Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/18 22:42:58.878155 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/18 22:42:58.882781 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/18 22:42:58.900069 GMT+0530

जोहार

अग्नीमध्ये देह समर्पण करणे किंवा स्वतःचा देहान्त करणे.

१. अभिवादन, २. अग्नीमध्ये देह समर्पण करणे किंवा स्वतःचा देहान्त करणे. महाराष्ट्रातील महार जमातीत अनेक शतके जोहार हा शब्द उच्चारून वरिष्ठांना अभिवादन करण्याची प्रथा आहे. एकनाथांच्या भारूडात तशा अर्थी हा शब्द वापरला आहे. अग्नीमध्ये देहसमर्पण करण्याची वीरजमातीतील प्रथा राजस्थानात होती; ती अशी : देशावर परकीय आक्रमण झाले आणि त्यात पराभव अटळ ठरला, की राजपूत स्त्रिया शत्रूच्या हाती सापडून आपली विटंबना होऊ नये, म्हणून सामुदायिक रीत्या अग्निप्रवेश करून देहत्याग करीत व रजपुत योद्धे केशरी पोषाख परिधान करून शत्रूवर तुटून पडत व रणांगणावर वीरमरण पतकरीत. असे जोहार राजपुतांच्या इतिहासात अनेकवार घडले आहेत, त्यांपैकी पद्मिनीचा जोहार प्रसिद्धच आहे.

लेखक: लक्ष्मणशास्त्री जोशी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

2.95833333333
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/18 22:42:59.178302 GMT+0530

T24 2019/06/18 22:42:59.185199 GMT+0530
Back to top

T12019/06/18 22:42:58.799743 GMT+0530

T612019/06/18 22:42:58.817318 GMT+0530

T622019/06/18 22:42:58.868281 GMT+0530

T632019/06/18 22:42:58.869029 GMT+0530