Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 22:34:16.775213 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / पंचायत समिती सदस्यांचे कार्य व अधिकार
शेअर करा

T3 2019/05/20 22:34:16.779923 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 22:34:16.803798 GMT+0530

पंचायत समिती सदस्यांचे कार्य व अधिकार

पंचायत समिती सदस्य म्हणून सभेत प्रश्न विचारण्याचा, माहिती घेण्याचा, ठराव व उपसूचना मांडण्याचा व मत देण्याचा, सदस्यांना मूलभूत अधिकार आहे.

पंचायत समिती सदस्य म्हणून सभेत प्रश्न विचारण्याचा, माहिती घेण्याचा, ठराव व उपसूचना मांडण्याचा व मत देण्याचा, सदस्यांना मूलभूत अधिकार आहे. आपल्या मतदारसंघातील कामांवर लक्ष देणे, कामाचा दर्जा सांभाळला जात नसल्यास ती बाब संबंधित अधिका-यांच्या निदर्शनास आणणे व त्यांनतरही समाधानकारक परिणाम न झाल्यास त्यासंबंधी सभेत प्रश्न उपस्थित करणे हे पंचायत समिती सदस्याचे काम आहे. पंचायत समितीची कामे व विकास कार्यक्रमासंबंधी माहिती मिळविण्याचा सदस्यांचा अधिकार असून तो सभेत वापरता येतो. सभेत प्रश्नाची पूर्वसूचना देऊन लेखी प्रश्न विचारता येतात. प्रशासनाने उत्तरावर उपप्रश्न विचारुन सत्य उघडकीस आणता येते.

पंचायत समिती सभेतील मुद्दे

पंचायत समितीच्या मासिक सभेत प्रत्येक खात्याचा अहवाल सादर केला जातो; त्यावेळी समाधान न झाल्यास आपले मत सभेच्या निदर्शनास आणून सुधारणा करण्याच्या दृष्टीने सूचना करता येतात. : ग्रामपंचायतीसंबंधी पंचायत समितीची जबाबदारी असून आपल्या भागातील ग्रामपंचायतीच्या कार्यातील अडचण दूर करुन मार्गदर्शन करण्याचे काम पंचायत समिती सदस्यांना करता येते.

पंचायत समितीच्या सभेपुढे शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांकडून आलेले आदेश व परिपत्रकांची माहिती दिली पाहिजे अशी सूचना आहे. ही माहिती सदस्यांना आपल्या भागात कार्य करण्यास उपयुक्त असते. ग्रामविकासाच्या कार्यात शिक्षणाला खूप महत्व असून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत प्रामुख्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची जबाबदारी आहे. इमारत सुविधा, स्वच्छता, मुलांना पिण्याचे पाणी इत्यादी बाबतीत सदस्याने लक्ष दिल्यास त्यांचे चांगले परिणाम होतात. आश्रमशाळेत मुलांच्या आहाराची व राहण्याची व्यवस्था सरकारी नियमानुसार होते की नाही याकडेही लक्ष देता येते.

पंचायत समिती सदस्यांचे कार्य

जवाहर रोजगार योजना, एकात्मिक ग्रामीण विकास योजना पंचायत समितीद्वारे राबविल्या जातात. हे काम प्रामुख्याने कर्मचारी करतात. त्यात आपला वाटा नाही अशी सदस्यांची समजूत असते. योजनेची माहिती सदस्यांना मिळते की नाही, अर्ज मंजूर करण्यास योग्य कार्यवाही होते की नाही व लाभार्थीना त्याचा पूर्ण लाभ मिळतो की नाही या बाबीकडे सदस्यांनी लक्ष दिले पाहिजे.

पंचायत समिती क्षेत्रातील जिल्हा परिषद व शासनाची कामे यावर देखरेख ठेवून कामाची d सांभाळली जात नसेल किंवा भ्रष्टाचार होत असेल तर पंचायत समिती सदस्याला लक्ष घालता येते.

पंचायत समितीचे कार्य प्रामुख्याने विकास कामांची कार्यवाही व देखरेख ठेवण्याचे असून कामाचा दर्जा सुधारण्यास व भ्रष्टाचाराला आळा घालण्यास पंचायत समितीचा जागृत व कार्यतत्पर सदस्य महत्वाचे काम करु शकतो.

 

स्त्रोत - जिल्हा परिषद व पंचायत समिती (वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट )

3.24
विशाल अशोक केंबारी Apr 29, 2019 11:47 PM

पंचायत समिती सदस्य ला कोण कोणते अधिकार असतात
आणि पंचायत समिती सदस्य कुठली कुठली कामे करू शकतो
एवढंच नव्हे तर सदस्यांच्या हातात कुठले अधिकार असतात

सौ उषाताई उद्धवराव थुट्टे Jan 07, 2018 05:43 AM

सदस्याचे अधिकारी ऐकत नसल्यास त्यासाठी काय उपाय व ग्रामसेवकाचे रेकॉर्ड तपासण्याचे अधिकार पंचायतसमिती सदस्यांना आहे का?

सौ उषाताई उद्धवराव थुट्टे Jan 07, 2018 05:43 AM

सदस्याचे अधिकारी ऐकत नसल्यास त्यासाठी काय उपाय व ग्रामसेवकाचे रेकॉर्ड तपासण्याचे अधिकार पंचायतसमिती सदस्यांना आहे का?

सौ उषाताई उद्धवराव थुट्टे Jan 07, 2018 05:43 AM

सदस्याचे अधिकारी ऐकत नसल्यास त्यासाठी काय उपाय व ग्रामसेवकाचे रेकॉर्ड तपासण्याचे अधिकार पंचायतसमिती सदस्यांना आहे का?

सौ उषाताई उद्धवराव थुट्टे Jan 07, 2018 05:31 AM

सदस्याचे अधिकारी ऐकत नसल्यास त्यासाठी काय उपाय व ग्रामसेवकाचे रेकॉर्ड तपासण्याचे अधिकार पंचायतसमिती सदस्यांना आहे का?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 22:34:17.114887 GMT+0530

T24 2019/05/20 22:34:17.121515 GMT+0530
Back to top

T12019/05/20 22:34:16.674073 GMT+0530

T612019/05/20 22:34:16.691030 GMT+0530

T622019/05/20 22:34:16.764220 GMT+0530

T632019/05/20 22:34:16.765027 GMT+0530