Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/08/13 19:05:20.838771 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / दुष्काळ निवारणासाठी शाश्वत उपायांची आखणी
शेअर करा

T3 2020/08/13 19:05:20.843144 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/08/13 19:05:20.867131 GMT+0530

दुष्काळ निवारणासाठी शाश्वत उपायांची आखणी

पावसाचे पाणी हे प्रामुख्याने पाणलोट क्षेत्रातून वाहत असते. अशा पाण्याचे संधारण आणि व्यवस्थापन करणे म्हणजेच पाणलोट क्षेत्र विकास होय.

परिचय

पावसाचे पाणी हे प्रामुख्याने पाणलोट क्षेत्रातून वाहत असते. अशा पाण्याचे संधारण आणि व्यवस्थापन करणे म्हणजेच पाणलोट क्षेत्र विकास होय. जलचक्राचा जमिनीवरील प्रवासच मुळी पाणलोटातून होतो, त्यामुळे जर एखाद्याला 'पाणी’ या नैसर्गिक पाणलोटापासून सुरुवात करावी लागेल. 'धावणा-या पाण्याला चालायला लावणे, चालणा-या पाण्याला थांबायला लावणे आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरायला लावणे' हा पाणलोट क्षेत्र

पाणलोट क्षेत्र विकासाची मूलभूत तत्वे

 1. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी पडल्यानंतर ते 'माथ्यापासून पायथ्याकडे' वाहत येते, त्यामुळे जेथे पावसाचे पाणी पडते अशा पाणलोटाच्या माथ्यापासून पाणलोट विकासाची सुरुवात करावी.
 2. पाणलोटातील जमिनीवर मृदा संवर्धनाच्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे आणि त्यानंतरच पाणलोटातील ओघळ आणि नाल्यांमधून वाहणा-या पाण्याचे संवर्धन केले पाहिजे. पाणलोटाचे सर्व क्षेत्र जमिनीने व्यापलेले असते, त्यामुळे जमिनीवर ओघळी व नाल्यांपेक्षा जास्त पाणी पडत असते; म्हणून प्रथम 'मृदा संवर्धन' केल्यास जलसंधारण करावयास जास्त वाव मिळतो. (ओघळी व नाल्यांमध्ये पाणलोटाचा केवळ ५ ते १० टके भाग असतो).
 3. मृदा संवर्धनाच्या दृष्टिकोनातून मूलःस्थानी जलसंधारणाच्या उपचारांवर अधिक भर दिल्यास पावसाच्या पाण्याचे जास्तीत जास्त संधारण करता येते, पर्यायाने अशा उपचारांमुळे मातीतील आद्रता वाढीस लागून जमिनीवरील तसेच भूमिगत जलसाठ्यांमध्ये वाढ होते, ज्याचा फायदा पाणलोट क्षेत्रामध्ये राहणा-या शेतक-यांना, विशेषतः अल्पभूधारक शेतक-यांना होतो. दुस-या बाजूला केवळ पाणलोटातील ओघळी आणि नाल्यांवर आधारित जलसंधारण उपाययोजना (बांधकामे) स्वीकारल्यास अशा प्रवाहांमधून वाहणारे पाणी केवळ अडवता येते, ज्याचे प्रमाण खूप कमी असते आणि त्याचा लाभदेखील अशा प्रवाहांच्या जवळ राहणा-या शेतक-यांनाच होतो (असे शेतकरी हे प्रामुख्याने सधन असतात).
 4. पाण्याचे कार्यक्षमपणे संधारण आणि त्याचे समन्यायी वाटप या दोन्ही दृष्टीने पाणलोट क्षेत्रातील जमिनीवर मृदा संधारणाच्या कामांना ओघळी व नाल्यांवरील बांधकामांपेक्षा प्राधान्य दिले पाहिजे.
 5. संपूर्ण देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रात झाडांचे आच्छादन वाढवणे हे अत्यंत निकडीचे आहे, त्यासाठी वनीकरण आणि वृक्ष लागवड कार्यक्रम (छोटी झाडे, गवत आणि झुडूपवर्गीय झाडांची लागवड इत्यादी) हाती घेणे आवश्यक आहे. पाणलोट क्षेत्र विकासात वनीकरण आणि वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेताना स्थानिक कृषी-वातावरणीय (Agro-Climatic) विभाग, पर्जन्यमान आणि बाष्पीभवनाचे प्रमाण या गोष्टीसुद्धा विचारात घेणे आवश्यक आहे.
 6. जलसाक्षरता, पाण्याचा नियमित ताळेबंद (Audit), सुयोग्य पीक पद्धतीचा अवलंब, समन्यायी पाणी वाटपाच्या तत्त्वाचा स्वीकार गरजेचे आहे. असे केल्यास पाणलोटाच्या माध्यमातून संधारित केलेल्या पाण्याच्या उपलब्धतेच्या प्रमाणात पाण्याची मागणी तसेच वापर वाढणार नाही, त्यामुळे उपलब्ध पाण्यातूनच जास्तीत जास्त उत्पादकता वाढविता येईल. (पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक घेता येईल).
 7. स्थानिक जल संसाधनांचे भूपृष्ठावरील व खालील व्यवस्थापन आणण्यासाठी समन्यायी व कार्यक्षम असे समुदाय निर्धारित शासन प्रोटोकॉल्स निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.
 8. एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामाबद्दल जोपर्यंत स्थानिक समुदायामध्ये मालकीची भावना निर्माण होऊन लोकांचा सक्रीय सहभाग वाढत नाही, तोपर्यंत एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकासाचे काम चिरंतन टिकून राहू शकत नाही. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून निर्माण होणा-या मालमत्ता आणि संरचना यांची देखभाल आणि दुरुस्ती यामध्ये स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी, गावक-यांची तसेच त्या गावातील आवश्यक आहे. कशासाठी आणि कशाप्रकारे करता येईल यासाठी पुढील मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे.


