जमिनीत पाणी मुरविण्यासाठी रिचार्ज पीट, सोक पीट, विहीर पुनर्भरण, शेतातील खड्डा, शेतातील नाल्या यांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करावे. येत्या काळात जल-मृद्संधारणाच्या दृष्टीने या उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत.
पाणलोट क्षेत्र विकासात लोकांचा सहभाग असेल, तरच ती योजना यशस्वी होऊ शकते. कोणतेही पाणलोट क्षेत्र लहान किंवा मोठे त्यातील गावे तेथील लोकांच्या गरजा याकडे त्यांच्याशी चर्चा करून, त्यांचा विश्वासात घेऊन नियोजन केले, तरच फायदा होतो. जलसंधारणासाठी करण्यात येणाऱ्या कृषी अभियांत्रिकी उपयांमध्ये समपातळीवरील बांध, समपातळी रेषेवरील चरी, घळी नियंत्रण बांधकाम, नाला बांध, गॅबियन, सिमेंट बंधारे, नाला, सरळीकरण, शेततळे इ., तर वनस्पती शास्त्रात्मक उपायांमध्ये समपातळी मशागत पट्टा पेरणी भू-आच्छादित मशागत, वनशेती, फळबाग लागवड व कुरण विकास या कामांचा समावेश होतो.
पुनर्भरण चर हे पाणलोटात एक महत्त्वाचे काम आहे. पुनर्भरण चरामुळे पाण्याचे स्रोत कायम होण्यासाठी मदत होते. पाणी जमिनीच्या आत साठवून राहिल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
ज्या भागात विहीर नसेल तेथे रिचार्ज पीट तयार करून छतावरील किंवा इतर ठिकाणचे पाणी जमिनीत मुरविता येते. हे पीट 2.5 ते 3 मीटर खोल, तसेच 1.5 ते 3 मीटर रुंदीचे असते. यात मोठे दगड, छोटे दगड तसेच वाळू / रेतीचा चाळा भरावा आणि त्याचा पृष्ठभाग कुठल्याही जाळीने झाकावा जेणेकरून पाण्यासोबत येणारा कचरा यात जाणार नाही.
संपर्क : प्रा. पेंडके : 9890433803
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 8/8/2023
पाणलोट क्षेत्र विकास करण्याकरिता पाणलोट क्षेत्राती...
मृद् व जलसंधारणाच्या पद्धतींचा वापर करताना पाऊसमा...
येत्या काळात गाव स्तरावर पावसाच्या पाण्याचे व्यवस्...
बंधाऱ्यासाठी वापरत असलेले सिमेंट चांगले असावे. सहा...