Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/08/13 23:54:40.735979 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / दुष्काळात भूजल गुणवत्तेचं महत्त्व
शेअर करा

T3 2020/08/13 23:54:40.740633 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/08/13 23:54:40.766375 GMT+0530

दुष्काळात भूजल गुणवत्तेचं महत्त्व

भाषांतर - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्‍ट, पुणे

जर दुष्काळात भूजल गुणवत्ता चांगली नसेल तर गावातील लोकांच्या आरोग्यावर, शेतीवर, त्यांच्या उत्पन्नावर तसेच स्वच्छतेवर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. या अभ्यासामध्ये अपस्ट्रिम आणि डाऊनस्ट्रिम मधील गावांमध्ये असणार्‍या भूजल गुणवत्तेच्या फरकावर प्रकाश टाकण्यात आला आहे. मुळा-प्रवरा उपबेसिन गावांमध्ये पावसाचे प्रमाण सातत्याने बदलत आहे आणि भूजलाची गुणवत्ता ढासळत आहे. पिण्याचे पाणी खूप कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे आणि अनेक दिवस पाण्याविना काढावे लागत आहेत. अशा स्थितीमध्ये स्थानिक पातळवीवर गुणवत्तेचं मूल्यांकन करण्यासाठी सध्याची असलेली धोरणं आणि जागरूकता कार्यक्रम यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु या अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर तात्काळ लक्ष देण्याची आणि त्यावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. प्रशासकीय, वाटरशेड आणि जहवाही स्तर अशा वेगवेगळ्या स्तरांवर असलेल्या फरकांवर या अभ्यासात प्रकाश टाकण्यात आला आहे. हे असे स्तर आहेत जे दुष्काळाच्या परिस्थिती खराब भूजल गुणवत्ता सुधारण्यात आणि ही परिस्थिती अनुकूल करण्यात अडथळा ठरत आहेत.

महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये मागील तीन-चार वर्षांपासून जो दुष्काळ पडत आहे तो तीव्र हायड्रोलॉजिकल आहे. पाण्याची कमतरता, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, लातूर गावामध्ये पाणी-टे्रन, पिकांचे नुकसान आणि शेतकर्‍यांचे शहरांमध्ये स्थलांतरण अशा विषयांमध्ये सामाजिक माध्यमं व्यस्त आहेत. याच विषयांवर सध्या चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये पाणीटंचाईच्या गंभीर परिस्थितीवर प्रकाशात टाकण्यात येत आहे. हीच परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आहे. मुख्यतः उन्हाळ्यात भूजल पातळी खूप कमी होत असल्यामुळे पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. आणि यातच पाण्याच्या गुणवत्तेचा मुद्दा डोकं वर काढत आहे. दुष्काळ काळात पाण्याची आवश्यकता पूर्ण करणं आवश्यक आहे परंतु त्याचबरोबर हे पिण्याचे पाणी स्वच्छ आणि सुरक्षित असाला हवे. कारण पाण्यामध्ये अल्गल आणि बॅक्टेरियाचे प्रमाण वाढले आहे. पाण्यामध्ये घनपदार्थ आणि नायट्रेटस् सहजतेने विरघळत आहेत आणि पाणी दुषित होत आहे.

मे महिन्याच्या काळात पाणी टंचाईची परिस्थिती भयानक असते त्यामुळे आम्ही मुळा आणि प्रवराच्या उपबेसिन भागातील गावांमध्ये पोहोचलो. त्या वेळी कडाक्याचे ऊन होते. केवळ याच समस्येचं गांभीर्य जाणून घेण्यासाठी आम्ही तिथे गेले नव्हतो तर भूजल शास्त्र आणि मानसशास्त्र यांच्या दृष्टिकोनातून भूजलाची गुणवत्ता का कमी होत आहे, हे समजून घेणं हा आमचा उद्देश्य होता. मुळा-प्रवरा उपबेसिनमधील अकोला, संगमनेर, सिन्नर, अहमदनगर, पारनेर, राहूरी, राहता आणि जुन्नरच्या 8 बॉक्समधील 51 गावांमधील भूजलाच्या गुणवत्तेवर लक्ष देणं हा या अभ्यासाचा उद्देश्य होता.

