Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 18:31:38.834854 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / शेतमजूर महिलेने अवयवदानातून दिले पाच जणांना जीवन
शेअर करा

T3 2019/10/17 18:31:38.839966 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 18:31:38.886082 GMT+0530

शेतमजूर महिलेने अवयवदानातून दिले पाच जणांना जीवन

अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असे साधू संतापासून सर्वचजण सांगतात

अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असे साधू संतापासून सर्वचजण सांगतात मात्र सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अनिता डिकरे या शेतमजूर महिलेने अवयवदानाद्वारे स्वतःचे जीवन सार्थक बनवत तब्बल पाच जणांना जीवनदान देऊन हे सिद्ध करून दाखविले आहे.

अनिता डिकरे या आपल्या सहकाऱ्यांसह 6 ऑक्टोबर रोजी शेतात मजुरीने काम करीत होत्या. यावेळी वीज पडून झालेल्या दुर्घटनेत त्या बेशुद्ध पडल्या तर त्यांच्या सहकारी महिलेचे जागेवरच निधन झाले. अनिता यांना सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान 10 ऑक्टोबरला त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यानंतर मेंदूरोग तज्‍ज्ञ डॉक्टर आशिष भुतडा व डॉक्टर आनंद मुदकन्ना यांनी ब्रेन डेड असल्याचे घोषित केले. यानंतर यशोधरा रुग्णालयातील तज्‍ज्ञ डॉक्टरांनी अनिता यांच्या कुटुंबियांचे अवयवदानासंदर्भात समुपदेशन केले. अनिता यांच्या कुटुंबियांनी अवयवदानाला होकार देताच पुणे येथील विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीशी संपर्क साधून अवयदानाची कल्पना दिली आणि योग्य लाभार्थ्यांचा शोध घेतला.

अवयवदानाच्या सर्व प्रक्रिया व वैद्यकीय तयारी केल्यानंतर अनिता यांचे यकृत बिर्ला रुग्णालय पुणे येथे, किडनी आणि नेत्र सोलापूर येथे दान करण्यात आले. यामुळे पाच जणांना जीवनदान मिळाले. विशेष म्हणजे अवयवदान करणारी महिला व प्रत्यारोपण केलेले रुग्ण हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत हा योगायोगच आहे. अवयवदानाची ही सोलापूर जिल्ह्यातील तिसरी घटना असून महिलेने अवयवदान करण्याची ही पहिलीच घटना आहे.

अवयदानाची ही प्रक्रिया वेळेत पार पाडण्यासाठी सोलापूर पोलीस, वाहतूक विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह पोलीस आयुक्त स्वतः हजर होते. अनिता यांचे यकृत पुणे येथे नेण्यासाठी सोलापूर ते पुणे हा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. रुग्णवाहिकेने सोलापूर ते पुणे हे 250 किमीचे अंतर 3 तासात पार केले व बिर्ला रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया वेळेत पार पाडण्यात आली. तर एक किडनीची शस्त्रक्रिया यशोधरा रुग्णालयात व एका किडनीची अश्विनी कुंभारी रुग्णालयात तर नेत्र शस्त्रक्रिया सोलापूर शासकीय रुग्णालयात पार पाडण्यात आली.

यशोधरा रुग्णालयातील डॉक्टर विजय शिवपुजे, हेमंत देशपांडे, बसवराज कोलूर, पैके, मंजिरी देशपांडे, डॉक्टर स्वामी यांच्यासह व्यवस्थापकीय अधिकारी विजय चंद्र यांच्या पथकाने हे अवयवदान यशस्वी केले.

लेखक - मोतीचंद बेदमुथा, उस्मानाबाद.

माहिती स्रोत : महान्यूज

3.07692307692
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 18:31:39.211523 GMT+0530

T24 2019/10/17 18:31:39.218483 GMT+0530
Back to top

T12019/10/17 18:31:38.731128 GMT+0530

T612019/10/17 18:31:38.760107 GMT+0530

T622019/10/17 18:31:38.820442 GMT+0530

T632019/10/17 18:31:38.821304 GMT+0530