पाणलोट म्हणजे काय ?

एखाद्या ओढ्याला - नदीला ज्या क्षेत्रातून छोटे-छोटे ओघळ आणि नाल्यांमधून पाणी वाहून येते त्या क्षेत्राला त्या नदीचे पाणलोट क्षेत्र असे म्हणतात. पावसाचे पाणी पडल्यानंतर ते डोंगरावरुन किंवा टेकडीवरून छोट्या-छोट्या ओघळ आणि नाल्यांमधून खाली वाहत येते. पाणी उतारावरून वेगाने खाली वाहत येताना ओघळीमधून सोबत भूपृष्ठावरील माती घेऊन येते आणि शेवटी नदीला येऊन मिळते. अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट भूभागावर पडणारे पावसाचे पाणी ओढे, नाले आणि ओघळींमधून नदीला येऊन मिळते. अशा भूभागाला त्या नदीचे पाणलोट असे म्हणतात. पाणलोट क्षेत्र हे काही हेक्टरपासून काही हजार हेक्टरपर्यंत असू शकते. जसे- हिमालयीन पाणलोट पाणलोट क्षेत्र हे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहांमुळे तयार झालेली परिसंस्था (ecosystem) आहे.

पाणलोट क्षेत्र विकास - अर्थ आणि महत्व

एका विशिष्ट पाणलोट क्षेत्रात उपलब्ध असणा-या संसाधनाचे - उदा. जमीन, पाणी, पशुधन आणि मनुष्यबळ पाणलोट क्षेत्र विकास होय. पाणलोट क्षेत्र विकासात नैसर्गिक संसाधने, मनुष्यबळ आणि पशुधन या सर्वांमध्ये पर्यावरण समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो, कारण लोक आणि पशुधन हे त्या पाणलोट क्षेत्रात राहतात.