या क्षेत्रामध्ये अंतर्भुतीत भूगर्भीय स्तरांमध्ये वेगवेगळ्या जाडीचे मोठ्या प्रमाणात बेसल्ट असतात, जे भूजल कसे असेल हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अभेद्य अशा कठीण खडकांमध्ये कशा प्रकारचं भूजल असेल हेदेखील यावरच ठरते. विविध मूलभूत बेसाल्टिक प्रवाह हे एकमेकांबरोबर इंटरॅक्ट करतात त्या वेळी पाण्यातील रसायने मोठ्या प्रमाणात बदलतात. आत्ताचा भूजल वापराचा पॅटर्न आणि निळ्या सोन्याबरोबर अर्थात पाण्याबरोबर लोकांचे असलेले इंटरॅक्शन यांचा पर्यावरणावर प्रभाव पडतो आणि हे पाणी पिण्यासाठी व वापरासाठी योग्य आहे की नाही हे ठरते.

मे महिन्यातील आमच्या भेटीदरम्यान आम्ही तिथून काही पाण्याचे नमूने घेतले आणि ताबडबोब पीएच, तापमान, विद्युत वाहकता, विरघळणारे घनपदार्थ आणि क्षार यांचे परीक्षण केले. कारण या परीक्षणातूून या पाण्यात किती आम्लता आणि क्षारता आहे हे दिसून येते. यावरून पाण्याच्या गुणवत्तेवर प्राथमिक माहिती मिळते. हे नमुने एकत्र करण्यात आले आणि त्यातील अल्कलीनता, ठोसपणा, कॅल्शियम ठोसपणा, मॅग्नेशियम ठोसपणा, क्लोराईड, सोडियम, पोटॅशियम, नायट्रेटस्, फॉस्फेट आणि कोलीफॉर्म्स या पॅरमीटरचे विश्लेषण करण्यासाठी आणि त्यांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी ते नमूने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले.

ज्या गावांचा आम्ही अभ्यास केले तेथील बहुतांश गावांमध्ये, साधारणतः गावातील खुल्या विहिरींचे पाणी आटल्यानंतर किंवा त्यांचे पाणी दुषित झाल्यानंतर खासगी बोअरवेलमधून पाणी घेऊन टँकरमार्फत त्या गावातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत होते. आमच्या भेटीदरम्यान गावातील लोकांनी आमच्या समोर अनेक समस्या मांडल्या. शेतीसाठी पाणी कमी आहे, अतिशय कमी पाणी आहे किंवा पाणीच नाही, दूषित भूजल, पिण्यासाठी अयोग्य पाणी, खूप क्षारयुक्त आणि मातीमिश्रित पाणी, मातीचा कमी होत चाललेला ओलावा, नैसर्गिक वनस्पतींच्या उत्पन्नामध्ये होणारी घट, जनावरांसाठी चार्‍याची कमतरता, गावांतील लोकांचे शहरांमध्ये स्थलांतरण होत आहे, गॅस्ट्रो आणि आतड्यांचे आजार तसेच किडनी स्टोनसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. (1) अशा अनेक समस्या त्यांनी आमच्यासमोर मांडल्या.

परीक्षण प्रणालीचा अभाव

अकोल्यातील काही गावांमधील पाण्यांचे आम्ही काही नमूने एकत्र केले. तेथील ग्रामीण लोकांनी आम्हाला  सांगितले की, पाण्याची गुणवत्ता तपासणारे आम्ही पहिलेच होते. तसंही केवळ निवडक ठिकाणीच पाण्याच्या गुणवत्तेचं   परीक्षण केलं जातं. या खेडेगावातील लोकांना पाण्याच्या काही मूलभूत गुणांविषयी म्हणजेच, गंधक आणि रंग याविषयी  माहिती होती परंतु त्याच्या मागे नक्की काय कारण असते हे मात्र ते समजू शकत नव्हते. यावरूनच हे लक्षात येतं की, ग्रामीण स्तरावर परीक्षण प्रणालीचा अभाव आहे. गुणवत्तेच्या बाबतीत गावातील लोकांसाठी कोणताही जागरुकता उपक्रम नाही. जेव्हा वृत्तपत्रांतून दवाखान्यात भरती झालेल्या लोकांच्या बातम्या समोर येतात तेव्हाच पाण्याच्या गुणवत्तेची काय परिस्थिती आहे या गोष्टी उजेडात येतात.

अकोला ब्लॉक्समधील वारंगुशीच्या नदीमध्ये खूप कमी पाणी होते, पाणी नव्हतेच असं म्हटलं तरी चालेल. हा गाव समुद्रासपाटीपासून 810 मीटर उंचीवर आहे आणि पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी पूर्णतः भूजलावरच अवलंबून आहे. गाव इतके निर्जन आहे की, मुख्य शहराशी जोडण्यासाठी कोणतीच कनेक्टिव्हिटी नाही. हार्ड रॉक्स एक्विफर्समध्ये येणार्‍या विहिरी पूर्णतः आटलेल्या आहेत. त्यात खूपच कमी पाणी असते. अकोला बॉक्समधील बहुतांश गावांची हीच स्थिती आहे. खराब गुणवत्ता आणि मैला नसलेलं पाणी मिळवण्यासाठी गावकर्‍यांनी खूप संघर्ष केला, लढा दिला. आम्हाला ही जाणीव झाली की, त्यांना दिवसेंदिवस खूप मोठ्या ताणावाला आणि अडथळ्यांना सामोरं जावं लागत आहे. मग असं असताना कोणाला हे विचारण्याची गरज आहे का की, ‘पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष देण्याची काय गरज आहे?’

 

घायाळ प्रवरा नदी

जेव्हा पाण्याची खूपच टंचाई असते तेव्हा नदीच्या किनारी विहिरी खोदण्याचं प्रमाण वाढतं. भूजलाचं बाष्पीकरण होतं आणि भूजल मोठ्या प्रमाणात उपसलं जातं. त्यामुळे क्षारतेची समस्या वाढते, अर्थात खारटपणा वाढतो. त्याचबरोबर तीव्र शेतीमुळे भूजलाशय खालावतो. कारण नदीच्या किनारी किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि त्यामुळे भूजलामध्ये नायट्रेट प्रदूषण वाढते. चिकली गावामध्ये नदीच्या दुष्काळी भागात अतिक्रमण होतं आणि माती खणनाचे काम मोठ्या प्रमाणात चालते त्यामुळे नैसर्गिकरित्या होणारी फिल्टरिंगची प्रक्रिया नष्ट होते.  अशा अनधिकृत कार्यांवरून आपल्याला लक्षात येतं की, जलप्रशासन प्रणाली किती अप्रभावी आहे. अशा प्रकारच्या अनियंत्रित गोष्टी वाढत गेल्या आणि जास्त काळ चालल्या तर भूजलाचे प्रदूषण वाढत जाईल आणि लोकांचे मोठे नुकसान होईल.

विहिरीत क्षाराचे प्रमाण वाढणे

मूळा-प्रवरा उपबेसिनमधील डाऊनस्ट्रिममध्ये असणार्‍या अहमदनगर, राहता, राहुरी आणि संगमनेर ब्लॉक्समधील  बहुतांश गावातील विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात क्षार आढळून येतात. हा वाढलेला खारटपणा मुख्यतः नैसर्गिक प्रक्रियेद्वारेच नियंत्रित होतो. परंतु अलिकडच्या दशकामध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे आणि अनधिकृत कार्यामुळे क्षारयुक्तता मोठ्या प्रमाणात आणि खूप लवकर वाढत आहे. कमी पाऊस, मान्सूनच्या काळात पावसामध्ये चढ-उतार यामुळे रॉक खनिजांचे विघटन वाढते. बाष्पीकरण वाढते आणि भूजलाचा र्‍हास होतो. त्यामुळे खारटपणा वाढत आहे. भूजल इतके खारट आहे की, ते पाणी वापरासाठी योग्य नाही आणि जमिनी अनुत्पादक म्हणजेच वांझ बनत चालल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी त्यांना पूर्णतः टँकरच्या पाण्यावर अवलूंन रहावे लागते. शेजारच्या शहरांमध्ये रोजगारासाठी स्थालांतरण करावे लागते. कारण अनुत्पादक जमीन आणि दुर्लभ किंवा खराब पाण्याच्या परिस्थितीमुळे त्यांना बेरोजगारीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. मग अशा वेळी स्थलांतरणाशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय राहात नाही.

