भारतीय पट्टेरी वाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. परंतु, अनिर्बंध शिकार आणि अधिवासावरील अतिक्रमणांमुळे त्यांची संख्या अत्यंत रोडावली आहे. गेल्या शतकात माणसाने वाघांची अनिर्बंध शिकार केलीच; शिवाय जंगलतोड आणि अतिक्रमण करून वाघांच्या अधिवासाचे क्षेत्रही कमी केले; परिणामी, अन्नासाठी जवळच्या वस्त्यांवर वाघ हल्ले करू लागले आणि माणूस- वाघ संबंध आणखीच बिघडले. नामशेष होण्याच्या जवळपास पोहचलेला वाघ जतन करण्याची आवश्यकता यामुळेच निर्माण झाली आहे. वाघाची शिकार ही माणसाची मर्दुमकी या गैरसमजामुळे सुमारे ९७ टक्के वाघांची शिकार झाली आणि आज जेमतेम ४,००० वाघ भारतात शिल्लक राहीले आहेत.

मूळ संकल्पना व सुरुवात

रशियातील सेंट पीटर्सबर्ग मध्ये २०१० साली झालेल्या वाघांविषयीच्या शिखर परिषदेत या दिवसाची घोषणा गेली गेली. वाघांना संरक्षण पुरवण्यासाठी संबंधित देशांसहित इतरांनाही साहाय्य केले आहे.

अधिक माहिती

वाघाचे दुर्दैव असे की, त्याला भरपूर जागा लागते ! शेती, अतिक्रमण आणि जंगलतोडीमुळे वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र सर्वच देशांत कमी होत गेले. बदलत्या हवामानाचा फटका वाघांनाही बसत आहे. उदा. भारत आणि बांगलादेशाच्या किना-यावरच्या सुंदरबन पाणथळीत खूप वाघ आहेत. परंतु, समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे येत्या ३० वर्षातच त्यांना अक्षरश: बेघर व्हावे लागणार आहे. अद्याप वाघांची चोरटी शिकार आणि तस्करी होतच आहे. सामान्य माणूस आणि वाघ यांच्यामधील दरी कमी होणे आवश्यक आहे.

माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६