অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पेसा - नियम २०१४ - महत्वाच्या तरतुदी

पंचायत विस्‍तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम 1996 (पेसा) हा कायदा २४ डिसेंबर १९९६ रोजी अस्तित्वात आला. या कायद्या अंतर्गत देशातील एकूण १० राज्यांचा समावेश होतो. त्यामध्ये- १) महाराष्ट्र २) गुजरात ३) आंध्र प्रदेश ४) मध्यप्रदेश ५) झारखंड ६) ओरिसा ७) छत्तिसगड ८) हिमाचल प्रदेश ९) राजस्थान १०) तेलंगाना या राज्यांनाच पेसा हा कायदा लागू आहे. तसेच, महाराष्ट्र राज्यातील एकूण १३ जिल्हे - १) अहमदनगर २) पुणे ३) ठाणे ४) पालघर ५) धुळे ६) नंदुरबार ७) नाशिक ८) जळगाव ९) अमरावती १०) यवतमाळ ११) नांदेड १२) चंद्रपूर १3) गडचिरोली यांना पेसा हा कायदा लागू आहे.

हा कायदा अनुसूचित क्षेत्रातील आदिवाशी लोकांशी संबंधित असून आदिवाशींची संस्कृती, प्रथा, परंपरा यांचे जतन व संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवाशींची स्वशासन व्यवस्था बळकट करणे हे पेसा या कायद्याचे प्रमुख सूत्र आहे. या कायद्यान्वये अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेस अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामसभेपेक्षा म.ग्रा.पं. अधिनियम १९५८, कलम ५४ ने विशेष अधिकार देण्यात आले आहेत. ------------------------------------------------------------------------------------------

पंचायत विस्‍तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम 1996 (पेसा)

महाराष्‍ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्‍तारित करण्‍याबाबत)

नियम 2014 बाबत

पेसा (पंचायत विस्‍तार अनुसूचित क्षेत्र अधिनियम 1996 ) नाशिक विभागातील पाच जिल्‍हयातील अनूसूचित क्षेत्रातील खालील तालुक्‍यामध्‍ये लागू आहे.

नाशिक विभागातील अंतर्भूत जिल्हे आणि तालुके

अ.नं.

जिल्‍हा

तालुका

1

नाशिक

पेठ, सुरगाणा, कळवण त्र्यंबकेश्‍वर (संपूर्ण तालुका ) दिंडोरी, इगतपूरी, नाशिक, बागलाण, देवळा (अंशतः तालुका)

2

धुळे

साक्री, शिरपूर  (अंशतः तालुका)

3

नंदूरबार

नवापूर, तळोदा, अक्‍कलकुवा, धडगांव (संपूर्ण तालुका ) नंदूरबार, शहादा, (अंशतः तालुका)

4

जळगांव

चोपडा, रावेर, यावल (अंशतः तालुका)

5

अहमदनगर

अकोले (अंशतः तालुका)

नाशि‍‍क विभागातील एकूण 54 तालुक्‍यापैकी 8 तालुके हे पुर्णतः व 13 तालुके हे अंशतः अनुसूचित क्षेत्रामध्‍ये येतात या तालुक्‍यांमधील 1244 ग्रामपंचायती हया अनुसूचित ग्रामपंचायती आहेत. सदर 1244 ग्रामपंचायतीमध्‍ये पेसा हा कायदा लागू होतो.

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना सदर अधिनियमानुसार विशेष अधिकार प्राप्‍त झाले आहेत.

