অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शहरीकरणातून निर्माण होणाऱ्या समस्या

शहरीकरणातून निर्माण होणाऱ्या समस्या

शहरीकरण म्हणजे सर्वसमावेशक प्रगतीची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक चालकशक्ती असल्याचे मानले जाते. पण शहरीकरण आपल्याबरोबर अनेक नव्या समस्याही घेऊन येते.

स्थलांतर

शहरीकरण वाढीच्या प्रक्रियेत स्थलांतर ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. जगाच्या बहुतेक विकसनशील देशांमधे शहरी वाढीचा दर तुलनेने उच्च आहे. शहरीकरणात ग्रामीण लोकांनी शहरांकडे केलेले स्थलांतर हा एक महत्त्वाचा घटक राहिलेला आहे.

गृहनिर्माण

वाढत्या शहरी लोकसंख्येसाठी गृहनिर्माण हे सर्वात मोठे आव्हान आहे. शहरी मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नाशी तुलना करता घरांच्या वाढत्या किंमतींमुळे कमी उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी घरे घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे ते अशा ठिकाणी राहातात जेथे योग्य वेंटिलेशन, प्रकाश, पाणीपुरवठा, सांडपाणी इत्यादींपासून ते वंचित असतात. उदाहरणार्थ दिल्लीमध्ये सध्याचा अंदाजाप्रमाणे येत्या दशकात 5,00,000 घरांचा तुटवडा असेल. युनायटेड नेशन्स सेंटर फॉर ह्यूमन सेटलमेंटस् (यूएनसीएचएस) ने "गृह दारिद्र्य" अशी एक नवी संकल्पना मांडली आहे, ज्यात असे लोक मोडतात की जे "सुरक्षित आणि निरोगी निवारा, जसे नळाच्या पाण्याचा पुरवठा, किमान स्वच्छता, ड्रेनेज, घरगुती कचरा वाहून नेण्याची तरतूद" या किमान गोष्टींपासून वंचित असतात.

सुरक्षित पिण्याचे पाणी

शहरातील पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत दूषित असतात. कारण शहरातील पाणी मुळातच अपुरे असते आणि भविष्यात, अपेक्षित लोकसंख्या वाढीसाठी पुरेशा पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न तीव्र असतो.

अस्वच्छता

अस्वच्छता ही शहरी भागात, विशेषत: झोपडपट्टीतील आणि अनधिकृत वसाहतींमधील तर पाचवीला पुजलेली आहे. यामुळे अनेक प्रकारच्या अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या रोगराई, जसे की डायरिया, मलेरिया इत्यादीचा प्राधुर्भाव होतो. असुरक्षित कचरा विल्हेवाट ही शहरी क्षेत्रातील एक गंभीर समस्या आहे आणि कचरा व्यवस्थापन तर एक कायम मोठे आव्हान आहे.

आरोग्य आणि शिक्षण

शिक्षण आणि आरोग्य हे मानवी विकासाचे (Human Development) महत्त्वाचे संकेतक (indicators) मानले गेले आहेत. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी गरीबांची आरोग्य स्थिती जास्तच प्रतिकूल असते.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस संकुचित होत चालल्या आहेत आणि नागरिकांना अधिकाधिक खासगी आरोग्य सेवांवर अवलंबून राहावे लागत आहे. शिक्षणाची देखील अशीच स्थिती आहे. सरकारी शिक्षण व्यवस्थेचे देखील असेच संकुचन होत चालले आहे. त्यामुळे लोकांना खाजगी शिक्षण संस्थांवर आवलंबून राहावे लागत आहे. मर्यादित जागा आणि उच्च शुल्क आकारणी यांना तोंड द्यावे लागते आहे. सार्वजनिक शैक्षणिक संस्थांची स्थिती निराशाजनक आहे.

शहरी सार्वजनिक वाहतूक

उच्च उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती अधिक खाजगी वाहने खरेदी करत आहेत. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था अपुरी होत चालली आहे. शहरात मोठ्या संख्येने खासगी वाहने रहदारी जाम करत आहेत.

पर्यावरण

मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती ओढवून धोकादायक परिस्थिती आणि जोखीम निर्माण होते आहे. यूएनडीपीच्या मते भारतात भूकंपाचे धोके आहेत. घनतेमुळे आणि प्रचंड संख्येने शहरी भागात हा धोका जास्त संभवतो. शहरी भागात उष्णता निर्माण वाढते आहे. भूजल पुनर्भरण सोपे नसते आणि जलसंपत्ती आपोआप वाढत नाही. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावे लागतात.

शहरी अपराध

शहरी गुन्हेगारी हे देखील एक मोठे आव्हान आहे.

थोडक्यात, वाढत्या शहरीकरणाबरोबर दाट लोकवस्त्या, अपुऱ्या पायाभूत व्यवस्था, परवडणारी घरे, पूर, पर्यावरण, झोपडपट्ट्या, गुन्हेगारी, दाटीवाटी आणि दारिद्र्य असे अनेक प्रश्न तयार होतात.

अंतिम सुधारित : 4/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate