Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/08/06 00:26:48.879788 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / जलयुक्त शिवारातून जलसंपत्तीची निर्मिती आणि कार्यक्षम विनियोग
शेअर करा

T3 2020/08/06 00:26:48.884725 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/08/06 00:26:48.935567 GMT+0530

जलयुक्त शिवारातून जलसंपत्तीची निर्मिती आणि कार्यक्षम विनियोग

शिवार अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यात जलसंवर्धनाची व्यापक चळवळ उभी राहिली.

शिवार अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यात जलसंवर्धनाची व्यापक चळवळ उभी राहिली. कृषि विभाग, संयुक्त प्रयत्नांमधून झालेल्या जल व मृदू संवर्धनाच्या कामातून भूजलपातळी वाढविण्यासोबत पिंकांसाठी संरक्षित सिंचनाचा सक्षम पर्यायही उपलब्ध झाला आहे. चालू साली या शासकीय यंत्रणेमध्ये समन्वय छान होता; पण त्याबरोबर अशासकीय सेवाभावीं संस्था या कार्यात यथाशकिंत मदत करीत आहेत.

मुख्य यशाचे गमक म्हणजे त्यासाठी लाभधारकांचा/शेतक-यांचा वर्गणी गोळा करून अल्पसा का होईना, पण सहभाग अतिमोलाचा होता. शेतक-यांच्या सहभागामुळे कामाच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम झाला. ज्या-ज्या गावात जलयुक्त शिवार अभियानामुळे आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. त्या-त्या गावांमध्ये संपन्नता नांदण्यास मदत झाली आहे.

सरासरीपेक्षा चालू वर्षीच्या पावसाळी हगामात आय.एम.डी. संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा ११ ते १६ टक्के कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. सप्टेंबर व ऑक्टोबरच्या पावसाने जनावरांच्या चा-याला व रब्बी पिकांच्या पेरणीस हात दिला; पण त्यामुळे जलयुक्त शिवारातील जलसाठे भरण्यास मदत झाली. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला; पण पावसावर आधारित पिकांचे, फळबागांचे आणि पशुधनाचे सूक्ष्मरीत्या नियोजन करण्यासाठी जलयुक्त साठ्यांचा आणि अल्पप्रमाणात उपलब्ध भूजल हाच केंद्रबिंदू राहणार आहे.

दुष्काळग्रस्त लाभधारक, काही अशासकीय स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणा यांच्या सहभागातून निश्चितपणे या दुष्कळावर मात करू शकतो. पावसाचे कमी-जास्त प्रमाण, भौगोलिंक विषमता आणि दोन पावसांमधील पडणारा खंड या चिंतेच्या बार्बी आहेत; पण त्याला फक्त जलयुक्त शिवार अभियान हा उतम पर्याय आहे.

जलयुक्त शिवारातून जलसंपत्तीची निर्मिती विविध कार्यप्रणालींतून करण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्र हा त्याचा आत्मा असून अगदी माथ्यापासून सर्वदूर पाणी वाहून एकत्रित एका नाल्यातून बाहेर पडते. अशी त्याची सुटसुटीत व्याख्या आहे.

त्या पाणलोट क्षेत्रात, घनदाट जंगल, झुडपी जंगल, पडीक जमीन आणि लागवडीखालील शेती अशा वैिविंध्र बार्बी समाविष्ट आहेत. एकात्मिक पाणलोट क्षेत्रविकासात विविध बाबी असल्या, तरी मृद व जलसंधारण आणि भूजलपुनर्भरण यांना मुख्य प्राधान्य आहे. पाणलोट क्षेत्राच्या माथ्यावर सलगखोल सलग समतल चर, गॅर्बियन बंधारा.

मातीं बंधारे आणि सिमेंट बंधारे खालच्या बाजूस पाणी अडविण्यासाठी आणि जमिनीत मुरविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. शिरपूर पॅटर्नप्रमाणे सिमेंट बंधान्यावरच्या भागातील ओढ्याची लांबी-रुंदी आणि खोलीकरणाद्वारे पाण्याचा प्रचंड साठा निर्माण होऊ लागला आहे.

जुन्या प्रकल्पाचे पुनरुद्धीवन करणे, त्यामधील गाळ काढणे- ओढेनाले जोड़ प्रकल्प या बाबी जलयुक्त शिवार अभियानात कल्पनातीत यशस्वीं ठरल्या आहेत. साखळी सिमेंट बंधारे-नाला खोलीकरण-रुंदीकरण भौगोलिक स्थितीनुसार केले असून जल संचलनाचे पुनरुद्धीवन झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानाची व्याप्ती मोठी असून, भविष्यात जुने अस्तित्वातील लघुबंधारे


पाझर तलाव आणि लघू सिंचन तलावांची दुरुस्ती तसेच शिवकालीन व निजामकालीन तलावांपर्यंत जलसाठ्य़ाचा समावेश टप्प्याटप्याने केला जाईल.

महाराष्ट्र शासनाच्या जलनीतींनुसार पंचसूत्री कार्यक्रम आखला असून प्राधान्य क्रमाने

  1. जलसंपत्ती निर्मिती आणि कार्यक्षम वापर,
  2. लाभधारकांचा सहभाग,
  3. समन्वयपूर्वक कार्यवाही,
  4. अशा सक्रिय सेवाभावी संस्थांचा आर्थिक सहभाग आणि
  5. पर्यावरणपूरक संतुलन ही उद्दिष्टे ठेवली आहेत. प्रकल्प उभारणे शक्य आहे; पण शेतक-यांचा अथवा लाभार्थींचा सहभाग जास्त महत्वाचा आहे. तरच त्याचा दीर्घकाळ शाश्वत उपयोग होतो.

जलसंपत्ती नियमनामध्ये राज्याला अतिशय सतर्क राहायला हवे. वरील पुनर्भरणयोग्य 200 मीटर खोलीवरचा साठा मर्यादित असून नुकत्याच पाहूणी अंदाजानुसार ३२.१५ अब्ज घनमीटर अंदाजित केला आहे. त्यापैकी दरवर्षी १७,१७७ दशलक्ष मीटर म्हणजेच सुमारे ५३ टक्के वापरीत आहोत. महाराष्ट्रातील पाणलोटाची संख्या १,५३१ असून त्यांपैकी अतिशोषित पाणलोट क्षेत्र ७६. शोर्षित पाणलोट क्षेत्र १g आणि अंशतः शोषण पाणलोट क्षेत्र १ug अशी संख्या आहे. राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी १oo तालुके शोषित वर्गात असून त्या ठिकाणी भूजलाचा अनिर्बंध वापर होत आहे. राज्यातील २८९ नद्यापैकी सुमारे २६५ नद्या नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत आठतात. अशा परिस्थितीत भूजलावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात भूजल एकात्मिकरीत्या पद्धतीने विकास व व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियमन - ४ डिसेंबर 20१३ अन्वये अधिसूचना निघाली आहे. महाराष्ट्राच्या ३४ पाणलोट क्षेत्रांमध्ये नेहमीच्या वार्षिक पुनर्भरणापेक्षा जास्त उपसा होत आहे. मागील ३ वर्षांपासून पावसाची सरासरीपेक्षा कमी टक्केवारी त्यात भरच टाकीत आहे.

जलसंपत्तीचे पाणलोटक्षेत्र पायाभूत धरून मोजमाप

पाणलोट क्षेत्रात दोन ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे बसवून त्या क्षेत्रात पडलेला पाऊस निश्चितपणे मोजता येईल. पाणलोट क्षेत्रात पाण्याचा अंदाजपत्रकात एकूण जलसंपत्तींपैकी सुमारे ३५ ट्क्के पाणी अपधाव स्वरूपात असते. उर्वरित जमिनीत जिरलेल्या पाण्यापैकी फक्त १0 टक्के भूजल पुनर्भरणात उपयुक्त ठरते. जमिनीतील पाणीधारणा शक्तीनुसार ६० टक्के पाण्याचा पिके, वनस्पतीसाठी आणि बाष्पीभवनाद्वारे वापर होतो. याचाच अर्थ असा की, अपधावाचे ३० टक्के पाणी जलसंधारण संस्कारामार्फत अडवून भूजलात अंतर्भूत करणे, पाणलोट क्षेत्रविकासाचे मर्म राहणार आहे. शेताची बांधबंदिस्ती, समतल चर, ट्रेच कम माऊंट, उताराला आडवी नांगरट अथवा मशागत अशा विविध बाबी मूलस्थानी जलसंधारणात येतात.

हे सर्व संस्कार मातीनाला बंधारा आणि साखळी सिमेंट बंधारे अशा विविध संस्कारांतून काही काळ पाणी अडवून स्थिर ठेवता येते. जेणकरून, ते पाणी हळूहळू जमिनीत जिरत राहते. भूजल पुनर्भरणासाठी त्याचा उपयोग होतो. त्यापुढची पायरी ही विविध आकारांची शेततळी आणि पाझर तलाव हा अंतिम टप्पा आहे.

पावसाची तीव्रता (मिमी/तास), क्षेत्रफळ (हेक्टरी) आणि अपधाव गुणांकाचा वापर करून अपधाव (घनमीटर/से.) रॅशनल मेथड पद्धतीने मोजता येतो. भूजलाचे मापन मुख्यत्वे करून विहिरी अथवा विधन विहिरीच्या उपशावरून आणि त्यामधून पिकासाठी उपलब्ध पाण्यावरून करता येते. त्या क्षेत्रातील पाण्याच्या पातळीवरूनही अंदाज बांधता येतो. तथापि, जलसंधारणासाठी उपलब्ध स्ट्रक्चर्समधील पाणीसाठ्याचा अंदाज बांधता येतो.

सिमेंट बंधा-याच्या पाण्याच्या साठ्याची लांबी-रुंदी आणि खोली जसजसे वरच्या बाजूस जावे, तसतशी बदलत जाते. कमी-कमी होत जाते. पाण्याची खोली आणि क्षेत्रफळ यांवरून पाण्याचा अंदाज घनमीटरमध्ये बांधता येतो. एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर्स अथवा एक टन पाणी असते. सर्वसाधारणतः अशा स्ट्रक्चर्समधील पाणी घनमीटर किंवा दशलक्ष घनमीटर्स किंवा अब्ज घ.मी. रुपांतरित केले जाते. काही वेळा हेच मोजमाप फुटांत केल्यास घनफूट किंवा द.ल.घ.फू. अथवा अब्ज घ.फू. अथवा टीएमसी अशा भाषेत सांगितले जाते. अंतिमतः पावसाच्या निर्माण केलेल्या पाण्यावर भिजणारे क्षेत्रफळ पाण्याची उपलब्धता निश्चित करते. काही वेळा त्याच जलसाठ्यातून पिण्यासाठी अथवा उद्योगासाठी पाणीवापर होतो.

त्यासाठी खास मीटर बसवून पाणी घनमापक पद्धतीने पुरविले जाते. जलसंधारणातील शेततळ्यांचा आकार (लांबी-रुंदी व उंची) निश्चित असतो; त्यामुळे शेततळ्यातील पाण्याचे मोजमाप निश्चित असते. शेतक-यांकडे २0 × २0 x ३ मी. आकाराचे शेततळे असल्यास त्यामध्ये १२00 घनमीटर किंवा १२ लाख लिटर्स पाणी मिळू शकते. जलयुक्त शिवार अभियानात आता टीएमसी म्हणजेच हजार दशलक्ष घनफूट मध्ये करणे सोडून दिले पाहिजे.

जलयुक्त अभियान हे सूक्ष्मजल मापक अभियान फक्त हजार घनफूट किंवा हजार घनमीटर अंतिमतः लाख लिटर्समध्ये सर्वांना समजेल, अशा भाषेत सांगणे सयुक्तिक होणार आहे. ते कृषि विस्तार कार्यकर्त्यांच्या अंगी भिनले पाहिजे. सूक्ष्म सिंचनाद्वारे या पाण्याचा वापर प्रतिदिनी प्रतिझाड किंवा पिकानुसार प्रति चौरस मीटरला किती लिटर्स करायचा आहे, त्यासाठी पिकाखालील अथवा ताळमेळ या शेतातळ्यातील पाण्याचा पिके निघेपर्यंत बसवायचा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील केळगाव (ता. श्रीगोंदा) येथील श्री. अमित लगड या शतक-याच्या शततcoयाच जलपूजन मा. जिल्हाधिका-यांच्या शुमहस्त झाले.

या कार्यक्रमाची व्हिडिओ कॅसेट पाहायला मिळाली. त्या ३o x ३o × १० मीटर्स शेततळ्यास आवर्जून भेट दिली. सुमारे ९० लाख लिटर्स उपलब्ध पाण्याचे नियोजन सूक्ष्म सिंचनाद्वारे करण्याचे प्रयोजन या जलयुक्त शिवाराची गाथा ठरणारे आहे. परतीच्या पावसात २४ तासांत १५o ते २०० मि.मी. पाऊस झाल्याचे मराठवाड्यात दिसले. प्रचंड अपधाव खोलीकरण केलेल्या नाल्यात ओढ्यात आणि सिमेंट बंधाच्यात पाणी साठविणे, हे खरे आव्हान आहे. शेततळ्याच्या भूपृष्ठात पाणी जिरू नये म्हणून वापरलेल्या काळ्या पॉलिथिलीनची पकी बांधणी आणि उन्हाळ्यातील निगा महत्वाची आहे. शेततळ्याच्या बंधा-यावरील बारवेड वायरचे कुंपणही महत्वाचे आहे. कारण, हा प्रकल्प दीर्घ मुदतीचा आहे. जलयुक्त शिवार अभियानातील जलयुक्त-निर्मितीचे मोजमाप ढोबळमानाने जलसंपत्तीमध्ये करता येईल; पण भूजलसाठ्याचे करणे सयुक्तिक होणार नाही. त्यासाठी भूजलाचा वापर सूक्ष्म सिंचनाद्वारे करून वाढलेल्या क्षेत्राद्वारे ठरविता येईल. पडणारा पाऊस आणि पाणलोटाच्या बाहेर पडलेला अपधाव यांचा ताळमेळ घालणे अवघड आहे.