पाणलोट क्षेत्र हा केवळ भौगोलिक प्रदेश नसून, तो एक जिवंत भूभाग आहे. कारण पाणलोट क्षेत्रात तेथील स्थानिक समाज राहत असतो आणि त्या भागावर त्याची उपजीविका अवलंबून असते. ज्या भागामध्ये मर्यादित / अपुरी नैसर्गिक संसाधने आहेत, अशा भागातील पर्यावरणावर मागण्यांचा दबाव खूपच जास्त असतो. जर या मागण्यांचे व्यवस्थापन उपलब्ध नैसर्गिक संसाधनांच्या क्षमतेच्या अधीन राहून केले नाही, तर त्या भागातील परिस्थितीकी (ecology) 37 for urviveT (ecosystem) GRloci wild. परिणामी स्थानिक लोकांच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत, दारिद्रयाकडे लोटले जातात, या सर्व परिणामांची परिणती म्हणजे त्या भागातून लोकांचे स्थलांतर होते.


एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकासाचे मुख्य घटक कोणते?

एकूणच, पाणलोट क्षेत्र विकास हे अनेक घटक आणि विषयांशी संबंधित असून, त्यातील अंतर्भूत घटकांमध्ये सातत्यपूर्ण समन्वय आणि आदान - प्रदान घडवून आणले जाते. उदा. पशुधन व्यवस्थापन हा विषय जमिनीची उत्पादकता, तसेच जमिनीचे आणि पाण्याचे व्यवस्थापन आणि चारा / कुरण विकास या सर्व घटकांवर अवलंबून आहे. विशिष्ट भागातील पशुधन, कृषी उत्पादन आणि वने यांच्याशी ग्रामीण ऊर्जा व्यवस्थापनाचा घनिष्ठ संबंध आहे.

कोणते उपाय आणि उपचार हाती घ्यावेत?

पावसाच्या पाण्याचे संधारण आणि जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी खालील उपक्रम हाती घेता येतात.

 1. क्षेत्रीय उपचार किंवा जमिनी संबंधित उपचार
  निसर्गतः मृद संधारणाला या सर्व उपाययोजना अनुरूप आहेत. पाणी जेथे पडते, तेथूनच पाणी अडवायला सुरुवात करणे हे पाणलोट क्षेत्र विकासाचे महत्वाचे तत्त्व आहे, त्यामुळे त्याची सुरुवात डोंगराच्या माथ्यापासून करून डोंगर उतारावर आणि खाली पायथ्यापर्यंत येणे आवश्यक आहे. त्यासाठी 'माथा ते पायथा' हे तत्व स्वीकारणे गरजेचे आहे. पाणलोटाच्या माथ्यापासून करण्यात येणा-या तांत्रिक उपचारामध्ये सलग समपातळी चार (CCT) व जल
  शोषक चर (WAT) खोदल्याने पाण्याचा वेग कमी होतो. उतारावरून खाली आल्यानंतर शेत जमिनीमध्ये समपातळी बांध (CB) व शेती बांध (FB) बांधले जातात व त्यांना अतिरित अपधाव वाहून नेण्यासाठी सांडव्याची सोय केली जाते. या उपायांमुळे माथ्यापासून खाली येताना सलग समपातळी चर आणि शेतीबांध बांधून खाली वाहून आलेल्या पाण्याला जमिनीमध्ये मुरवता येते. या उपायांमुळे जमिनीची धूप रोखली जाते, जमिनीची सुपीकता टिकून राहते, मातीतील आद्रता टिकून राहते तसेच भूजलाचे पुनर्भरणही करता येते.
 2. नाल्यावरील उपचार पाणलोटातील ओघळी, नाले आणि प्रवाहांमध्ये या उपाययोजना करता येतात. या उपाययोजनांची सुरुवात माथ्यापासून करतात. यामध्ये डोंगरावरील घळीमध्ये दगडी बांध घातले जातात. असे बांध हे डोंगरावरील दगड एकत्र करून घळीमध्ये ठेवले जातात. थोडे खाली आल्यानंतर नाल्यांमध्ये मातीचे नाला बांध व गॅबियन बंधारे बांधले जातात. अजून खाली आल्यास सिमेंट नाला बांध आणि पाझर तलाव बांधले जातात. या सर्व संरचनेच्या मदतीने माथ्यापासून वेगात वाहत येणा-या पाण्याला ठिकठिकाणी अटकाव घालून त्याचा वेग कमी केला जातो आणि पाणी साठविले जाते. अशा प्रकारे संधारित केलेले पाणी जमिनीत मुरवून भूगर्भातील पाण्याचे साठे वाढविता येतात.
 3. वनीकरण, जैविक घटक आणि कुरण विकास पाणलोटातील सलग समपातळी चार काही दिवस सूर्यप्रकाशात उघडे ठेवून त्यांचे पुनर्भरण केले जाते. त्यावर झाडे, गवत आणि झुडपांची लागवड केली जाते. अशी झाडे-झुडपे व गवत स्थानिक जातीचे असल्याने स्थानिक लोकांच्या इंधन, चारा, लाकूडफाटा, फळे व अन्न या गरजा या झाडा-झुडपांमार्फत भागविल्या जातात, ही झाडे स्थानिक पर्जन्यमान व बाष्पीभवन  यांच्याशी सुसंगत असतात. मातीची खोली कमी असते, अशा ठिकाणी चारा लागवड केली जाते.
  झाडे - झुडपे व गवतांमुळे जमिनीला सेंद्रिय द्रव्ये तर मिळतातच; परंतु याशिवाय जमिनीची धूपही थांबते आणि वेगाने जमिनीवर पडणा-या पावसाच्या पाण्याच्या पोषक चारा मिळून पशुधन विकास साध्य होतो. विशेषतः दुधाळ जनावरांना याचा अधिक फायदा होतो. यामुळे उत्पन्नात वाढही होते आणि चराऊ जमिनीवर ताणही येत नाही. त्यासाठी स्थानिक शेतक-यांच्या गरजा आणि जमिनीची क्षमता हे दोन्ही विचारात घेऊन जमिनीचा सुयोग्य वापर करण्याविषयी शेतक-यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
 4. कृषी, फलोत्पादन, पशुधन आणि मत्स्यसंवर्धन पाणलोट क्षेत्रात केलेल्या विविध उपाययोजनांचा परिणाम म्हणून पाण्याची उपलब्धता आणि त्याचबरोबर मातीतील आद्रतेचे प्रमाणदेखील वाढते, त्यामुळे त्या भागातील पीक पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होऊन त्यात वैविध्य येते. पीक पद्धतीत बदल झाल्यामुळे लोक विविध पिके घेतात. यामुळे परिसरातील लोकांचे उत्पन्न तर वाढतेच; पण त्याचबरोबर त्यांना चांगले पोषणही मिळते. बाजारपेठेतील चढ-उतारांचा सामना करता येतो आणि पावसाच्या अनिश्चिततेलाही तोंड देता येते. एखादा शेतकरी पीक पद्धतीत बदल करून फलोत्पादनही करू शकतो, तसेच कृषी आधारित अन्य व्यवसाय जसे की, पशुसंवर्धन, परसातील कुकुटपालन, शेळीपालन, वराहपालन, दुग्धव्यवसाय इत्यादी करू शकतो. ज्या ठिकाणी जलसाठे आहेत, त्या ठिकाणी मत्स्यसंवर्धनसुद्धा करता येते.
 5. ग्रामीण ऊर्जा व्यवस्थापन आणि उपजीविकेसाठी साहाय्यकारी व्यवस्था ग्रामीण भारतातील इंधन व उर्जेची मागणी आणि पुरवठा ही मागणी पूर्ण करणा-या संसाधनांची उपलब्धता यामध्ये लक्षणीय अंतर आहे. विशेषतः स्वयंपाकासाठी लागणा-या इंधनाची गरज भागविण्यासाठी लोक झाडे आणि झुडपांची तोड करण्याचा पर्याय स्वीकारतात. तसेच स्वयंपाकासाठी आणि पाणी तापविण्यासाठी अस्वच्छ इंधनाचा (उदा. शेतातून निघणा-या टाकाऊ वस्तू, लाकूड, गुरांचे शेण इत्यादींचा) वापर करतात, ज्यामुळे धूर आणि धोकादायक वायू बाहेर पडून घरात प्रदूषण होते. याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागात श्वसनाशी आणि डोळ्यांशी संबंधित विकार बळावतात. यातून घरातील लोकांचे, विशेषतः महिला व मुलांचे आरोग्यदेखील प्रभावित होते. परवडणा-या इंधनाचा पर्याय लोकांकडे उपलब्ध नसल्याने ते स्वयंपाकासाठी वृक्षतोड करण्यास तसेच शेतीतून निघणा-या टाकाऊ वस्तू जळण म्हणून वापरण्यास बाध्य होतात. याची परिणती वृक्षतोडीत होऊन पर्यावरणाचा -हास होतो, त्यामुळे जैवविविधताही धोक्यात येते. पुनरुज्जीवन केलेल्या विकसित पाणलोटासाठी वृक्षतोड हा एक मोठा धोका आहे, त्यामुळे लोकांना स्वयंपाक आणि विजेसाठी स्वच्छ आणि पर्यायी इंधन स्रोतांची ओळख करून देणे आणि लोकांनी त्याचा वापर करणे हे वनीकरण आणि कुरण विकास शाश्वत ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

 

पाणलोटाचे उपचार पूर्ण झाल्याने पुनर्जीवित संसाधनावर (जमीन, पाणी, जैविक घटक, शेती, इत्यादी) आधारित आणि त्याबरोबरच शेती उत्पन्नाच्या मूल्य साखळीवर आधारित सुयोग्य उपजीविकेची पद्धती विकसित होते. याचा परिणाम म्हणून उत्पन्नात वाढ होते. चांगले व्यवस्थापन केल्यास हे फायदे शाश्वतरीत्या मिळू शकतात. ६. पाण्याचे समन्यायी आणि कार्यक्षम व्यवस्थापन पाणलोट क्षेत्र कार्यक्रमामुळे भूजल पातळी वाढते, परिणामी अधिक उत्पन्न मिळविण्याच्या इर्षेने त्या भागातील लोक जास्त पाणी लागणा-या नगदी पिकांकडे वळतात. भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर आणि अमर्याद उपसा केला जातो, मोठ्या प्रमाणावर विहिरी खोदल्या जातात, बोअरवेल्स घेतले जातात. त्याचबरोबर मोठ्या आकाराचे शेततळे तयार करून त्यात पावसाचे पाणी साठविण्याऐवजी भूगर्भातील पाणी उपसून साठविले जाते. याचबरोबर पाण्याचा अपव्यय होईल अशा सिंचन पद्धतीने शेताला पाणी दिले जाते.

या सर्वांचा परिणाम म्हणून भूगर्भातील पाण्याची पातळी झपाटयाने खाली जाते. अमर्याद उपसा थांबविला नाही तर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी असलेल्या पातळीपेक्षाही पाणी खाली जाते. शेतातील उत्पादन खालावते आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाबरोबरच कारणांसाठी पाण्याची गरज किती आहे, त्यात पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देऊन उपलब्ध होणा-या पाण्यातून त्या भागासाठी कोणती पीक पद्धती योग्य ठरेल, तसेच कार्यक्षम जलसिंचन पद्धतीचा वापर करून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून कशा प्रकारे जास्तीत जास्त पीक घेता येऊ शकेल, या सर्व बाबींची ओळख करून देणे आवश्यक आहे. असे केल्यास लोकांना वर्षभर पिण्याचे पाणी तर उपलब्ध होईलच, शिवाय त्यांचे शेतीतून मिळणारे उत्पन्नही वाढेल. अशा प्रकारे, वरील विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की, सहभागीय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम हा लोकांच्या केवळ पाणी, अन्नसुरक्षा आणि उपजीविकेच्या वाढत्या संधी एवढ्याच गरजा भागवित नाही तर या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान लोकांमधील रचनात्मक आणि सुप्त क्षमता वृद्धिंगत करण्याससुद्धा हातभार लावतो .


स्त्रोत - वाॅटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट

2.98571428571
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/08/13 19:05:21.300257 GMT+0530

T24 2020/08/13 19:05:21.307188 GMT+0530
Back to top

T12020/08/13 19:05:20.746373 GMT+0530

T612020/08/13 19:05:20.764476 GMT+0530

T622020/08/13 19:05:20.829261 GMT+0530

T632020/08/13 19:05:20.830006 GMT+0530