काही वर्षापूर्वी मी मित्राच्या गावावरून येत होतो. एका तांडयापाशी रस्त्याच्याकडेला अनेक लोक जमले होते. त्यांच्या हातात. दगड, काठया अशी अयुधे होती. काय चालले आहे. याचे कुतूहल निर्माण झाले. म्हणून जवळ जावून पाहिले. तर ते सगळे लोक मिळून एका छोटयाश्या बिनविषारी सापाला दगडाने ठेचून मारण्याच्या तयारीत होते. तो बिचारा जिवाच्या अकांताने सरपटत होता. मी पटकन समोर गेलो आणि त्या सापाला उचलले आणि खीशात टाकले. अशा प्रकारे त्या मुक्या प्राण्याचा जिव वाचवला व त्याला जंगलात सोडून दिले. हा प्रसंग सांगितला आहे. नांदेड येथील सदैव सक्रिय असणारे सर्पमित्र संजय नरसिंग अडगुलवार यांनी, हे सांगत असताना अचानकपणे त्यांचा कंठ दाटून आला. कसाबसा हुंदका आवरत, ते पुढे म्हणाले की, हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग आहे. त्या मुक्या प्राण्याची ती धडपड,सरपटत दगडे चुकवणे. हे आजही आठवल की माझा असाचं कंठ दाटून येतो. साप दिसला की लोक त्याच्या जीवावरचं उठतात. त्यांनाही जीव असतो. संवेदना असतात. ते या निसर्गाच्या चक्रातील एक महत्वाचा घटक आहेत. त्यांना मारणार्यांचा आणि वाचवणार्यांचा स्पर्श कळतो. ते वाचवणार्याला कधीही दंश करत नाहीत. असा माझा अनुभव आहे.10-12 वर्षाचा असल्यापासून मला मुक्याप्राण्यांविषयी अतिव ओढ आहे. याचं ओढीतून सापांविषयी उत्सुक्ता, प्रेम आणि त्यांना वाचवण्याचे कार्य मी सुरू केले. सुरवातीला मी साप पकडायचो तेंव्हा घरच्या लोकांनी मला खुप विरोध केला. सापांविषयी वाटणारे प्रेम व त्यांना वाचवण्याची तिव्र ईच्छा यामुळे शेवटी त्यांनीही मला विरोध करणे सोडून दिले.नांदेड शहर व अजूबाजूच्या खेडयांतून मानवी वस्तीत निघणार्या सापाचा जीव वाचवून त्यांचे वनविभागाच्या मदतीने जंगलात सोडण्याचे कार्य संजय अडगुलवार हे अनेक वर्षापासून करत आहेत. वर्षाकाठी साधारण 400-500 साप ते जंगलात नेऊन सोडतात. नांदेड येथील अबचलनगर येथे त्यांचे छोटेसे किराणा दुकान व घर आहे. त्यांनी बी.एस.सी. पर्यंत शिक्षण घेतले आहे. 1990 पासून ते सर्पमित्र म्हणून काम करत आहेत. त्यांनी व त्यांच्या काही मित्रांनी मिळून सर्पमित्र सेवा संस्था स्थापन केली आहे. या संस्थे मार्फत ते लोकांत सापांविषयी असलेले समजगैरसमज दूरकरण्याचे, सापांचे निसर्गातील महत्व लोकांना समजून सांगण्याचे काम करतात. संजय अडगुलवार यांना कु. संजना व मंथन असे दोन मुले आहेत. त्यांची मुलगी संजना हिलाही त्यांनी साप पकडण्याचे शिक्षण दिले आहे. ती लहापणापासून वडिलांना पकडलेल्या सापांना जंगलात सोडण्यापूर्वी त्यांची काळजी घेण्यात मदत करते. मानवी वस्त्यांमधून साप पकडल्यानंतर 24 तासात त्या सापांचे जंगलात पूर्नवसन करणे कायद्याने बंधनकारक आहे. तो नियम मी कटाक्षाने पाळतो. आजपर्यंत मी हजारो साप पकडले आहेत. त्याची नोंद मीे ठेवली आहे. साप पकडने हे काम अतिशय जिकरीचे असते. सापाच्या अनेक विषारी, निमविषारी व बिनविषारी जाती आढतात. कोणताही साप चावला तरी त्यावर ईलाज घेतालाच पाहिजे. जरी बिनविषारी साप चावला तरी तो जे उंदीर, बेडूक व इतर खाद्य खात असतो, त्यामुळे त्याच्या तोंडात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. या बॅक्टेरियामुळे ईन्फेक्शन होऊ शकते. ते टाळण्यासाठी डॉक्टरी ईलाज घेतलाचं पाहिजे. असे ते अवर्जून सांगतात. या कामासाठी त्यांना सरकारकडून काही मदत मिळते का? असा प्रश्न विचारला असाता.अडगुलवार म्हणाले, नाही. 2012 मध्ये नांदेड येथील एक नगरसेवक अजयसिंह बिसेन यांच्या पुढाकाराने आम्हाला साप पकडण्याचे अवजारे व इतर साहित्य वाटप करण्यात आले होते. तसेच नांदेड मनपाने आम्हाला सर्पमित्र म्हणून ओळखपत्र दिले होते. त्यानंतर आजपर्यंत शासनाकडून या कामासाठी कुठलेही मानधन अथवा मदत आम्हाला मिळाली नाही. येवढेच नाही तर कोणतीही विमा कंपनी आमचा विमा काढत नाही. आमच्या एका सर्पमित्रला, एका घरातून विषारी साप पकडत असताना, साप चावला. त्यामुळे त्याला अनेक दिवस दवाखान्यात राहावे लागले होते व बचराच काळ उपाचार घ्यावे लागले होते. त्यात खूप खर्च झाला. त्याला कोणीही मदत केली नाही. अशी बिकट परिस्थिती आमच्यावर कधीही येऊ शकते. मनपा अथवा सरकारी अधिकार्यांना मदत मागितली तर ते म्हणतात, तुम्हाला साप पकडायला आम्ही सांगितले आहे काय? मग कसले मानधन आणि कसली मदत ? ज्यांच्या घरात साप निघतात ते लोक मला फोन करून बोलावतात. त्यांना मी मदत करतो. त्याबद्ल्यात मी कुठलेही मानधन,फीस घेत नाहीत. कारण जर आम्ही या लोकांना मानधन मागीतले तर ते आम्हाला बोलावणार नाहीत. त्या ऐवजी साप दिसला की दगड घेवून ते त्याला मारून टाकतील. ही भिती मला कायम वाटते. तेच मला नको आहे. साप जगले पाहिजेत. आज निसर्गातून मोठ्या प्रमाणात साप अदृश्य होत आहेत. त्यांची संख्या दिवसेेंदिवस कमी होत आहे. अशावेळी त्यांना वाचवणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तिच जबाबदारी मी घेतली आहे. कुठले मानधन मिळो अथवा न मिळो मी सापांना वाचणार, त्यांचे रक्षण करणार आहे. ते शेतकर्यांचेचं नव्हे तर प्रत्येक माणासाचे मित्र आहेत. पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत. सापांचा आणि लोकांचा जीव वाचण्याचे कार्य स्वतःचा जीव धोक्यात घालून संजय अडगुलवार करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेवून अनेकांनी त्यांचे सत्कार केले, कौतुक केले. मात्र या कामासाठी त्यांना कुठलीही अर्थिक मदत, सुविधा मात्र कुणीही दिली नाही.जी तुटपुुंजी साधाने व सुविधा स्वखर्चातून ते मिळवू शकतात, त्याच्या जीवावर ते हे धोकादायक काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. ही खेदाची बाब आहे. लोक पर्यावरण रक्षणाची गरज या विषयावर भाषण देतात. पण प्रत्येक्ष काम करणार्या लोकांना मात्र या देशात अतिशय वाईट वागणूक मिळते. हा किती विरोधाभास आहे, नाही का? कितीही अडचणी आल्या तरीही अनेक वर्षापासून न डगमगता सापांचा व लोकांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणार्या संजय अडगुलवारांसारख्यांमुळेच निसर्गाचे व मानव जातीचे रक्षण होते आहे, नाही का? सर्पमित्र संजय अडगुलवार,नांदेड मो.९७६३१२३४८५ लेखक - उन्मेष गौरकर, नांदेड