Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 21:59:30.860982 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / दारीद्रय निर्मुलनासाठी कार्यक्रम
शेअर करा

T3 2019/05/20 21:59:30.865524 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 21:59:30.891469 GMT+0530

दारीद्रय निर्मुलनासाठी कार्यक्रम

भारताच्‍या घटनेत तसेच पंचवार्षिक योजनामध्‍ये सामाजिक न्‍याय हे सरकारच्‍या विकास धोरणाचे प्राथमिक उदिद्ष्‍ट असल्‍याचे सांगण्‍यात आले बहूतेक सर्व धोरणांमध्‍ये दारिद्रय निर्मुलनावर भर देण्‍यात आला आहे

 

प्रस्तावना

भारताच्‍या घटनेत तसेच पंचवार्षिक योजनामध्‍ये सामाजिक न्‍याय हे सरकारच्‍या विकास धोरणाचे प्राथमिक उदिद्ष्‍ट असल्‍याचे सांगण्‍यात आले बहूतेक सर्व धोरणांमध्‍ये दारिद्रय निर्मुलनावर भर देण्‍यात आला आहे.

दारीद्रय निर्मुलनासाठी सरकारने त्रि आयामी दृष्‍टीकोनाचा स्विकार केला आहे.

 1. वृध्‍दीधारित दृष्‍टीकोन
 2. दारिद्रय निमुर्लन कार्यक्रम
 3. किमान मुलभूत सुविधांची तरतूद

वृध्‍दीधारित दृष्‍टीकोन

हा दृष्‍टीकोन अशा अपेक्षेवर आधारलेला आहे की आर्थिक वृध्‍दीचे परिणाम समाजांच्‍या सर्व गटांपर्यंत पसरतील तसेच गरीब जनतेपर्यंत जातील.

मात्र एकंदरीत वृध्‍दी आणि कृषि व उपयोग क्षेत्रातील वृध्‍दी अपेक्षित वेगाने होऊ शकली नाही दुस-या बाजूला लोकसंख्‍येच्‍या विस्‍फोटामुळे दरडोई उत्‍पन्‍नातील वाढ अत्‍यल्‍प ठरली. हरित हानींमुळे प्रादेशिक तसेच वैयक्‍तीक विषमतेत भरच पडली. भुसुधारणा यशस्‍वी होऊ शकल्‍या नाहीत त्‍यामुळे आर्थिक वृध्‍दीचे फायदे जनतेपर्यंत पोहोचू शकले नाहीत.

दारिद्रय निमुर्लन कार्यक्रम

वृध्‍दीधारित दृष्‍टीकोनाला पर्याय म्‍हणून धोरण निर्मात्‍यांनी दारिद्रयावर प्रत्‍यक्ष हल्‍ला करण्‍यासाठी दारीद्रय निर्मूलन कार्यक्रमांची अंमलबजावणीवर भर देण्‍यास सुरुवात केली. या दृष्‍टीकोनाचा अवलंब अल्‍प प्रमाणात तिस-या योजने दरम्‍यान करण्‍यात आल ा व त्‍यानंतर अनुंक्रमे त्‍याचा विस्‍तार करण्‍यात आला

दारिद्रय निर्मूलनाचे तीन प्रकार पडतात
 1. स्‍वयंरोजगाराचे कार्यक्रम
 2. मजूरी रोजगार कार्यक्रम
 3. स्‍वयंरोजगार व मजूरी रोजगारांचे एकत्रिकरण असलेल्‍या योजना

किमान मुलभूत सुविधांची तरतूद

या दृष्‍टीकोनात जनतेला किमान मुलभूत सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍यांचे दारिद्रयाचे प्रश्‍न हाताळण्‍याचा प्रयत्‍न केला जातो.

सार्वजनिक खर्चाच्‍या माध्‍यमातून जनेतेचे राहणीमान उंचावता येऊ शकते या कल्‍पनेचा भारत हा जगात अग्रेसर देश मानला जातो.

या दृष्‍टीकोनातंर्गत कार्यक्रमांच्‍या आधारे रोजगार निर्मिती करणे गरीबांच्‍या उपभोगभर घालणे व शिक्षण व आरोग्‍यात सुधारणा होणे या बाबी अपेक्षित आहेत.

गरीबांच्‍या  अन्‍न व पोषणांचा दर्जा सुधारण्‍यासाठी पुढील तीन कार्यक्रम राबविले जातात.
 1. सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍था
 2. एकात्मिक बाल विकास योजना
 3. राष्‍ट्रीय माध्‍यान्‍ह भोजन योजना
ग्रामीण जनतेच्‍या विकासासाठी राबविण्‍यात येणा-या योजनांमध्‍ये पुढील योजनांचा समावेश होतो.
 1. प्रधानमंत्री ग्राम सढळ योजना
 2. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना
 3. भारत निर्माण योजना
 4. इंदिरा आवास योजना

माहिती संकलक : महादेव जगताप - 9028030769

 

3.03448275862
GAUTAM JADHAV Feb 12, 2016 01:01 PM

PDF format madhe sarva data available karava..

अनिल मारबते Nov 05, 2014 08:40 PM

दारीद्रय निर्मूलनासाठी सरकारच्या उपाययोजना

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 21:59:31.186477 GMT+0530

T24 2019/05/20 21:59:31.192696 GMT+0530
Back to top

T12019/05/20 21:59:30.781830 GMT+0530

T612019/05/20 21:59:30.800829 GMT+0530

T622019/05/20 21:59:30.850387 GMT+0530

T632019/05/20 21:59:30.851104 GMT+0530