Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 22:34:3.567730 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / ग्रामसभा गावाचे व्यासपीठ
शेअर करा

T3 2019/05/20 22:34:3.572836 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 22:34:3.598885 GMT+0530

ग्रामसभा गावाचे व्यासपीठ

दलित, आदिवासी, महिला व तरुणांच्या आशा, आकांक्षा, व्यथा, वेदनांना वाव देणारे, गावाचे शहाणपण, सदिच्छा व कर्तृत्व व्यक्त करणारे लोकांचे व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा.

ग्रामसभा गावाचे व्यासपीठ

दलित, आदिवासी, महिला व तरुणांच्या आशा, आकांक्षा, व्यथा, वेदनांना वाव देणारे, गावाचे शहाणपण, सदिच्छा व कर्तृत्व व्यक्त करणारे लोकांचे व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा.

आवाजहीन लोक, दुर्बल घटक, आणि महिलावर्ग यांचा प्रामुख्याने तळागाळातील समुदायामध्ये समावेश केला जातो. त्यांना जर पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच विकास कामामध्ये गती देईल आणि या करिता सर्वात उत्तम माध्यम म्हणजे ग्रामसभा होय. म्हणूनच आपल्या गावच्या ग्रामसभा सक्रीय केल्या पाहिजेत. मजबुत झाल्या पाहिजेत, कमकुवत घटकांना त्यांच्या प्रश्नासंबंधी बोलण्याची संधी दिली पाहिजे. ग्रामसभा सर्व गावाचे व्यासपीठ असून संवादातून एकात्मता कायम ठेवण्याचे साधन आहे. ग्रामसभेमध्ये सर्व मतदार सारखे असतात व प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा व आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. कमकुवत घटकाला गावच्या विकासाच्या मुळ प्रवाहामध्ये सामिल करून घेतल्यास खऱ्या अर्थाने गावाचा विकास साध्य करता येईल आणि या विकासाला एक विशिष्ट दिशा प्राप्त होईल.

एकंदरीत ग्रामसभा गावातील सामुदायिक कर्तव्यांचे व आशा- आकांक्षांचे प्रतिक आहे. कायद्याने जरी प्रत्यक्ष कामे मंजूर करण्याचा ग्रामसभेला अधिकार नसला तरी, तिचा नैतिक अधिकार खूप मोठा असून तिच्या विरुद्ध ग्रामपंचायतीला जाता येणार नाही.

ग्रामसभा यशस्वी होण्यासाठी घ्यावयाची काळजी

  • सर्वसाधारण ग्रामस्थ विशेषतः शेतमजूर व स्त्रिया यांना सोयीचा दिवस व वेळ ग्रामसभेसाठी निवडावी.
  • ग्रामसभेची तारीख वेळ आणि ग्रामसभेपुढील विषय यांना व्यापक पूर्व प्रसिद्धी दयावी. दवंडीद्वारे, लाउडस्पीकरवरून, ग्रामपंचायत कार्यालय व गावातील मोक्याच्या जागी  मोठे ठळक फलक लाऊन अशी प्रसिद्धी करता येईल
  • वर्गात ग्रामसभेची माहिती सांगून मुलांना आपल्या पालकांना सभेस पाठविण्यास प्रवृत्त करावे. त्यामुळे भावी पिढीवरही ग्रामसभेचे संस्कार होतील.
  • ग्रामसभेपूर्वी गावातील स्वयंसेवी, संस्था, अंगणवाडी सेविकेमार्फत महिलामंडळाला ग्रामसभेची माहिती देण्यात आली तर महिलांचासहभाग ग्रामसभेत वाढेल.
  • ग्रुप – ग्रामपंचायत असल्यास प्रत्येक गावात आळीपाळीने ग्रामसभा घेतली जावी.एरवी गावातील वेगवेगळ्या वस्त्या किंवा वाड्यांवर/पाड्यांवर आळीपाळीने ग्रामसभा घेण्यात यावी.

संदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा

वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे

2.93023255814
शरद सपकाले Mar 29, 2017 11:09 PM

BPL सर्वे किती वर्षों नी होतो

शरद सपकाले Mar 29, 2017 11:09 PM

BPL सर्वे किती वर्षों नी होतो

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 22:34:3.923617 GMT+0530

T24 2019/05/20 22:34:3.930397 GMT+0530
Back to top

T12019/05/20 22:34:3.449176 GMT+0530

T612019/05/20 22:34:3.468283 GMT+0530

T622019/05/20 22:34:3.553927 GMT+0530

T632019/05/20 22:34:3.554886 GMT+0530