाळला जातो.

  • जागतिक हवामान दिन- २३ मार्च
  • हवामान बदलांसंबंधी जागरूकता वाढवण्यासाठी २३ मार्च हा जागतिक हवामान दिन साजरा करतात.

  • डॉ. सलीम अली दिन- १२ नोव्हेंबर
  • भारतीय पक्षी शास्त्रज्ञ म्हणजे सलीम अली ( बर्डमॅन ऑफ इंडिया) यांच्या कार्याची स्मृती राहावी यासाठी हा दिवस साजरा करतात.

  • प्रदेशनिष्ठ पक्षी दिन- ९ मे
  • पक्ष्यांच्या अधिवासांना ( हॅबिटॅट्स ) गरजेप्रमाणे संरक्षण पुरवण्याच्या हेतूने हा दिवस साजरा होऊ लागला आहे.

  • राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन- २ डिसेंबर
  • भोपाळ औद्योगिक दुर्घटनेची आठवण राहून प्रदुषणाला आळा बसावा यासाठी हा दिवस पाळला जातो.

  • राष्ट्रीय वन हुतात्मा दिन- ११ सप्टेंबर
  • जंगलतोडीला अटकाव करण्यासाठी अक्षरशः स्वत:चे प्राण पणाला लावणा-यांचा योग्य गौरव आणि स्मरण होण्यासाठी हा दिवस भारतात पाळला जातो.

  • वन महोत्सव- १ ते ७ जुलै
  • वनांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडूनच केला जावा यासाठी वनमहोत्सवामधून प्रोत्साहन दिले जाते.

  • वन्यजीव सप्ताह- १ ते ७ ऑक्टोंबर
  • मानव आणि वन्यजीव यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावेत यासाठी वन्यजीव सप्ताह करतात.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate