Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:54:52.882103 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / लोकसंख्या वाढीचे परिणाम
शेअर करा

T3 2019/10/14 06:54:52.886868 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:54:52.912876 GMT+0530

लोकसंख्या वाढीचे परिणाम

लोकसंख्या वाढीमुळे येणाऱ्या अडचणी व परिणाम अन्नधान्याचा तुटवडा, अपुरा निवारा, दळणवळण, शैक्षणिक, आरोग्य सुविधा यांचा अभाव.

१. अन्नधान्याचा तुटवडा – कुटुंबांमध्ये जास्त माणसे वाढली तर सर्वांना नीट आहार देणे अशक्य होते. कारण त्यावर खर्च जास्त होतो. उत्पन्न कमी व त्यामुळे महागाई वाढते. दुष्काळ पडला तर अन्नधान्य महाग होते व त्याचा पुरवठा करणे शासनाला देखील कठीण जाते. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीसाठी लागणा-या पाण्याची टंचाई तसेच पाणी अनेक कारणांसाठी वापरावे लागते. त्यामध्ये जर दुष्काळ पडला तर पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतीला पाणी देता येत नाही व अन्न धान्य मोठया प्रमाणावर म्हणजेच लोकसंख्येच्या प्रमाणत पिकविता येत नाही त्यामुळे महागाई वाढते व कुटुंबाला पुरेसा आहार मिळणे कठीण होते व यामधूनच कुपोषणाचे प्रमाण वाढते व अनेक रोग आजारांना सामोरे जावे लागते.

२. अपुरा निवारा – पूर्वी जर कुटुंबात ठरावीक माणसे राहत असतील तर त्यांना ते घर राहण्यास पुरते. परंतु त्याच कुटुंबात अनेक सदस्य वाढले तर ते घर अपुरे पडते व दुसरे बांधावे लागते. जरी जास्त घरे बांधली तरी जमीन वाढत नाही. त्याचा परिणाम अन्नधान्य पिकविण्यावर होते.

३. दळणवळण, शैक्षणिक, आरोग्य सुविधा यांचा अभाव – लोकसंख्या वाढल्यामुळे प्रवासाच्या ज्या सुविधा आहेत त्या अपु-या पडतात. तसेच अपघातांचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर शाळा कॉलेजमध्ये विध्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे गरीब मुलांना शिक्षण घेणे अवघड होते. वरील अडचणीबरोबर शासनाला आरोग्य सुविधा पुरविणे अवघड होते.

४. जंगलतोड – जळणासाठी लाकूड, घरबांधणी / फर्निचर यासाठी माणसाने जंगलतोड केली. लोकसंख्या वाढीचा परिणाम निसर्गावर झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले. तसेच उद्योगासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी सुद्धा जंगलतोड झाली. याचा परिणाम पाऊस वेळेत न पडण्यावर झाला.

५. स्थलांतर – नोकरी व्यवसायाच्या शोधार्थ होणा-या स्थलांतरामुळे शहरांची झपाटयाने वाढ होते व शहराच्या सर्व यंत्रणांवर ताण पडू लागतो. कारखान्याच्या धुराने, घाण पाणी नदीमध्ये सोडल्याने पाणी दूषित होते. वाहनामुळे हवा प्रदूषण होते.

६. साधनसंपत्ती व उर्जेची कमतरता भासते.

७. गुन्हेगारीचे वाढते प्रमाण – शिक्षण जरी मिळाले तरी नोकरी मिळत नाही व गरिबी असल्यामुळे जीवन व्यवस्थित जगता येत नाही, त्यामुळे गुन्हेगारी व अत्याचाराचे प्रमाण वाढते.

वरील सर्व कारणांमुळे आपल्याला स्वस्थ व सुरक्षित जीवन जगता येत नाही. ह्या सगळ्यांची तीव्रता कमी करायची असेल तर त्यावरचे उपाय आपण लगेचच आणि आपल्या कुटुंबापासून सुरु केले पाहिजेत.

स्त्रोत :लोकसंख्या शिक्षण,माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका,वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

3.17631578947
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
Jayesh Lendi Mar 05, 2018 12:45 PM

रस्त्याच्या कडेला असणा-या वनस्पतींवर वाहनांचा होणारा परिणाम.

दिनेश ठाकरे Feb 19, 2018 07:14 AM

सर मला प्रदुषण या विषयी माहिती हवी

VIJAY SUBHASH DAYARE Feb 01, 2018 04:09 PM

वाढत्या लोकसँख्येचे दुष्परीणाम काय होत आहे?

Kumar R. B. Jul 30, 2017 07:27 PM

मला मानवी विकास अर्थकारण आणि पर्यावरण याची माहिती हवी आहे

yogesh Dudhavade Jul 19, 2017 07:13 PM

Tree save and water save

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:54:53.253351 GMT+0530

T24 2019/10/14 06:54:53.263588 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:54:52.779777 GMT+0530

T612019/10/14 06:54:52.797795 GMT+0530

T622019/10/14 06:54:52.871545 GMT+0530

T632019/10/14 06:54:52.872487 GMT+0530