 

भविष्यातील पावलं

आमच्या सीजन-एक (ग्रीष्मकालीन) विश्लेषणानुसार, अकोल्यातील अपस्ट्रीम भागातील गावांमध्ये डाऊनस्ट्रीम गावांपेक्षा जास्त चांगल्या गुणवत्तेचे पाणी आहे. उपबेसिनमध्ये एकत्रित करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये सामान्य जीवाणूजन्य प्रदुषण आढळून आले. दुष्काळादरम्यान बहुतांश सरकारी मशिन्स पाणी देण्यासाठी उपलब्ध असतात परंतु त्या खूप दूरपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांना मर्यादा आहेत. तसेच त्या अनियमितदेखील आहेत. काही गावांमध्ये तर टँकर पोहोचण्यासाठी आठवडा लागतो. ग्रामीण भागात असणार्‍या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि सुरक्षेसाठी वेळीच पावलं उचलायला हवीत. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये पाण्याच्या गुणवत्तेमध्ये आढळणार्‍या बदलांचे परीक्षण करणे हे एक महत्त्वाचं पाऊल असेल. यामुळे पाण्यावर योग्य वेळी प्रकिया केली जाईल. लोकांच्या आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव टाकणारे जलस्रोत कोणते आहेत हे शोधणं सोपं जाईल. शाश्वत शेतीच्या दिशेने पुढे जायला हवं. अशा कठोर परिस्थितींचा सामना करून त्या अनुकूल करण्यासाठी लोकांची क्षमता वाढवायला हवी आणि ज्या राज्यांमध्ये पाण्याची गुणवत्ता किंवा प्रमाण कमी होत चालले आहे त्यांना काही पर्याय उपलब्ध करून द्यावे लागतील.

 

वापरासाठी सुरक्षित आणि पिण्यासाठी योग्य पाणी, यासाठी एक्विफेर्स अर्थात पाणकोठ्ठे हा महत्त्वपूर्ण स्रोत आहे. एक्विफेर्समुळे सातत्याने उत्पादन म्हणजे पीक निश्चित होते. परंतु यामध्ये चांगले संतुलन राखण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोनाची गरज असते. हा दृष्टिकोन तेव्हाच प्राप्त केला जाऊ शकतो जेव्हा शेतकरी, धोरणकर्ते, संशोधक, स्थानिक युती आणि सरकारी एजन्सीज् आणि विविध स्तरावरील स्टेकहोल्डर अर्थात हितधारक हे सर्व, सध्याच्या पाणी गुणवत्तेच्या मॅनेजमेंटमध्ये बदल आणण्यासाठी क्रियाशील म्हणजेच सक्रिय असतील. यासाठी गाव पातळीवर नियमितपणे पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण करणे आणि या प्रक्रियेमध्ये लोकांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे. आपल्या भूजल गुणवत्तेच्या देखभालीसाठी पर्यायी योजनांची खूप गरज आहे, जिथे लोग जागरूक असतील आणि ताबडतोब उपाय करण्यासाठी तयार असतील.

 

संदर्भ :

[1] Deshmukh, K. K. (2012). Ground water quality evaluation with special reference to nitrate pollution in the Sangamner area, Ahmednagar district, Maharashtra, India. WIT Transactions on Ecology and the Environment, 164, pp 79-88.

2.95833333333
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/08/13 23:54:41.108821 GMT+0530

T24 2020/08/13 23:54:41.115338 GMT+0530
Back to top

T12020/08/13 23:54:40.605561 GMT+0530

T612020/08/13 23:54:40.624138 GMT+0530

T622020/08/13 23:54:40.725593 GMT+0530

T632020/08/13 23:54:40.726544 GMT+0530