অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वृध्दापकाळ आरोग्य शुश्रुषा

पार्श्वभुमी

२००१ च्‍या जनगणनेनुसार भारतात सुमारे ७.५९३ कोटी लोक ६० वर्षावरील होते आणि पुढील ५ वर्षाच्‍या जनगणनेची संख्‍या अंदाजे १३.३३२ कोटी (२०२१), १७.८५९ कोटी (२०३१), २३.६०१ कोटी (२०४१) आणि ३.०९६ कोटी (२०५१ मध्‍ये) संभावित आहे. अशाप्रकारे भारतात ६० वर्षावरील व्‍यक्‍तींची संख्‍या दिवसेंदिवस वाढत असून वृदपकाळ आरोग्‍य शुश्रुष कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे.

उद्दिष्टे

  • वृदधांना प्राथमिक उपचाराच्‍या दृष्‍टीने प्रतिबंधात्‍मक, निवारात्‍मक उपचारांची सुविधा देणे.
  • वृध्‍दांच्‍या आरोग्‍याच्‍या समस्‍या ओळखुन  त्‍यांचे निरासन करणे.
  • वयोवृदधांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यासाठी वैदयकिय अधिकारी कर्मचारी आणि कुंटूंबातील व्‍यक्‍तींना सक्षम बनविणे.
  • आवश्‍यकतेनुसार वृध्‍द रुग्‍णांना रिजनल जेरीयाट्रीक सेंटर किंवा जिल्‍हा रुग्‍णालयासाठी  संदर्भित करणे.

अंमलबजावणी पदध्ती

  • उपजिल्‍हा/ग्रामिण रुग्‍णालय तसेच प्रा.आ.केंद्रांमध्‍ये डेडीकेटेड ओपीडी सुरु करुन्‍ विविध उपकरणे आणि सुविधां तसेच प्रशिक्षण इत्‍यादींची तरतुद करणे.
  • जिल्‍हा रुग्‍णालयात १० खाटांचा स्‍वतंत्र् वॉर्ड बांधून अतिरिक्‍त मनुष्‍यबळासाठी उपकरणे व सामु्ग्री आणि प्रशिक्षण देणे.
  • रिजनल जे‍रीयाट्रीक सेन्‍टर्सना सक्षम बनवुन 2 पदांसाठी जेरीयाट्रीक मेडीसीन हा पदव्‍युत्‍तर अभ्यासक्रम सुरु करणे.
  • आय.ई.सी. द्वारे वयोवृध्‍दपर्यंत सूविधांविषयी माहिती पोहचविणे.
  • वृध्‍दांच्‍या आरोग्यच्‍या समस्‍या ओळखुन त्‍यांचे निरासन करणे.
  • कार्यक्रमाचे मुल्‍यांकन आणि अंमलबजावणीसाठी नियंत्रण ठेवणे.

उपक्रम

रिजनल जेरीअॅट्रीक सेंटर

रिजनल जेरीअॅट्रीक सेंटर म्‍हणुन ग्रॅन्‍ट वैदयकिय महाविदयालय जे.जे. हॉस्प्टिल, मुंबई येथे 30 बेडचा वॉर्ड व डेडीकेटेड ओ.पी.डी. सुरू करण्‍यासाठी शासनाने मान्‍यता दिलेली आहे. या रिजनल सेंटरला महाराष्‍ट्र, गोवा कर्नाटकातील उत्‍तरेकडील जिल्‍हे, छत्‍तीसगढ हि राज्‍ये जोडली आहेत. या सेंटर्समध्‍ये वृध्‍दपकाळातील व्‍यक्‍तींच्‍या सर्व प्रकारच्‍या तपासण्‍या, चाचण्‍या व निदान करुन्‍ आवश्‍कतेनुसार भरती करण्‍यात येते. तसेच या सेंटरमध्‍ये 2 पोस्‍ट ग्रॅज्युएट इन जेरीअॅट्रीक मेडीसीन अभ्‍यासक्रम सुरु करण्‍यात येईल.

रिजनल जेरीअॅट्रीक सेंटरची कर्तव्‍ये व जबाबदा़-या

  • वैदयकिय महाविदयालये, जिल्‍हे रुग्‍णालय व इतर आरोग्‍य संस्‍थांकडून अतिगंभीर व गुंतागुतीचे संदर्भीत केलेल्‍या वृध्‍द रुग्‍णांना भरती करणे व उपचार करण्‍े.
  • पोस्‍ट ग्रॅज्‍युएट इन जेरीअॅट्रीक मेडीसीन अभ्‍यासक्रम सुरु करणे.
  • वैदयकिय महाविदयालय व जिल्‍हा रुग्‍णालयासाठी प्रशिक्षण केंद्र म्‍हणुन कार्यरत राहणे.
  • जेरीअॅट्रीक रुग्‍णांच्‍या उपचाराकरीता ट्रिटमेंट प्रोटोकॅाल तयार करणे.
  • ट्रेनिंग मोडयुल्‍स मार्गदर्शिका व आ.इ.सी. मटेरीयल तयार करणे.
  • जेरीअॅट्रीक आजार / उपचार यावर संशोधन करणे.

जिल्‍हा रुग्‍णालयात जेरीअॅट्रीक क्लिनीक

जिल्‍हा स्‍तरावर जेरीअॅट्रीक युनिट सुरु करण्‍याकरिता खालीलप्रमाणे कंत्राटी पध्‍दतीने अधिकारी व कर्मचा़-यांची नियुक्‍ती करण्‍यात येईल.

  • मेडीकल कन्सल्टंट (एम.डी.फिजीशयन) – २
  • नर्सेस – ६
  • फिजीयो थेरिपीस्‍ट -१
  • हॉस्पिटल अटेंडंट -२
  • सॅनीटरी अटेंडंट -२

जिल्‍हा रुग्‍णालय

  • जेरीअॅट्रीक क्लिनीकमध्‍ये वृध्‍दांना डेडीकेडेट ओपीडी सुरु करणे.
  • जेरीअॅट्रीक वार्ड 10 बेडेड वृध्‍दांसाठी आतंररुग्‍णांसाठी त्‍यांपैकी 2 बेडस बेडरिडन रुग्‍णांसाठी राखीव ठेवण्‍यात येईल.
  • रुग्‍णालयात उपलब्‍ध असलेल्‍या सर्व प्रकारच्‍या विेशेषतज्ञांच्‍या सेवा पुरविण्‍यात येईल.
  • प्राथमिक आरोग्‍य केंद्र, ग्रामीण रुग्‍णांलय येथे जेरीअॅट्रीक सेवा देण्‍यासाठी शिबीरे आयोजित करुन तेथून संदर्भीत केलेल्‍या वृध्‍द रुग्‍णांना भरत करणे.
  • जेरीअॅट्रीक सेवेसाठी अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे.
  • गंभीर वृध्‍द रुग्‍णांना रिजनल जेरीअॅट्रीक सेंटरमध्‍ये संदर्भीत करणे.

ग्रामीण रुग्‍णालयातील

  • प्रा.आ.कें. व उपकेंद्रस्‍तरावरुन्‍ संदर्भित केलेल्‍या वृध्‍द रुग्‍णासाठी प्रथम संदर्भिय युनिट म्‍हणून काम करेल.
  • पुनर्वसन कर्मचार्‍याची नेमणूक करुन दर आठवडी दोन जेरिअेट्रीक समर्पित क्लिनीक घेऊन तसा अहवाल जिल्‍हा असंसर्गजन्‍यरोग नियंत्रण कक्षास पाठविणे.
  • पुनर्वसन कर्मचार्‍याने गृह भेटी देऊन शय्याग्रस्त वृध्‍द रुग्‍णाची विचारणा करुन कुंटूंबातील व्‍यक्‍तींना वृध्‍दाची काळजी घेणे बाबत समुपदेशन करणे..
  • आवश्‍यकतेनुसार वृध्‍द रुग्‍णांची तपासणी, चाचण्‍या व उपचाराकरीता जिल्‍हा रुग्‍णालयात संदर्भित करणे.
  • प्रा.आ.केंद्रात प्राप्‍त झालेल्‍या अहवालाचे एकत्रीकरण करुन अहवाल, जिल्‍हा असंसर्गजन्‍यरोग नियंत्रण कक्षास पाठविणे.

