অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामाजिक संकल्पना व संज्ञा

सामाजिक संकल्पना व संज्ञा

  • अगम्य आप्तसंभोग (इन्सेस्ट)
  • अगम्य आप्तसंभोग (इन्सेस्ट) विषयक माहिती.

  • अतिचार
  • समाजाची मूल्ये आणि आचारनियम यांची चाकोरी सोडून वागणे.

  • अनाथाश्रम
  • अनाथ, दुर्लक्षित, अपंग, बेवारशी अगर बहिष्कृत मुलांना व महिलांना आश्रय देणाऱ्या संस्था.

  • अनुप्रयुक्त समाजशास्त्र
  • समाजविज्ञानातील व्यावहारिक उपयोजिता विशद करणारे शास्त्र म्हणून त्यास उपयोजित समाजशास्त्र .

  • अन्नछत्र
  • विनामूल्य अन्न मिळण्याचे ठिकाण.

  • अभिवादन
  • अभिवादन म्हणजे वंदन, नमस्कार अगर तत्सम आचार होय.

  • अभीष्टचिंतन
  • एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, संस्थेच्या, समाजाच्या अगर देशाच्या उत्कर्षाची इच्छा व्यक्त करणे म्हणजे ‘अभीष्टचिंतन’ होय.

  • अलुते-बलुते
  • हे हक्क ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया होत. खेड्यांत राहणाऱ्या बिगर-शेतकरी लोकांचा व्यवसाय हा परंपरेने चालत आल्यामुळे त्याला कुलपरंपरागत हक्काचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

  • अस्पृश्यता
  • ज्या व्यक्तीच्या वा वस्तूच्या स्पर्शाने विटाळ होतो, तिच्या ठिकाणची विटाळकारक म्हणून कल्पिलेली खोटी अदृश्य शक्ती.

  • आचारनियम
  • समाजधारणेच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीचे वर्तन दुसऱ्या व्यक्तीशी वेगवेगळ्या प्रसंगी कसे असावे, याविषयी समाजात रूढ असलेल्या संकेत सूचकांची एक अमूर्त आणि सर्व समावेशक अशी चौकट.

  • आडनावे
  • उपनाम किंवा कुटुंबाचे नाव. एखाद्या व्यक्तीचा अचूक निर्देश व्हावा, म्हणून आडनावाचा उपयोग केला जातो.

  • आतिथ्य
  • समाजात आतिथ्य हा रूढीचा आणि परंपरेचा एक भाग असतो.

  • आत्महत्या
  • स्वतःच स्वतःच्या जीवाचा अंत घडवून आणणे म्हणजे आत्महत्या.

  • आधुनिक समाजातील विवाहसंस्था
  • आधुनिक समाजातील विवाहसंस्था या विषयक माहिती.

  • आधुनिकत्व
  • आधुनिकत्व (मॉडर्निटी) म्हणजे तीन महत्त्वाच्या बाबतींत परंपरावादी दृष्टिकोनाच्या विरुद्ध असा एक विश्वविषयक व जीवनविषयक दृष्टिकोन होय

  • आधुनिकीकरण
  • विशिष्ट सामाजिक परिवर्तन घडवून आणणारी गतिमान आणि सर्वस्पर्शी अशी सातत्याने चालू असलेली एक प्रक्रिया.

  • आपद्‍ग्रस्त
  • अचानक आलेल्या आपत्तीमुळे ज्यांची जीवननिर्वाहपद्धती पूर्णपणे विस्कळीत वा नष्ट झाली आहे, असे दुर्दैवी लोक.

  • आश्रमव्यवस्था
  • आश्रमव्यवस्था विषयक माहिती.

  • एकविवाह
  • एका वेळी एका पुरूषाने एकाच स्त्रीशी वैवाहिक संबंध ठेवणे, म्हणजे एकविवाह होय.

  • औद्योगिक समाजशास्त्र
  • औद्योगिक समाज व त्यातील औद्योगिक संघटनांचे स्वरूप यांचा अभ्यास करणारी अनुप्रयुक्त समाजशास्त्राची एक शाखा.

  • औषधासक्ति
  • अमली पदार्थांचे सेवन ही सवय बनणे किंवा व्यसन होणे म्हणजे औषधासक्ती होय.

  • कंगालांचे श्रमगृह (वर्कहाउस)
  • वर्कहाउस विषयक माहिती.

  • कारागृह
  • कारागृह किंवा तुरुंग विषयक माहिती.

  • कुटुंबसंस्था
  • विवाह, रक्तसंबंध किंवा दत्तकविधान आणि एकत्र निवास यांनी बांधल्या गेलेल्या दोन अगर अधिक स्त्रीपुरुषांचा गट म्हणजे कुटुंब होय.

  • गृहविज्ञान
  • प्रपंच कसा करावा, हे शिकविण्याचे शास्त्र म्हणजे गृहविज्ञान होय.

  • गोत्र-प्रवर
  • गोत्र-प्रवर विषयक माहिती.

  • गोत्र-प्रवर व चातुर्वर्ण्य
  • गोत्र-प्रवर व चातुर्वर्ण्य विषयक माहिती.

  • ग्रामसंस्था
  • स्वतंत्र रीत्या अगर सामूहिक रीत्या स्वतः कसत असलेल्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कायम वस्तीला ग्राम असे सामान्यतः म्हटले जाते.

  • चहापान
  • चहापान विषयक माहिती.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate