बीज भांडवल योजना | |
उद्देश | चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत पारंपारिक व्यवसाय किंवा अन्य व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील बेरोजगारास रू.50,000/- ते रु.5,00,000/- पर्यंत कर्ज मिळू शकते. महामंडळ प्रकल्प गुंतवणुकीच्या 20 टक्के बीज कर्ज म्हणून द.सा.द.शे.4 टक्के व्याजदराने देते व या अर्थसहाय्यापैकी रू.10,000/- रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते. |
शैक्षणिक पात्रता | आवश्यकता नाही |
वयोमर्यादा | 18 ते 50 वर्षे |
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न | ग्रामीण भागासाठी - रु.39,308 /- आणि शहरी भागासाठी - रु.54,496/- |
कर्जमर्यादा | किमान रू.50,000/- व कमाल रु.5,00,000/- |
बँकेचा सहभाग व व्याजदर | प्रकल्प गुंतवणुकीच्या 75% आणि व्याज बॅकेच्या कर्जावर द.सा.द.शे. 9.5 ते 12.5 टक्के दराने |
महामंडळाचा सहभाग व व्याजदर | प्रकल्प गुंतवणुकीच्या 20% आणि व्याज 4 टक्के द.सा.द.शे. दराने |
अर्जदाराचा सहभाग | प्रकल्प गुंतवणुकीच्या 5% |
अनुदान | कमाल रू.10,000/- |
हमी | दोन सरकारी नोकरदारांचे हमीपत्र |
तारण | बँकेच्या नियमानुसार |
इतर अटी | अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवाशी असावा. अर्जदाराने अन्य शासकीय संस्थांकडून अनुदान घेतलेले नसावे व तो कोणत्याही संस्थेचा थकबाकीदार नसावा. अर्जदार दारिद्य्र रेषेखालील असावा. अर्जदाराने सादर केलेला जातीचा व उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला असावा. |
कर्जाची परतफेड | परतफेड एक महिन्यानंतर 36 ते 60 मासिक समान हप्त्यात बॅकेस व महामंडळास एकाचवेळी करावयाची आहे. |
अर्ज करण्याची कार्यपध्दती | कर्ज प्रकरणाच्या जलद निपटा-यासाठी अर्जदाराने प्रथम ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे. ऑनलाईन अर्जान्वये प्राप्त झालेला Provisional No. आपल्या अर्जात नमूद करुन अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह नजिकच्या महामंडळाच्या कार्यालयात सादर करण्यात यावा. |
आवश्यक कागदपत्रं | 1. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला 2. उत्पन्नाचा दाखला 3. जातीचा दाखला 4. नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटो 5. शिधापत्रिकेची छायाप्रत 6. व्यवसायासाठी लागणा-या स्थावर मालमत्तेच्या किंमतीचे दरपत्रक 7. अर्जदारास ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेच्या उपलब्धतेचा पुरावा किंवा भाड्याचे करारपत्र 8. अर्जदारास व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका अथवा महानगरपालिकेचा ‘ना-हरकत‘ परवाना अथवा दुकाने अधिनियमाखालील परवाना. 9. प्रकल्प अहवाल 10.दोन शासकीय / निम-शासकीय जामिनदार. जामीनदारांच्या कार्यालयाचे हमीपत्र, जामिनदारांचे प्रतिक्षापत्र. 11.अर्जदार दारिद्य्र रेषेखालील असल्याचा दाखला व क्रमांक. |
माहिती संकलक : अतुल पगार |
अंतिम सुधारित : 10/7/2020
तांत्रिक व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध व्यावसाय...
ज्या गावात राष्ट्रीयकृत बॅका नाहीत अशा गावातील म...
चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील व्...
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्...