Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/24 21:21:41.776480 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / ग्रामसभेच्या बैठका - 2
शेअर करा

T3 2019/05/24 21:21:41.781808 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/24 21:21:41.808176 GMT+0530

ग्रामसभेच्या बैठका - 2

आर्थिक वर्ष संपल्यानंतर पहिल्या दोन महिन्यात ग्रामसभेची जी बैठक घ्यावी लागते ती पहिली बैठक होय.

आर्थिक वर्ष संपल्यानंतर पहिल्या दोन महिन्यात ग्रामसभेची जी बैठक घ्यावी लागते ती पहिली बैठक होय.

ग्रामसभेच्या बैठकीत सूचना मांडण्याचा सदस्यांचा अधिकार

ग्रामसभेच्या बैठकीत कोणतीही सूचना मांडण्याची एखादया व्यक्तीची इच्छा असल्यास त्या व्यक्तीने ती बैठकीच्या तारखेला कमीत कमी दोन दिवस आधी बैठक बोलविणाऱ्याकडे लेखी दयावी. अशी सूचना बैठकीत ठेवावी की ठेवू नये ते बैठक बोलविणाऱ्याने ठरवावे लागते. त्यासाठी ती ग्रामपंचायतीच्या सभेपुढे ठेऊन योग्य निर्णय घ्यावा. अशी सूचना क्षुल्लक स्वरुपाची असेल तर, सूचनेची भाषा अवमानास्पद असेल ते, सूचना बदनामीच्या स्वरूपातील असेल तर, सूचना लोकहितविरोधी असेल तर, सूचना न्यायालयात गेलेल्या बाबीसंबंधी असेल तर नाकारता येते.

ग्रामसभेच्या पहिल्या बैठकीची विषय पत्रिका

ग्रामपंचायतीचे आर्थिक वर्ष १ एप्रिलला सुरु होवून ३१ मार्चला संपते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर पहिल्या दोन महिन्यात ग्रामसभेची जी बैठक घ्यावी लागते ती पहिली बैठक होय. या बैठकीत पुढील विषय अग्रक्रम देऊन घ्यावेच लागतात.

  • मागील वर्षातील विकास कामाच्या प्रशासन अहवालाचे वाचन करणे.
  • मागील वर्षाच्या जमाखर्चाचे बाबींवर वाचन करणे.
  • मागील लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करणे आणि गेल्या वर्षात लेखापरीक्षण अहवालाला जी उत्तरे दिली असतील त्याचे वाचन करणे.
  • मंजूर अंदाजपत्रकाचे वाचन व त्यानुसार चालू वर्षात घ्यावयाच्या विकास कामांची माहिती.
  • पंचायत समिती, जिल्हा परिषदेची स्थायी समिती किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुचविलेले विषय आणि राज्य सरकारने सुचविलेले विषय घ्यावे लागतात.
  • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील सर्व योजनांची माहिती देणे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना राष्ट्रीय रोजगार योजनेतून घ्यावयाची कामे इतर योजनांचे लाभार्थी निवडणे.
  • याशिवाय ग्रामपंचायतीला आवश्यक वाटणारे विषय घेता येतात.

ग्रामसभेच्या आदल्या दिवशी ग्रामपंचायतीची बैठक

ग्रामसभेची बैठक ज्या दिवशी असेल त्या दिवसाच्या आदल्या दिवशी ग्रामपंचायतीच्या सदस्यांची बैठक घेऊन त्यात ग्रामसभेच्या बैठकीत घ्यावयाच्या विषयांवर चर्चा करण्यात येते.

ग्रामसभेच्या आदल्या दिवशी महिला सदस्यांची ग्रामसभा :

पोट कलम ५ नुसार प्रत्येक ग्रामसभेपूर्वी एक दिवस अगोदर महिलांची ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. त्या महिला ग्रामसभेमध्ये पारित झालेले ठराव जसेच्या तसे मुख्य ग्रामसभेमध्ये मान्य करण्यात यावेत. तसेच महिलेच्या सभेपूर्वी ग्रामपंचायतीची मासिक सभा घेऊन महिला सदस्यांच्या सभेची विषय पत्रिका तसेच होणाऱ्या ग्रामसभेच्या विषयपत्रिकेवर चर्चा करण्यात यावी.

संदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा

वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे

3.0
Anonymous Apr 02, 2018 02:41 AM

२६ जानेवारी व १५ ऑगस्ट या दिवशी होणाऱ्या ग्रामसभा कोणत्या कारणास्तव त्या दिवशी न घेता नंतर कोणत्या दिवशी घेता येतात ?

प्रविण Aug 14, 2016 11:09 AM

कायद्यानुसार १५ ऑगस्ट ची ग्रामसभा घेण्याची काही निश्चित वेळ ठरलेली आहे काय?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/24 21:21:42.203850 GMT+0530

T24 2019/05/24 21:21:42.210610 GMT+0530
Back to top

T12019/05/24 21:21:41.693194 GMT+0530

T612019/05/24 21:21:41.712077 GMT+0530

T622019/05/24 21:21:41.765510 GMT+0530

T632019/05/24 21:21:41.766372 GMT+0530