1) नालापात्रात उपलब्ध असलेल्या लहान ते मध्यम आकाराच्या दगडांचा वापर करून कुशल कामगारांच्या मदतीशिवाय "कोकण विजय बंधारा' बांधता येतो.
2) नालाप्रवाहाच्या दिशेने बंधारा वरच्या बाजूने प्लॅस्टिक अस्तरित केल्यास अपधावेच्या पाण्याचा साठा दीर्घकाळपर्यंत करता येतो. हा बंधारा बांधताना नालातळाचा उतार तीन टक्क्यांपेक्षा कमी असावा.
3) बंधाऱ्याच्या वरच्या व खालच्या बाजूस नाला सरळ असावा. नाल्याची खोली कमीत कमी एक ते दोन मी. असावी. नालाकाठ सुस्पष्ट असावेत.
4) नाल्याच्या तळाशी जमिनीच्या प्रकारानुसार साधारणपणे 0.15 मीटर ते 0.30 मीटर खोल व 1.6 मीटर रुंद पायाचे खोदकाम करावे, तसेच पाया नाल्याच्या दोन्ही काठांच्या साधारणतः 0.50 मीटर आतमध्ये खोदावा, जेणेकरून दगड आणि धोंडे आतमध्ये घट्ट बसून, बंधाऱ्याला मजबुती देतील. पायामध्ये दगड व्यवस्थित रचून सांधेमोड पद्धतीने थर करावेत.
5) नाल्याच्या खोलीनुसार बंधाऱ्याची उंची एक मीटर ठेवावी. बंधाऱ्यास पाणी साठवण्याच्या बाजूस 75 जीएसएमचे प्लॅस्टिक अस्तरीकरण करण्यात येते आणि ते तळास चिकटून राहण्यासाठी त्यावर दगड- माती टाकावी. हा बंधारा बांधण्यास सोपा आहे. हे बंधारे सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात बांधावेत.
संपर्क - 02358 - 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
स्त्रोत - अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
पाणलोट क्षेत्र विकास करण्याकरिता पाणलोट क्षेत्राती...
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील शेतक...
येत्या काळात गाव स्तरावर पावसाच्या पाण्याचे व्यवस्...
बंधाऱ्यासाठी वापरत असलेले सिमेंट चांगले असावे. सहा...