प्राथमिक आरोग्‍य केंद्र

  • सदर कार्यक्रम राबविण्‍याची संपूर्ण जबाबदारी वै्दयकिय अधिकारी ( I/C) प्राथमिक आरोग्‍य केंद्र यांची राहील.
  • आठवडयातून एकदा प्रशिक्षित वैदयकिय अधिकार्‍यामार्फत मार्फत जेरिअेट्रीक क्लिनीक घेणे.
  • क्लिनिकमध्‍ये वृध्‍द रुग्‍णांच्‍या डोळयाची तपासणी (Vision) , कानाची तपासणी (hearing) रक्‍तदाब तपासणी (B.P.) छाती तपासणी (Chest) व आवश्‍यक चाचण्‍या, उदा. ब्‍लड शुगर ,ब्‍लड कोलेस्‍ट्रोल इ. करणे.
  • योग्‍य उपचार व वैदयकिय सल्‍ला देणे
  • आवश्यकतेनुसार वृध्‍द रुग्‍णांना जिल्‍हा किंवा ग्रामीण रुग्‍णालयास संदर्भित करणे.
  • साधन सामुग्री उपलब्‍ध्‍ करणे
  • प्राथमिक आरोग्‍य केंद्रात उपलब्‍ध्‍ असलेली औषधे सामान्‍य उपचाराकरीता वृध्‍द रुग्‍णांना पुरविण्‍यात यावी.

उपकेंद्र केंद्र

  1. ए.एन.एम/ एम.पी.डब्‍ल्‍यु यांनी नियमित भेटी अंतर्गत वृध्‍द रुग्‍णांची विचारणा करणे. कुटूंबातील व्‍यक्‍तींना वृध्‍द रुग्‍णांची काळजी घेण्‍़याबाबत 1. समुपदेशन करणे बाबत.
  2. सदर कार्यक्रमाबाबत जनजागृती करणे यात प्रामुख्‍याने सकस आहार, नियमित व्‍यायाम, तंबाखू, धुम्रपान व दारुचे सेवन टाळणे याबाबत समुपदेशन करणे.
  3. अपंग वृध्‍दांना कॅलीपर्स किंवा इतर सहायक सामुग्री पुरविणे.
  4. या कार्यक्रमाकरीता उपकेंद्र स्तरावर अतिरिक्‍त कर्मचारी वर्ग नेमण्‍यात आलेला असुन उपलब्‍ध कर्मचा-याकडून (ए.एन.एम) ही कामे करुन घ्‍यावयाची आहेत

