Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 18:37:19.919962 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / लोकसंख्या वाढीचे कारणे
शेअर करा

T3 2019/10/17 18:37:19.925321 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 18:37:19.951957 GMT+0530

लोकसंख्या वाढीचे कारणे

जन्म-मृत्युदर अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा वैद्यकीय सुविधांचा अभाव व अज्ञान, बालमृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण, निरक्षरता

लोकसंख्या वाढीचे कारणे खालीलप्रमाणे आहेत

१) जन्म-मृत्युदर :- आपल्या देशात मृत्युदरात घट झालेली आढळून येते. परंतु जन्मदर मात्र त्या मानाने घटलेली नाही. आपल्या देशाचा १००० लोकांमध्ये जन्मदर २७.५ आहे व मृत्युदर ०.५ आहे. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होते.

२) अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा :- समाजामध्ये काही अंधश्रद्धा असतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मेल्यावर पाणी पाजण्यास व अग्नी देण्यास इस्टेटीला वारस पाहिजे, मुलगाच पाहिजे, त्यामुळे मुलाची वाट पहात कुटुंबात माणसे वाढतात. मुलगी ही परक्याचे धन समजले जाते त्यामुळे मुलगा होईपर्यंत कुटुंब नियोजन केले जात नाही. काही वेळेस पहिल्या पत्नीला मुलीच झाल्या तर दुसरा विवाह केला जातो व त्या पत्नीकडूनही कुटुंब वाढविले जाते. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होताना दिसून येते.

३) जन्म ही ईश्वरी देणगी आहे :- काही समाजामध्ये कुटुंब नियोजन करणे पाप मानले जाते. जन्म ही ईश्वरीय देणगी समजले जाते. या अंधश्रद्धेपोटी लोकसंख्या वाढ होताना आढळून येते.

४) वैद्यकीय सुविधांचा अभाव व अज्ञान :- वैद्यकीय सुविधा असून देखील त्या ग्रामीण भागामध्ये पोहोचत नाहीत. काही वेळेस कुटुंब नियोजनांच्या साधनांची माहिती असते. परंतू त्याची उपलब्धता नसल्यामुळे म्हणजेच या सुविधांचा अभाव असल्यामुळे तीचा वापर केला जात नाही. गैरसमजुती व अज्ञानामुळे माहिती देवून देखील त्याचा वापर केला जात नाही. या कारणांमुळे लोकसंख्येमध्ये वाढ होताना दिसून येते.

५) बालमृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण :- ग्रामीण भागांमध्ये बालमृत्यूचे व अर्भक मृत्यूचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक मुलांना जन्म दिला जातो. त्यामुळेही लोकसंख्येमध्ये वाढ होते.

६) मुलीच्या लग्नाचे वय :- ग्रामीण भागामध्ये १५ ते १६ व्या वर्षीच मुलीचे लग्न करून दिले जाते. लग्न झाल्यावर लवकर मुले होतात. त्यावर नियंत्रण करण्याकरिता तिला कुटुंबनियोजनाबद्दलच्या साधनांचा व माहितीचा अभाव व अज्ञान असते. या वयामध्ये ती कोणत्याही गोष्टींचे निर्णय कुटुंबामध्ये घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत ती गर्भधारणा करू शकते. त्यामुळे अनेक अपत्य जन्माला येतात. हे देखील लोकसंख्या वाढीमध्ये भर घालणारे घटक आहेत.

७) निरक्षरता :- आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. निरक्षरतेमुळे अंधश्रद्धा वाढतात. अशी लोकसंख्या वाढली तर माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. शिवाय शासनालासुद्धा आरोग्य सुविधा व इतर सुविधा पुरविणे अवघड होते. तेव्हा ही लोकसंख्यावाढ थांबविण्यासाठी विविध स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील स्त्री पुरुषामध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. लोकसंख्यावाढीमुळे अनेक अडचणी उभ्या राहतात. त्या संबंधीची जाणीव लोकांमध्ये निर्माण करायला हवी.

स्त्रोत : लोकसंख्या शिक्षण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

3.24920127796
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
शैलेश gaikwad Nov 29, 2017 09:59 PM

आज
वाढत्या लोकसंख्ये ला आपणच जबाबदार आहे .त्यामुळे
प्रत्येक कुटुंबात दोन वारस असलेपाहिजे .ते मुलं मुलगा असो किंवा मुलगी
अशा नियोजनामिळे.कुटुंब तयार होईल . आणि घरातील कर्त्या ला हि छोटा कुटुंबाचा पालन करता येईल .लोकसंख्या हि स्थिर राहिल.

पूजा गोसावी Jul 10, 2017 11:01 AM

मला असं वाटत कि एका घरात फक्त एकच अपत्य असावे कारण असे कि घरात कमविणारा एकच व्यक्ती असल्यामुळे त्याच्यावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतात व तो स्वतःचे जीवन संपवतो व तो त्याच्या काही गरजा पूर्ण करत नसतो .

राम पवार Jun 27, 2017 11:47 AM

लो.सं.आळा घालण्यासाठी समाजातील अंधश्रधेचे ऊच्चाटन करुन.
समाजात जन जाग्रुती करने व सर्वात महत्त्वाच शिक्षण देणे .

datta sakhare Jul 29, 2016 02:10 PM

दोन मुलापेक्षा
जास्त मुले
असतील
तर मोठा
दंड
बसवाला
पाहिजे

सुरेश जोशी Nov 19, 2015 02:26 PM

१ मी तर म्हणेन एक कुटूंब दोन अपत्ये ते एवढ्या साठी की एक स्त्री अपत्य व एक पुरूष अपत्य जेणेकरून पुढे लग्नाचा प्रश्न निर्माण होणार नाही
२ इच्छा मरण कायदेशीर करावे उलटपक्षी प्रोत्साहनपर रक्कम द्यावी
३ ऑफीसीयल सुसज्ज कुंटनखाने सरकारी असावीत, जेणेकरून आपल्या कामिक इच्छा तृप्त करू शकतील.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 18:37:20.406500 GMT+0530

T24 2019/10/17 18:37:20.413322 GMT+0530
Back to top

T12019/10/17 18:37:19.800840 GMT+0530

T612019/10/17 18:37:19.818342 GMT+0530

T622019/10/17 18:37:19.899800 GMT+0530

T632019/10/17 18:37:19.900713 GMT+0530