भारतीय संस्कृतीमध्ये माणूस आणि जंगल यांमधील दृढ नाते नाना प्रकारे सांगितले गेले आहे. परंतु, गेल्या काही वनांची दशकांत आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. ही जाणीव व्हावी आणि ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडूनच केला जावा यासाठी वनमहोत्सवामधून प्रोत्साहन दिले जाते.

मूळ संकल्पना व सुरुवात

भारतात १९५० सली के.एम. मुन्सी यांच्या पुढाकाराने वन महोत्सव सुरु झाला. ते त्यावेळी केंद्र सरकारमध्ये अन्न आणि कृषी मंत्री होते. त्यावेळी भारतात जंगलक्षेत्र भरपूर होते. परंतु, कदाचित पुढील गरजा आणि धोका ओळखून, जंगलांच्या संरक्षणासाठी, त्यांनी वन महोत्सवाला चालना दिली. कारण शहरीकरण आणि औद्योगिकीकरण हवे असेल तर वाटेतली झाडे तोडली पाहिजेत असे (चुकीचे) समीकरण मूळ धरू लागले तोटे.

अधिक माहिती

खरे तर जंगलांपासून फक्त मानवालाच नाही; तर संपूर्ण सजीव – निर्जीव सृष्टीला अनेक फायदे होतात- हवामानाचे संतुलन, नियमित पाऊस, शुध्द हवा, वाळवंटीकरणातून उद्भवणा-या समस्या दूर करणे, पशुपक्ष्यांना योग्य अधिवास (राहण्याची जागा- हॅबिटॅट), जमिनीची धूप तसेच पाण्याचे आक्रमण थोपवणे (विशेषतः किनारी प्रदेशांत हे फायदे तर होतातच शिवाय आपल्याला लाकूड आणि इतर वनसंपत्ती मिळते ती वेगळीच ! पण आपण हावरटपणाने तात्पुरत्या फायद्याच्या मागे लागून जंगलांची तोड करत चाललो आहोत.

माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६