অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वन रँक वन पेन्शन योजना

समान हुद्दा समान निवृत्तीवेतन अर्थात (वन रँक वन पेन्शन)

वन रँक वन पेन्शन म्हणजे सैन्य दलात समानकाळ सारख्याच पदावर सेवा केलेले दोन माजी सैनिक जरी वेगवेगळ्या वेळी निवृत्त झाले तरी त्या दोघांना सारखेच निवृत्तीवेतन मिळणे.

निवृत्ती वेतनासाठीचे नियम :

सेवा निवृत्ती वेतन : अखेरच्या पगाराच्या किंवा मागील १० महिन्यांच्या सरासरी पगाराच्या ५०% यापैकी जे जास्त असेल ते,  कमीतकमी ९००० रुपये प्रती महिना . यासाठी अधिकारी पदावर असलेल्या व्यक्तीची २० वर्षे तर त्या दर्जाखालील व्यक्तीची १५ वर्षे सेवा अत्यावश्यक

सामान्य कुटुंब निवृत्तीवेतन : अखेरच्या पगाराच्या ३०%,  कमीतकमी ९००० रुपये प्रती महिना (व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास)

विशेष कुटुंब निवृत्तीवेतन : अखेरच्या पगाराच्या ६०% (सेवेत असताना मृत्यू झाल्यास )

उदारीकृत कौटुंबिक निवृत्तीवेतन : वीरमरण / हुतात्मा झाल्यास अखेरच्या पगाराइतके निवृत्तीवेतन

अपंग निवृत्तीवेतन : वित्त मंत्रालय, खर्च विभागाच्या अनोमाली कमिटीकडे बाब संदर्भित केलेली आहे

युद्धजखमी निवृत्तीवेतन : युद्धात जखमी होऊन १००% अपंगत्व आल्यास शेवटच्या पगाराइतके,  आणि १००% पेक्षा कमी अपंगत्व आल्यास शेवटच्या पगाराच्या ६०%

 

निर्णय

-    १ जुलै २०१४ पासून अंमलबजावणी

-    थकीत रक्कम सहा महिन्यांच्या हप्त्यात चार वर्षात देणार

-    दर पाच वर्षांनी योजनेची समीक्षा केली जाईल

-    एकसदस्यीय समितीकडून समीक्षा केली जाईल

-    स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्यांना लाभ मिळणार नाही

-    निवृत्तीवेतनासाठी २०१३ वर्ष आधारभूत मानले जाईल

 

संदर्भ : पूर्व सैनिक कल्याण विभाग, भारत सरकार

अंतिम सुधारित : 8/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate