Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 22:36:36.323959 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / जिल्हा परिषदेची कामे
शेअर करा

T3 2019/05/20 22:36:36.329038 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 22:36:36.352758 GMT+0530

जिल्हा परिषदेची कामे

खेडोपाडी राहणाऱ्या लोकांच्या गरजा विचारात घेऊन त्या गरजांचे निवारण केले तर लोकांचा विकास होईल या हेतूने खेडोपाडी राहणा-या लोकांच्या संभाव्य गरजांच्या याद्या जिल्हा परिषदेचा कायदा करतांना तयार केल्या

जिल्हा परिषदेची कामे

खेडोपाडी राहणाऱ्या लोकांच्या गरजा विचारात घेऊन त्या गरजांचे निवारण केले तर लोकांचा विकास होईल या हेतूने खेडोपाडी राहणा-या लोकांच्या संभाव्य गरजांच्या याद्या जिल्हा परिषदेचा कायदा करतांना तयार केल्या त्या याद्या करतांना ज्या गरजांची पूर्तता ग्रामपंचायत करू शकेल त्या गरजा वगळल्या उरलेल्या गरजांच्या दोन याद्या केल्या त्या अशा :

जिल्हा परिषदेकडून पूर्तता करावयाच्या गरजा जिल्हा परिषदेकडून पूर्तता करावयाच्या गरजांची संख्या सुमारे १०६ केलेली असून त्या गरजांचे वर्गीकरण व त्या अंतर्गत येणारी कामे खालील प्रमाणे

अ.क्र.वर्गीकरणअंतर्गत येणारी कामे संख्या
शेती १२
पशुसंवर्धन व दुग्धशाळा
वने
समाजकल्याण मागासवर्गीय शैक्षणिक विकास - २ ,आर्थिक विकास-५,अस्पृश्य निवास-४ ,मागासवर्गीययांचे कल्याण -१०,मागासवर्गीय यांना प्रशिक्षण -२
शिक्षण
वैद्यकीय
आयुर्वेद
सार्वजनिक आरोग्य ११
इमारती व दळणवळण
१० सार्वजनिक आरोग्य
११ पाटबंधारे
१२ प्रसिद्ध
१३ सामुहिक विकास
१४ समाजशिक्षण १३
१५ ग्रामीण गृहनिर्माण
१६ इतर २४

या प्रत्येक क्षेत्रात जिल्ह्या परिषद कोणकोणती कामे करू शकते त्यांची यादी अशी .-

शेतीची कामे

 1. पीक स्पर्धा
 2. पीक संरक्षण
 3. पीक मोहिमा
 4. मिश्र खते व स्थानिक खते
 5. रासायनिक खते, शेतीची अवजारे आणि शेतीसाठी लागणारे लोखंड, पोलाद आणि सिमेंट यांचे
 6. वाटप
 7. सुधारित कृषिपद्धतीचे प्रात्याक्षिक
 8. आदर्श प्रात्याक्षिक किंवा दुय्यम बीज क्षेत्रे
 9. सुधारीत बियाणांची आयात व वाटप
 10. गोदामे बांधणे आणि ती सुस्थितीत ठेवणे
 11. शेतीची अभिवृद्धी व सुधारणा .
 12. वायू संपीडके .
 13. खार जमीन विकास

पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकासाची कामे

 1. पशुवैद्यकीय सहाय्य
 2. गुरांच्या, घोड्याच्या आणि इतर जनावरांच्या पैदाशीची सुधारणा
 3. सुधारित पैदाशीच्या कोंबड्याचे वितरण करणे
 4. गुंरांचे प्रदर्शन व मेळावे भरविणे
 5. डुकरांचा प्रकर्षित विकास
 6. गुराढोरांचा प्रकर्षित विकास
 7. दुग्धशाळा विकास

वने

 1. गायराने व कुरणे

समाजकल्याणाची कामे

मागासवगचा शैक्षणिक विकास

 1. मागासवर्गाच्या विद्याथ्र्यांना शिष्यवृत्त्या फी माफी व परीक्षेची फी देणे आणि
 2. मागासवर्गाच्या विद्याथ्र्यांकरीता वसतिगृहे व शाळा स्थापन करणे व त्या चालविणे.

मागासवर्गाचा आर्थिक विकास - यात पुढील बाबींचा समावेश होतो.

 1. शेतीची साधनसामग्री खरेदी करण्यासाठी एकेका शेतक-यास कर्जाच्या व अर्थसहाय्या च्या स्वरूपात वित्तीय सहाय्य देणे.
 2. विमुक्त जातींना चरखे पुरविणे
 3. मागास क्षेत्रात दळणवळणाचा विकास करणे
 4. हस्तव्यवसाय केंद्रे स्थापन करणे आणि
 5. गुरांच्या पैदाशीचा आणि कोंबड्या पाळण्याचा क्षेत्रात विकास करणे
 • अस्पुश्यता निवारण, यात पुढील गोष्टींचा समावेश होतो.

 1. हरिजन सप्ताह साजरे करणे .
 2. झुणका भाकर कार्यक्रम
 3. सवर्ण हिंदू आणि हरिजन यांच्यातील आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे आणि
 4. अस्पृश्यता निवारण्यासाठी उत्कृष्ट काम करणा-या गावांना बक्षिसे देणे.
 • मागासवर्गाच्या कल्याणाचे कार्यक्रम, यात पुढील गोष्टींचा समावेश होतो.

 1. महिलांच्या आणि बालकांच्या कल्याणाचे कार्यक्रम किंवा प्रकल्प.
 2. बालवाड्यांच्या स्थापना करणे
 3. मागासवर्गाच्या कल्याणासाठी प्रचाराचे व प्रसिद्धीचे काम हाती घेणे
 4. मागासवर्गासाठी संस्कार केंद्र, सामूहिक करमणुकीची केंद्रे आणि सामूहिक सभागृहे... ।
 5. विमुक्त जातींना कपडे पुरविणे
 6. औषधे  खरेदी करण्यासाठी व्यक्तींना वित्तीय सहाय्य देणे आणि स्वेच्छा संस्थाना त्यांनी वैद्यकीय मदत देण्यासाठी अनुदाने देणे .
 7. मागासवर्गातील व्यक्तींसाठी घरांची तरतूद करणे, आणि
 8. पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची तरतूद करणे .

मागासवर्गाच्या प्रशिक्षण देणे, यात पुढील गोष्टींचा समावेश होतो.

 1. प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे
 2. तंत्र प्रशिक्षण आणि परंपरागत व्यवसायाच्या सुधारित पद्धतीचे प्रशिक्षण देणे

शिक्षणाची कामे

 1. अनुदान प्राप्त  शाळांना अनुदान देणे, यासहित प्राथमिक शाळांची आणि मूलोद्योग शाळांची स्थापना व्यवस्थापन त्या चालविणे, त्यांची तपासणी करणे आणि त्यांना भेटी देणे.
 2. माध्यमिक शाळांची स्थापना, व्यवस्थापन, त्या चालविणे, त्यांची तपासणी करणे, आणि त्यांना भेटी देणे, खाजगी माध्यमिक शाळांची अनुदाने व कर्जे याबाबत केवळ शिफारस करणे आणि शिक्षण संचालकांची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांचे वाटप करणे.
 3. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संबंधित विद्याथ्र्यास कर्जे व शिष्यवृत्ती देणे.
 4. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या इमारती बांधणे त्या सुस्थित ठेवणे.
 5. इतर शैक्षणिक उद्दिष्टे

वैद्यकीय कामे

 1. तालुका दवाखाने आणि तालुका दवाखान्यांच्या दर्जात वाढ करणे .

वेद्यकीय कामे

 1. तालुका दवाखाने आणि तालुका दवाखान्यांच्या दर्जात वाढ करणे .
 2. जिल्हा व कुटीर रूग्णालये, तसेचं जिल्हा याप्रमाणे असलेली इतर मोठी सरकारी वगळून इतर रुग्णालये
 3. वैद्यकीय व्यवसायाची अर्थसहाय्यीत केंद्रे .
 4. ग्रामीण वैद्यकीय सहाय्य केंद्रे आणि सार्वजनिक वैद्यकिय सहाय्य
 5. कुत्रा चावल्याने होणा-या विषबाधेवर गरीब व्यक्तींवर उपचार करणा-या संस्थांना वित्तीय सहाय्य देणे.

आयुर्वेद पद्धतीने औषधोपचाराची कामे

 1. आयुर्वेदीय, युनानी व समचिकित्सा दवाखाने
 2. आयुर्वेदीय, युनानी व समचिकित्सा औषधांच्या पेट्यातील औषधांचा साठा पुन्हा भरून काढणे

सार्वजनिक आरोग्यासंबंधी कामे

 1. प्राथमिक आरोग्य केंद्रे
 2. फिरती आरोग्य पथके
 3. प्राथमिक आरोग्य पथके
 4. देवी प्रतिबंधक लस टोचणे
 5. शालेय आरोग्य सेवा
 6. यौन रोगाविरूद्ध उपचारासाठी उपाय योजना
 7. गावात औषधांच्या पेट्या ठेवणे
 8. आरोग्य शिक्षणासाठी सुविधा
 9. ग्रामीण स्वच्छता
 10. . सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करणे .
 11. अनारोग्यकारक वस्त्यांची पूर्ववत सुधारणा

इमारती व दळणवळणाची कामे पुढील रस्त्यांचे व पुलांचे बांधकाम करणे, ते सुस्थितीत राखणे व त्यांची दुरूस्ती करणे

 1. ग्रामीण रस्ते
 2. इतर जिल्हा रस्ते
 3. प्रमुख जिल्हा रस्ते आणि
 4. वर उल्लेख केलेल्या रस्त्यांवरील पूल.
 5. ग्रामीण उपवने व उद्याने (राष्ट्रीय उपवने व उद्याने वगळून)
 6. जिल्हा परिषदेच्या गरजांच्या संबंधात प्रशासकीय आणि इतर इमारतींचे बांधकाम
 7. रस्त्यांव्यतिरित दळणवळणाचे इतर मार्ग
 8. सार्वजनिक बांधकामे

सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकीची कामे

 1. ग्रामीण पाणीपुरवठा
 2. ग्रामीण विभागातील जत्रांसाठी संरक्षित पाणीपुरवठा
 3. ग्रामीण जलनिस्सारण
 4. पिण्यासाठी, स्नानासाठी किंवा स्वयंपाकासाठी लागणारे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून त्याचे संरक्षण करण्यासाठी काम

पाटबंधारयाची कामे

लहान पाटबंधा-याची कामे

प्रसिद्धीची कामे

 1. फिरत्या प्रसिद्धी गाड्या
 2. जिल्हा प्रदर्शने आयोजित करणे
 3. करमणुकीच्या कार्यक्रमांद्वारे प्रसिद्धी
 4. ग्रामीण ध्वनिक्षेपण

सामूहिक विकासाची कामे

 1. सामूहिक विकास कार्यक्रम .
 2. स्थानिक विकास कामांचा कार्यक्रम

समाज शिक्षणाची कामे

 1. सामूहिक करमणुक केंद्रे
 2. प्रौढ़ साक्षरता केंद्रे
 3. क्रीडा, खेळ, क्रीडांगणे, साधनसामृग्री आणि कल्याणकारी संघटना
 4. किसान मेळावे
 5. राज्यामधील नियोजित सहली आणि राज्य शासनाच्या पूर्वपरवानगीने, राज्याबाहेरील नियोजित सहली
 6. माहिती प्रस्तुत करणे
 7. महिला संघटना व महिला कल्याण
 8. शिशु संघटना व शिशु कल्याण
 9. फिरत्या चित्रपट गाड्या
 10. ग्रंथालये व वाचनालये
 11. जत्रा, चित्रपट दाखविणे व प्रदर्शन

ग्रामीण गृहनिर्माणाची कामे

 1. ग्रामीण गृहनिर्माण

इतर कामे

 1. ग्रामोद्धार
 2. आदर्श गावे वसविणे (त्या प्रयोजनासाठी द्यावयाची अनुदाने व कर्जे धरून)
 3. गावाचे आर्थिक कल्याण w लोकांचे आरोग्य, सुरक्षितता, सुखसोयी यांची ज्यामुळे वाढ होण्याचा संभव आहे अशी स्थानिकस्वरुपाची बांधकामे किंवा उपाययोजना
 4. बाजार
 5. धर्मशाळा, विश्रांतीगृहे, प्रवाशांसाठी बंगले, पाणपोई वगैरे
 6. चवडया -
 7. इतर सार्वजनिक परिसंस्था
 8. औद्योगिक बेकारी वगळून इतर स्थानिक बेकारी
 9. . गावठाणाची सुधारणा व विस्तार (त्या प्रयोजनासाठी द्यावयाची अनुदाने व कर्जे धरून) .
 10. नवीन गावठाणे बसविणे (त्या प्रयोजनासाठी द्यावयाची अनुदाने व कर्जे धरून) .
 11. जिल्हा परिषदांच्या कर्जचा-याकरीता (घरासाठी जागांची किंवा घरांची) तरतूद .
 12. सार्वजनिक मैदाने व उद्याने यामध्ये झाडे लावणे व त्यांची जोपासना करणे
 13. रानटी जनावरांचा नाश करण्याबद्दल बक्षिसे
 14. . जाहीर स्वागत समारंभ व समारंभ आणि मनोरंजन
 15. स्थानिक यात्रांबाबतची व्यवस्था करणे
 16. दफन भूमि व दहन भूमि
 17. स्थानिक भटक्या गरीब लोकांसाठी सहाय्य
 18. गरीबांची घरे सुस्थितीत ठेवणे .
 19. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये डाक, तार विभागाला ना परतावा, अंशदान देण्याची तरतूद करून तेथे
 20. प्रायोगिक डाक कार्यालयाच्या सुविधा उपलब्ध करून देणे. ग्रामपंचायतींना पुरेशा व सबळ कारणांमुळे शक्य झाले नसेल तेथे अशा सुविधा उपलब्ध करून देणें किंवा त्या चालू ठेवणे
 21. ग्रामदान व भूदान चळवळीचा प्रचार करणे
 22. पंचायत राज प्रशिक्षण केंद्रे

 

स्त्रोत - जिल्हा परिषद व पंचायत समिती (वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट)

3.09615384615
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 22:36:36.645299 GMT+0530

T24 2019/05/20 22:36:36.651864 GMT+0530
Back to top

T12019/05/20 22:36:36.221829 GMT+0530

T612019/05/20 22:36:36.238840 GMT+0530

T622019/05/20 22:36:36.313371 GMT+0530

T632019/05/20 22:36:36.314192 GMT+0530