सेवा पुरवठा

आरोग्‍य केंद्रउपलब्‍ध सेवा
उपकेंद्र
  • सुधृड वयोमानाकरीता आरोग्‍य शिक्षण
  • अंथरुणाशी खिळलेल्‍या वयोवृध्‍दांना गृहभेट देऊन त्‍यांची विचारणा करणे आणि कुटुबांतील व्‍यक्‍तींना त्‍यांची काळजी घेण्‍याकरीता प्रशिक्षण देणे.
  • वयस्‍कर रुग्‍णांना चालण्‍याफिरण्‍याकरीता प्रा.आ.केंद्रामधुन कॅलिपर्स उपलब्‍ध करुन देणे.
  • कार्यक्षेत्रातील सहकारी गट आणि डे केअर सेंटर्स यांचेशी समन्‍वय साधणे.
प्राथमिक आरोग्‍य केंद्र
  • प्रशिक्षीत वैद्यकिय अधिका-याकडुन आठवडयातुन एक दिवस वृध्‍दांकरीता ओ. पी. डी. घेणे.
  • वयोवृध्‍दांच्‍या पहील्‍याभेटीदरम्‍यान त्‍यांची नोंद घेऊन प्रमाणीत अहवालामध्‍ये त्‍यांचा तपशील सुस्थितीत ठेवणे.
  • वयोवृध्‍दांकरीता वेळोवेळी शिबीरे आयोजित करुन डोळे, रक्‍तदाब, रक्‍तशर्करा इ.ची चाचणी करणे.
  • दिर्घकाळ टिकणा-या आजारांकरीता औषधांची तरतुद आणि समुपदेशन करणे
  • शिबीराच्‍या आणि आरोग्य दिवसाच्‍या वेळी वयोवृध्‍दांकरीता प्रतिबंधात्‍मक आणि पुनरविकासाकरीता जनजागृती करणे.
  • आवश्‍यकता असल्‍यास पुढील उपचाराची आणि चाचण्‍यांची गरज भासल्‍यास उपजिल्‍हा /ग्रामिण रुग्‍णालय किंवा जिल्‍हा रुग्‍णालयास संदर्भित करणे.
उपजिल्‍हा /ग्रामिण रुग्‍णालय
  • प्राथमिक आरोग्‍य केंद्र आणि त्‍याखालील केंद्रांकरीता प्रथम संदर्भिय केंद,
  • आठवडयातुन दोनदा वयोवृध्‍दांकरीता क्लिनिक घेणे.
  • फिजिओथेरपीसाठी पुनवर्सन केंद्र तसेच समुपदेशन सेवा देणे
  • पुनवर्सन कार्यकर्त्यामार्फत घर भेटी.
  • आरोग्‍य संवर्धन आणि रोग प्रतिबंध.
  • जोखमीच्‍या रुग्‍णांसाठी संदर्भ सेवा.
जिल्‍हा रुग्‍णालय
  • नियमितपणे वृध्‍दांसाठी ओपीडी सुविधा.
  • आजाराच्‍या निदानासाठी प्रयोगशाळा सुविधा तसेच त्‍यावर उपचारा‍करिता औषधाची सुविधा.
  • १० खाटांचा वृध्‍दांसाठी वार्ड.
  • संदर्भीत केलेल्‍या रुग्‍णांसाठी सुविधा.
  • प्राआकेंद्र तसेच ग्रामिण रुग्‍णालयास्‍तरावर वृध्‍दांसाठी शिबीर.
  • जोखमीच्‍या रुग्‍णांसाठी संदर्भ सेवा.
रिजनल जेरिअेट्रीक सेंटर
  • नियमितपणे वृध्‍दांसाठी ओपीडी सुविधा.
  • आजाराच्‍या निदानासाठी प्रयोगशाळा सुविधा तसेच त्‍यावर उपचारा‍करिता औषधाची सुविधा.
  • ३० खाटांचा वृध्‍दांसाठी वार्ड.
  • संदर्भीत केलेल्‍या रुग्‍णांसाठी सुविधा.
  • जोखमीच्‍या रुग्‍णांसाठी संदर्भ

सेवा केंद्र

पहीला टप्पा – वर्धा आणि वाशिम जिल्हा

दुसरा टप्पा – अमरावती, भंडारा, चंद्रपुर आणि गडचिरोली

मुख्य साध्य

  • सहसंचालक आरोग्‍य सेवा यांना राज्‍य स्‍तरावरील नोडल ऑफिसर एनसीडी म्‍हणून नेमण्‍यात आलेले.
  • प्रत्‍येक जिल्ह्याच्या जिल्हा शल्‍य चिकित्‍सक यांना जिल्‍हा स्‍तरावरील नोडल ऑफिसर एनसीडी म्‍हणून नेमण्‍यात आलेले.
  • राज्‍य स्‍तरावरील सर्व कंत्राटी पदे भरण्‍यात आली असून सहा जिल्ह्यामध्‍ये कार्यक्रमराबविण्‍यात येत आहे.
  • एनसीडी क्लिनीक, वृध्‍दांसाठी ओपीडी, अशा सुविधा जिल्‍हा तसेच तालुका पातळीवर कार्यक्रमातंर्गत देण्‍यात येत आहे.
  • पाच वैदयकिय अधिका-यांना पाच दिवसाच्‍या प्रशिक्षणाची तीन सत्रे PHI नागपूर येथे घेण्‍यात आली.
  • ३० वर्षावरील व्‍यक्‍तीची सर्व गरोदर मातांची तपासणी या कार्यक्रमांतर्गत सुरु झालेली आहे.

बजेट प्रोव्हीजन

ComponentsNorms per Unit per year
NPHCE 136.10
Geriatric Unit at District Hospital 131.00
Non-Recurring (One time) Grant: 87.00
Recurring Grant: 44.00
Assistance to Community Health Centers 4.00
Non-Recurring (One time) Grant: 0.50
Recurring Grant: 3.50
Assistance for Primary Health Centers 0.80
Non-Recurring (One time) Grant: 0.30
Recurring Grant: 0.50
Assistance for Sub Centers (under NPHCE) 0.30
Non-Recurring (One time) Grant: 0.20
Recurring Grant: 0.10

अंतिम सुधारित : 5/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate