Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 22:24:31.280915 GMT+0530
शेअर करा

T3 2019/05/20 22:24:31.285545 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 22:24:31.309389 GMT+0530

अटल पेन्शन योजना

अटल पेन्शन योजना ही निवृत्ती नंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे.

अटल पेन्शन योजना ही निवृत्ती नंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. ही योजना मुख्यतः असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी, ज्यांच्यासाठी कुठलीही पेन्शन योजना उपलब्ध नाही, अशासाठी लाभदायक आहे. बँका व पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सहयोगाने ही योजना कार्यान्वित होणार आहे.

18 ते 40 वयोगटातील असंघटित क्षेत्रातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. 18 वर्षे वयाच्या व्यक्तीने दरमहा 42 रूपये भरल्यास या व्यक्तीला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक हजार रूपये दरमहा पेन्शन मिळू शकेल. याच धर्तीवर दरमहा 210 रूपये भरल्यास पाच हजार रूपये दरमहा पेन्शन मिळू शकेल. दर महिन्याचे योगदान बचत खात्यातून परस्पर नावे टाकण्याची सोय आहे.

या योजनेत ग्राहकाच्या योगदानाबरोबरच पहिली पाच वर्षे (2015-16 ते 2019-20) सरकारचेही योगदान राहणार आहे. हे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या 50 टक्के किंवा एक हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी असणार आहे. ज्या ग्राहकांसाठी कुठलीही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध नाही आणि जे ग्राहक आयकर दाते नाहीत अशाच ग्राहकांना हे योगदान मिळणार आहे. ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीस ही पेन्शन चालू राहील. दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एक रकमी परत करण्यात येणार आहे.

 

स्त्रोत : महान्युज

 

3.07692307692
नैना भंडारवार Mar 16, 2019 10:04 AM

हि योजना आता सुरु आहे का ? सुरु असल्यास मी त्या योजनेचा लाभ घेऊ शकते का?

रितेश कुरील Mar 24, 2018 07:30 PM

अटळ पेन्शन योजनेचा फार्म कुठे मिळतील?

प्रशांत स Apr 21, 2017 02:34 PM

मला sbi मधून cbi मध्ये अटळ पेन्शन
Transfer karne aahe

अमित पातुनकर Dec 17, 2016 05:12 PM

आजच महाराष्ट्र बॅंके च्या शाखेत मी अटल पेन्शन योजना सुरु केली. दरमहा मला माझ्या चालु वयानुसार ( ३१) ६१०/- रु मासिक रक्कम भरावी लागेल.

राहुल राजगुरु Aug 06, 2016 11:04 AM

या योजनेबद्दल सविस्तार माहिती द्यावी mo 95*****92

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन
Related Languages

T5 2019/05/20 22:24:31.720492 GMT+0530

T24 2019/05/20 22:24:31.726625 GMT+0530
Back to top

T12019/05/20 22:24:31.192005 GMT+0530

T612019/05/20 22:24:31.209325 GMT+0530

T622019/05/20 22:24:31.270912 GMT+0530

T632019/05/20 22:24:31.271666 GMT+0530