महाराष्‍ट्र ग्रामपंचायतीची संबंधीचे उपबंध   (अनुसूचित क्षेत्रावर विस्‍तारित करण्‍याबाबत)

नियम 2014 मधील महत्‍वाच्‍या तरतुदी

  • नियम (10) ग्रामसभेच्‍या स्‍थायी समित्‍या, (शांतता, मादकद्रव्‍य, नियंत्रण, न्‍याय साधन संपत्‍ती नियोजन व व्‍यवस्‍थापन )
  • नियम (14) ग्रामसभाकोष
  • नियम (18) शांतता समिती
  • नियम (21) साधन संपत्‍ती नियोजन व व्‍यवस्‍थापन समिती
  • नियम (23) भु व्‍यवस्‍थापन गांवाच्‍या भू अभीलेखे योग्‍य अचूक नोंदी आहे का ?  याचा आढावा घेणे / धनकोच्‍या जमीन गहाण संबंधातील सर्व प्रकरणाची माहिती ग्रामसभेसमोर ठेवावी.
  • नियम (24) जमीनीचे अन्‍य संक्रमणास प्रतिबंध
    MLRC Code 1966 मधील तरतुंचा भंग करून व्‍यवहार झाला असल्‍याची ग्रामसभेची खात्री झाल्‍यास त्‍याचा तपशिल नमुद करून ठराव सक्षम अधिका-याकडे पाठवेल.
  • नियम (25) अन्‍य संक्रमण केलेली जमीन परत करण्‍याचा ठराव सक्षम अधिका-याकडे पाठविणे
  • नियम (26) (2) भुसंपादन व पुर्नवसन बाबत शिफारस
  • नियम (28) जलस्‍त्रोत नियोजन व व्‍यवस्‍थापन
  • नियम (28) जलस्‍त्रोत नियोजन व व्‍यवस्‍थापन
  • नियम (32) गौण खनिज लिलाव व पटटा देण्‍यापूर्वी ग्रामसभेची शिफारस अनिवार्य
  • नियम (36) मादक द्रव्‍य पदार्थाचे विनियमन
  • नियम (37) नविन दारू / मादक पदार्थ निर्मीती करीता परवानगी घ्‍यावी लागेल
  • नियम (40)  Excise Dept. ला कोणत्‍याही वर्षी दारूचे दुकान चालू ठेवण्‍यासाठी सभेकडे प्रस्‍ताव दयावा लागेल.
    दारू दुकाने बंदचा ग्रामसभेस अधिकार
  • नियम (41) गौण वनोत्‍पादन व्‍यवस्‍थापन ग्रामसभेकडे ( कापणी / निविदा / विक्री )
  • नियम (43) बाजारावर नियंत्रण
  • नियम (44) सावकारी व्‍यवहार नियंत्रण समिती
  • नियम (45) लाभार्थी निवड ग्रामसभेमार्फत
  • नियम (46) योजना / प्रकल्‍प यांना मान्‍यता
  • नियम (48) निधी वापर प्रमाणपत्र ग्रामसभेस अधिकार

पेसा कायदयाच्‍या अनुषंगाने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959 मध्‍ये करण्‍यात आलेल्‍या सुधारणा 54 (A)

ब  योजना / प्रकल्‍प / कार्यक्रम हाती घेताना ग्रामसभा मान्‍यता

क  निधी विनयोग प्रमाणपत्र ग्रामसभेला मान्‍यतेने

ड  लाभार्थी निवड

ई  मादक द्रव्‍य विक्री / सेवन प्रतिबंध

फ  गौण वनोत्‍पादन मालकी हस्‍तांतरण व महाराष्‍ट्र गौण वनोत्‍पादन (व्‍यापार विनयमन ) अधिनियम 1997 तरतुदीनुसार विक्री / व्‍यवस्‍थापन अधिकार

ग  अन्‍य संग्रमीत जमीन परत देण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी यांना शिफारस

ह  मुंबई सावकार अधिनियम 1946 – सावकारी लायसनसाठी पंचायतीची शिफारस

जे     लघुजलसंचयाची योजना आखणे
के     बाजार स्‍थापन्‍याची परवानगी
एल    भुसंपादन / पुर्नवसन संदर्भात ग्रामसभेशी विचारविनिमय
एम    गौण खनिज परवाने / लिलाव विचार विनिमय

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माहिती संकलन : दत्तात्रय उरमुडे

अंतिम सुधारित : 8/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate