Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 17:53:10.874460 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / ग्राहक हक्क संरक्षण कायद्याविषयी थोडक्यात……
शेअर करा

T3 2019/10/17 17:53:10.879032 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 17:53:10.902785 GMT+0530

ग्राहक हक्क संरक्षण कायद्याविषयी थोडक्यात……

जागतिकीकरणानंतर जग हे ग्लोबल खेड्यात रुपांतरित होत आहे. ग्लोबल खेड्यांची बाजारपेठदेखील झपाट्याने विकसित होत आहे.

जागतिकीकरणानंतर जग हे ग्लोबल खेड्यात रुपांतरित होत आहे. ग्लोबल खेड्यांची बाजारपेठदेखील झपाट्याने विकसित होत आहे. विकसित होणाऱ्या बाजारात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे जगातील सर्वच देशात नामांकित ब्रँडस् सहजपणे उपलब्ध होत आहेत. त्यातच ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय ग्राहकांकडे आल्याने नामांकित ब्रँडस् एका क्लिकसरशी ग्राहकांना घरपोच मिळू लागला आहेत. बाजारातल्या या वाढत्या स्पर्धेमुळे आज ग्राहक हा खऱ्या अर्थाने ग्राहक राजा बनला आहे. अशा परिस्थितीत ग्राहक राजाची फसवणूक होऊ नये याकरिता ग्राहक हक्क सरंक्षण व्यवस्था मजबूत असायला हवी. देशातील ग्राहक हक्क संरक्षण व्यवस्थेबाबत यानिमित्ताने जाणून घेता येईल.
बाजारातील वाढत्या स्पर्धेचे ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर फायदे होत असले तरी काही ठिकाणी मात्र त्यांची फसवणूकदेखील होत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकहिताचे रक्षण करण्याकरिता विविध पातळ्यांवर कार्य केले जात आहे. ग्राहक तक्रार निवारण मंच हा याच व्यवस्थेचा एक भाग आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार स्थापन करण्यात आलेल्या या मंचाच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या सोडविण्याचे कार्य होत आहे. स्पर्धेतून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंच हा महत्त्वाचा पर्याय ठरत आहे.
भारतात ग्राहक हक्क संरक्षण चळवळ क्षेत्रात सुरूवातीला खाजगी व स्वंयसेवी संस्थांच्या पातळीवर प्रयत्न करण्यात येत होते. महाराष्ट्रात बिंदुमाधव जोशी यांनी 1974 साली ग्राहकांचे संघटन केले आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना करण्यात आली. अशा प्रयत्नांच्या माध्यमातून ग्राहक चळवळीचा विस्तार देशभरात झाला.
ग्राहक हक्क संरक्षणासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारानेच देशात ग्राहक संरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकावर 24 डिसेंबर 1986 रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर देशभरात तो कायदा म्हणून लागू करण्यात आला. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून भारतात 24 डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय ग्राहक दिवस' साजरा करण्यात येतो. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार, उत्पादनाबाबतच्या माहितीचा अधिकार, निवडीचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. या आधारे एखाद्या उत्पादन सेवेबाबत जाणून घेणे त्याबाबत तक्रार असल्यास त्याचे निरसन करुन घेण्याचा हक्क नागरिकांना मिळू शकला. या कायद्यामुळे ग्राहकांचे हक्क जोपासण्याच्या द्ष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले.
सद्यस्थितीत शहरी भागापासून ते अगदी दुर्गम भागातील ग्राहकांच्या हक्काचे रक्षण होण्याच्या दृष्टीने काळजी घेण्यात येत आहे. यासाठी विविध पातळीवर ग्राहक मंचाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या राज्यात जिल्हास्तरावर नियमित 40 आणि 3 तात्पुरत्या स्वरूपातील अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यरत आहेत. जिल्हा पातळीवर जिल्हा ग्राहक मंचाच्या माध्यमातून ग्राहक हक्काचे संरक्षण केले जात आहे. तिथे ग्राहकांचे समाधान झाले नाही तर राज्य किंवा राष्ट्रीय ग्राहक मंचच्या माध्यमातून ग्राहकाला न्याय मिळवून दिला जातो.
ग्राहक चळवळीला बळ देण्यासाठी महाराष्ट्र ग्राहक संरक्षण (सुधारणा) नियम 2004 नुसार जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतखाली समितीची स्थापना करण्यात आल्या आहेत. या समितीत विविध स्तरावरील सदस्यांची निवड करण्यात येते. तसेच राज्यस्तरावरदेखील ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेचे ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री हे अध्यक्ष असतात तर राज्यमंत्री हे उपाध्यक्ष असतात.
ग्राहकांना आवश्यक मार्गदर्शन थेट मिळावं यासाठी राज्यात 15 सप्टेंबर 2011 पासून स्वतंत्र हेल्पलाईन कार्यरत आहे. ग्राहक 1800-22-2262 या क्रमांकावर हेल्पलाईनला फोन करुन आपल्या शंकाचे निरसन करु शकतात. ग्राहककेंद्रीत बाजारव्यवस्था निर्माण होणे ही काळाची गरज असताना अशा सुविधांचा लाभ घेऊन ग्राहकांनीदेखील आपले हक्क जाणून घेणे गरजेचे आहे. हक्कांचा उपयोग करुन ग्राहक हित जोपासणारी व्यवस्था निर्माण होण्याच्यादृष्टीने सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्राहक हा ‘राजा’ होऊ शकेल.
जिल्हा माहिती कार्यालय, 
रत्नागिरी

स्त्रोत : महान्युज

3.1652173913
घुगे वर्षा अण्णासाहेब Mar 26, 2018 10:51 AM

मी2015 मध्ये घर बांधणी उद्देशाने २४००चौरस फूट जागा बीड जिल्ह्यात खरेदी केली होती. संबंधित जागा मालकाने दाखवलेले क्षेत्र प्रत्यक्षात ७०% कमी भरते. आता तो नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे. क्रुपया मार्गाने करावे

उत्तम रंगराव शेटके Jan 28, 2018 07:21 PM

मी बँक ऑफ बडोदा शाखा सरवडे ला कॅश क्रीडेची मागणी केली पण ते टाळाटाळ करत
आहेत माझे कृषी सेवा केंद्र आहे माझा त्या बँकेस व्यवहार चालू आहे कृपा
करून मला मदत करा माझा मो .९४२११७३२५३ आहे

राहुल देवराव सावळे Sep 21, 2017 07:37 AM

महोदय मि दिनांक १०/०८/2017ला इन फोकस या कंपनीचा मोबाईल घेतला नंतर तो ०६/०९/2017ला बंद पडलाय मि तो त्या दिवशी च सर्विस सेंटर ला दीला परतु आझुन सुद्धा माझा मोबाईल दीला नाही विचारपुस केली असता टाळा टाळ करुन पुढील तारीख देतात. कृपया मदत करा

अर्जुन चंद्रकांत कारंडे Aug 22, 2017 02:24 PM

मी दिनांक 5/11/2016 ला बिल्डर कडे रूम बुक केला,, मला तोह रूम मे ला देणार होता पण मला रूम पण नही दिला आणि पैसे पण नाही देत तोह 150000 लाख आहे बिल्डर कडे माझ्या कडे सर्व पावती पण आहे मी काय करू सांगा मला.

सुयोग अरुण कटकधोंडो Aug 12, 2017 11:17 PM

मी २मोबाईल चार्जर घेतला होता दुकानदार मला पहिला बोला की samsung चार्जर ओरेज्नेल आहे मी घरी येऊन मोबाईल चार्ज केला तर मोबाईल १तासात फक्त १०% झाली मी वापस गेलो दुकानदाराकडे की चार्जर बरोबर नाहीये तर मला पैसे वापस दे तर बोलतो मी बदली करून देतो पण पैसे नाही देणार मग तो भांडण करायला लागला मग मी बोलो चार्जर बदली करून दे मग त्याने बदली करून दिला मग मी त्याला बोलो बिल दे तर तो बोलतो बिल आम्ही नाही देत आणि चार्जर बदली केला तो पण खराब निघाला यावर उपाय काय

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 17:53:11.253027 GMT+0530

T24 2019/10/17 17:53:11.260530 GMT+0530
Back to top

T12019/10/17 17:53:10.797698 GMT+0530

T612019/10/17 17:53:10.815398 GMT+0530

T622019/10/17 17:53:10.864540 GMT+0530

T632019/10/17 17:53:10.865260 GMT+0530