অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

धोरणांचा आधार

महिलांना विशेष लाभ

इंडिअन रिन्युएबल एनर्जी डेवलपमेंट एजन्सी लिमिटेड (इरेडा ) तर्फे महिलांनी नवीन व पुर्नवापरायोग्य ऊर्जास्रोतांचा (न्यू अॅँड रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी) वापर केल्यास त्यांना प्रोत्साहनपर रक्कम (इन्सेन्टिव) दिली जाते. अधिक माहितीसाठी  खालील वेबसाइटला भेट द्या -
लहान मुलींच्या फायद्याकरिता

लहान मुलींनी स्वतःचे शिक्षण सुरू ठेवावे ह्यादृष्टीने एक पाऊल म्हणून एम.एन.आर.इ. ने अशा शिकणार्या प्रत्येक मुलीसाठी एक सौरकंदिल (सोलर लँटर्न) खालील अटींवर मोफत देण्याचे मान्य केले आहे -

  • दारिद्र्यरेषेखालील (बिलो पॉवर्टी लाइन) प्रत्येक कुटुंबातील शाळेत जाणार्या एका लहान मुलीसाठी
  • विशेष दर्जाची राज्ये तसेच केंद्रशासित बेटांवरील वीज उपलब्ध नसलेल्या खेड्यांमध्ये व वाड्यांवर राहणार्या कुटुंबांसाठी
  • इयत्ता ९ वी ते १२ वीमध्ये शिकणार्या मुलींसाठी

कोणाला भेटावे ?

जिल्हा निहाय प्रशासना मार्फत राज्यस्तरीय संस्थांकडून (उपशाखीय एजन्सीज्) संबंधित कुटुंब दारिद्र्यरेषेखाली असल्याची तपासणी व खात्री केली जाते. संबंधित मुलीच्या शाळेमधूनही तिच्या इयत्तेची खात्री करतात. खालील राज्यांमध्ये ही योजना लागू आहे - अरुणाचल प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, मेघालय`, मिझोराम, नागालॅन्ड, सिक्किम, त्रिपुरा, अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप.

अंतिम सुधारित : 6/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate