Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 18:38:56.109238 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / पंचायत समितीचे महत्व
शेअर करा

T3 2019/10/17 18:38:56.114753 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 18:38:56.144475 GMT+0530

पंचायत समितीचे महत्व

पंचायत समिती जरी जिल्हा परिषदेची उपसिमिती असली तरी ती जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांसारखी नसून वेगळी आहे.

पंचायत समिती जरी जिल्हा परिषदेची उपसिमिती असली तरी ती जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांसारखी नसून वेगळी आहे.

महत्व

पंचायत समितीची निवड मतदार प्रत्यक्ष मतदानाने करतात. त्यामुळे ती प्राथमिक दृष्ट्या सर्वसामान्य लोकांना जबाबदार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लोकप्रातिनिधिक संस्था म्हणून तिला नैतिक अधिकार व कंत्र्य करण्याची क्षमता जास्त आहे. तालुका स्तरावर पंचायत राज्य साखळीतील महत्वाचा दुवा म्हणून जिल्हा परिषदेच्या उपसमितीच्या दर्जापेक्षा काही अधिक अधिकार कायद्याने पंचायत समितीलस दिले आहेत. गट अनुदान व जमीन महसूल उपकरांचे उत्पन्न, ग्रामपंचायतीबाबत नियंत्रण व मार्गदर्शन करण्याचे कार्य, हे पंचायत समितीचे काम जिल्हा परिषदेच्या इतर समित्यांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे असून त्याला महत्वाचे स्थान आहे.

त्रिस्तरीय व्यवस्थेत संघटनात्मक दुवा अधिक आशयपूर्ण असण्याची आवश्यकता आहे. सध्या पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे पूर्ण अधिकार असलेले सदस्य असल्याने जिल्हा परिषदेच्या कामात प्रतिनिधित्व करून त्यांना काम करता येते. ग्रामपंचायतीशी पंचायत समितीचा निकटचा संबंध असून नसले तरी सरपंचांच्या समितीने विचारविनिमय व सळुा देण्यास कायद्यात व्यवस्था करण्यात आली आहे. पंचायत समितीला ही जाणीव ठेवून काम करावयाचे आहे. पंचायत समिती तशी स्वायत्त संस्था नसून आपल्या कार्यक्षेत्रातील मधल्या स्थानाचे काम तिला करावयाचे आहे.

पंचायत समितीचे कार्य

पंचायत समितीचे स्वत:चे उत्पन्न नाममात्र आहे, त्यामुळे निर्णय घेण्यास मर्यादा आहेत. पंचायत समितीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाचे घटक असून वित्तीय व्यवहारांचे अधिकार पंचायत समितीकडे नाहीत. पंचायत समितीची वेगळी कर्मचारी यंत्रणा नसून ती जिल्हा परिषद यंत्रणेचाच भाग आहे.

पंचायत समितीचे कार्य या मर्यादेचा विचार करूनही महत्वाचे व उपयुक्त आहे. पंचायत समितीचे सदस्य लोकांच्या आशाआकांक्षा, अडीअडचणी मांडू शकतात. पंचायत समितीच्या कामाचा गाभा जिल्हा परिषद व शासनाच्या तालुका योजनेची कार्यवाही व त्यावर देखरेख ठेवणे आहे. त्यामुळे कागदावरच्या सध्याची अकार्यक्षम व आशयहीन नोकरशाही व भ्रष्ट्राचाराने वेढलेल्या काळात पंचायत समितीच्या कार्याचे महत्त्व यत्किंचितही कमी नाही.

पंचायत समितीने आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करून चालना दिल्यास त्यांना आपले काम प्रभावीपणे करता येईल. ग्रामपंचायतीचे काम हे आपलेच अभिन्न कार्य आहे याची जाणीव पंचायत समितीने सतत ठेवली पाहिजे. कल्पकतेने पुढाकार घेऊन या बाबतीत भरीव व अर्थपूर्ण कार्य करण्यास खूप वाव आहे.

 

स्त्रोत - जिल्हा परिषद व पंचायत समिती (वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट )

 

2.98333333333
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 18:38:56.457725 GMT+0530

T24 2019/10/17 18:38:56.464795 GMT+0530
Back to top

T12019/10/17 18:38:55.992607 GMT+0530

T612019/10/17 18:38:56.013370 GMT+0530

T622019/10/17 18:38:56.097697 GMT+0530

T632019/10/17 18:38:56.098607 GMT+0530