जलसंतीचा कार्यक्षम विनियोग

दुष्काळी भागातील शेतक-याचे क्षेत्र मोठे असल्यास त्याला तीन प्रकारांत विभागणी करावी लागेल. पहिल्या प्रकारात शाश्वत उत्पन्नासाठी उपलब्ध जलसंपत्तीनुसार नियंत्रित शेती उदाहरणार्थ छोटेसे शेडनेट, कोरडवाहू फळपिके आणि बंदिस्त शेळीपालन अथवा मर्यादित पशुपालन यांना प्रथम प्राधान्य द्यावे लागेल. शेडमधील भाजीपाला आणि शेळीपालनातून नियमित पैसे मिळत शेवगा यांमधून वार्षिक उत्पन्न मिळेल.

यामध्ये पाण्याबरोबर तांत्रिक परिपूर्णता आणि अविरत कष्टांची जोड लागेल. दुष्काळी भागातील शेतक-यांना पहिल्या तांत्रिक बाबीची जास्त आवश्यकता आहे. कृषि खात्याची व कृषि विद्यापीठांची ती जबाबदारी आहे. तरुण सुशिक्षित वर्ग शेतीत आता उतरला आहे. त्यामुळे त्याचे काम सोपे झाले आहे. शेतीमधील शेतमालाची सर्वोत्तम उत्पादकता यांचा प्रथम विचार होणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपनी निर्माण करून झाल्यास शेतमालाचा भाव शेतकरी उत्पादक ठरवील. शेततळ्याभोवतालच्या शेतीचे आदर्श मॉडेल ठरले पाहिजे.

जलयुक्त शिवाराला उपलब्ध पाण्याच्या सुयोग्य वापराचा दुसरा टप्पा आहे, तो म्हणजे पावसावर आधारित खरीप आणि रब्बी हंगामांतील अन्त्रधान्य पिकांच्या संरक्षित एक किंवा दोन सिंचन पाळ्यांचा. यामध्ये पशुधनाला चारापिकांचा मोठा वाटा असतो. पिकाच्या नाजूक अवस्थेमध्ये अशा पाण्याच्या पाळ्या निश्चितपणे फवारा सिंचनाने आवश्यकतेपेक्षा कमी पाणी देऊन ही पिके वाचविता येतात. आजकाल पाणी वाहतुकीसाठी होस पाईप, फ्लेक्झिबल पाईप उपलब्ध होतात.

कमी दाबावर म्हणजे २ कि. पर्यंत फवारा संच हे उपलब्ध आहेत. कष्टाची आणि तंत्राची जोड बसली पाहिजे. अर्थातच, हे उपलब्ध पाण्यानुसार पीक वाचविण्यापुरतेच मर्यादित आहे. यामधील तिसरा टप्पा मात्र पूर्णतः पावसाच्या पाण्यावर आधारित आहे.

पण, बुडत्याला काडीचा आधार म्हणून जलयुक्त शिवारातील उपलब्ध पाणी पिकावर फेओलीनाईट फवारा मारण्यासाठी वापरण्यापुरते मर्यादित आहे. यामध्ये म्हणजे पिकामधील विरळणी, जमेल तेवढे पिकाच्या अवशेषांचे शांत असताना पाण्याचा फवारा निश्चित चांगले परिणाम देऊन जातो.

जलयुक्त शिवार अभियानातून निर्माण झालेल्या जलाचा उपयोग शेतीव्यतिरिक्त कृषिउद्योग कुक्कुटपालन-रेशीम आणि गोड्या पाण्यातील मत्स्यपालनासाठी करता येईल. पण, या उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम विनियोग कृषि खात्याच्या सहाय्याने व नियोजनाद्वारे स्वत: करावयाचे आहे.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

2.92592592593
अशोक बळीराम माळी May 07, 2017 06:46 AM

गंगा नदीचे पाणी भारताचे गाव गावत येवे .केनलचे वापरा तुन .

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/08/06 00:26:49.453954 GMT+0530

T24 2020/08/06 00:26:49.460214 GMT+0530
Back to top

T12020/08/06 00:26:48.782161 GMT+0530

T612020/08/06 00:26:48.800936 GMT+0530

T622020/08/06 00:26:48.869654 GMT+0530

T632020/08/06 00:26:48.870517 GMT+0530