आपल्या आसपासच्या सृष्टीतील प्राणी, पक्षी, कीटक,वृक्ष यांची विविधता खरोखरीच थक्क करणारी आहे.अगदी आजही त्यांच्या नव्या जाती सापडत आहेत! आपण निसर्गाची सतत कत्तल करून त्यांचा जगण्याचा अधिकारच हिरावून घेत आलो आहोत.पण खरी गोष्ट अशी आहे की ते जगले तरच आपण जगू !

मूळ संकल्पना व सुरुवात

१९७० च्या सुमाराला, वन्यप्राणी म्हणजे कोणते रे भाऊ? असा प्रश्न विचारण्याची वेळ येणार असे वाटू लागले होते. कारण वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते की त्यांपैकी बरेचसे कायमचे नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत जागृती करण्यासाठी युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने वन्यजीवन दिवस ठरविला.

अधिक माहिती

नामशेष होण्याचा धोका असलेल्या वन्य सृष्टीच्याआंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा (CITES) ३ मार्च १९७३ रोजी १८० देशांनी मान्य केला म्हणून या दिवसला महत्व आहे.

जंगली पशुपक्ष्यांची शिकार तसेच त्यांचा आणि दुर्मिळ वनस्पतींचा चोरटा व्यापार तेथील स्थानिकांच्या मदतीशिवाय शक्यच होणार नाही. त्यामुळे असे न करण्याबाबत सर्वप्रथम त्यांना समजावले पाहिजे.

निसर्गाच्या साखळीतला प्रत्येक घटक किड्यांपासून सिंहापर्यंत पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी महत्त्वाचा आहे ही बाब सर्वांनी ध्यानात ठेवली पाहिजे.

माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६