অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वनखाते आणि कुरणांची सुधारणा

वनखाते आणि कुरणांची सुधारणा

वनखात्याने कुरणांची सुधारणा करण्याचे काम 1980 पासून हाती घेतले आहे. यासाठी सधन तृणविकास, पश्‍चिम घाट विभाग स्थापन करण्यात आला. असा स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची उदिष्टे पुढीलप्रमाणे आहेत-

1. सद्य:स्थितीत फारशा उत्पादक नसलेल्या जमिनी उपयोगात आणण्याची उत्कृष्ट पद्धत शोधून जमिनी उत्पादनक्षम करणे.

2. स्थानिक जनतेस पशुपालन व दुग्धउत्पादन हा लाभदायक व्यवसाय निर्माण करून बिगरशेती हंगामात होणारे स्थलांतर रोखणे.

3. उत्तम दर्जाचा चारा उपलब्ध करून देणे.

4. वनक्षेत्राच्या पायथ्याच्या प्रदेशात भू व जलसंधारणाची कामे करून जमिनीची धूप थांबवून पाण्याची पातळी वाढवून ते अधिक प्रमाणात व अधिक कालावधीसाठी मिळेल अशी व्यवस्था करणे.

सधन तृणविकास, पश्‍चिम घाट विभागातर्फे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, नाशिक, सिन्नर व इगतपुरी या चार तालुक्यांत वनजमिनीवर कुरणक्षेत्र विकासाचे काम हाती घेण्यात आले. या तालुक्यांना नाशिक शहर, मुंबई महानगर व आजूबाजूचे क्षेत्र जवळ आहे. त्यामुळे या भागात दुग्धव्यवसायासाठी चार्‍याला फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सामूहिक मालकीच्या जमिनीवर गुरे चारण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. अनियंत्रित चराई, गुरांची मोठी सं‘या, मुद्दाम लावलेल्या आगी, वनांचे व कुरणांचे शेतीत रूपांतर, इत्यादी प्रकार चालू असल्याने वनांची व कुरणांची अवनती झाली होती. निवडलेले कुरणक्षेत्र चार वर्षांसाठी संबंधित प्रादेशिक वनविभागाकडून सधन तृणविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात येते. या कालावधीनंतर विकसित कुरणे पुढील व्यवस्थापनासाठी संबंधित प्रादेशिक वनविभागाकडे परत सोपवली जातात.

प्रत्येक वर्षी सुारे 600 हेक्टर क्षेत्रातील कुरणे विकसित केली जातात. पहिल्या वर्षी लागवडीपूर्वी कुरणक्षेत्राभोवती गुरे प्रतिबंधक चर खोदण्यात येतो. या चराची वरची रुंदी 1.9 मीटर ( 6 फूट), तळाची रुंदी 60 सेंटिमीटर ( 2 फूट)आणि खोली 1 मीटर ( 3 फूट) असते. चरातून निघालेली माती चराच्या आतील बाजूस मातीचा उंचवटा तयार होईल, अशा प्रकारे रचली जाते. या उंचवट्यावर शमी, घायपात वगैरे काटेरी वनस्पती लावल्या जातात. ज्या ठिकाणी चर खोदणे शक्य नाही अशा ठिकाणी सुक्या दगडांची भिंत रचली जाते. तिच्या तळाची रुंदी1 .5 मीटर ( 5 फूट), वरची रुंदी 1 मीटर ( 3 फूट) आणि उंची मीटर ( 3 फूट) असते. संपूर्ण कुरण क्षेत्राचे सर्वेक्षण करून त्याची मातीच्या खोलीनुसार तीन भागात विभागणी केली जाते.

विभाग 1 - मातीची खोली 10 सेंटिमीटरपेक्षा कमी असलेले क्षेत्र

विभाग 2- मातीची खोली 10 ते 20 सेंटिमीटर असलेले क्षेत्र

विभाग 3- मातीची खोली 30 सेंटिमीटरपेक्षा अधिक असलेले क्षेत्र

करवंद,बोर,गेळ,गुलतरा यासारखी झुडपे मुळापासून खणून काढली जातात. नाला बांध करण्यासाठी नाल्यात योग्य ठिकाणी जवळपासचे दगड वापरण्यात येतात. ज्या ठिकाणी दगड उपलब्ध नसतील तिथे मातीचे बांध किंवा झुडपांचा वापर करून बांध तयार केले जातात. पावसाळ्याच्या पूर्वी ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान जमिनीच्या मशागतीची कामे केली जातात. पहिल्या विभागात समपातळीत इंग‘जी व्ही आकाराच्या सरी तयार करतात. यांना स्थानिक भाषेत उरळी म्हणतात. प्रत्येक सरीची खोली 15 ते २० सेंटिमीटर,वरची रुंदी 30 सेंटिमीटर आणि लांबी 2 मीटर असते. दोन उरळीतील अंतर 6 ते 8 मीटर असते. काही ठिकाणी उरळीबरोबर खड्डे केले जातात. दुसर्‍या विभागात गवतासाठी वाफे केले जातात. प्रत्येक वाफा 6 मीटर लांब (20 फूट),1.25 मीटर (4 फूट.) रुंद,आणि 15 सेंटिमीटर (6 इंच) उंच असतो. प्रती हेक्टरी 37 वाफे तयार करतात. चारा देणार्‍या 104 झाडांची रोपे लावण्यासाठी चर/खड्डे मार्चध्ये खोदण्यात येतात.

खड्ड्याचा आकार 45 ु 45 ु 45 (2 ु 2 ु 2) असतो. खड्ड्याच्या वरच्या बाजूस लहान आकाराचा जलशोषक चर खोदण्यात येतो. धूप थांबविण्यासाठी व पाणी वाढविण्यासाठी नालाबांध व घळी बुजविण्याचे काम केले जाते. तिसर्‍या विभागात गवताचे बी तयार करण्यास एकूण क्षेत्राच्या दोन टक्के भागावर गवती ओटे तयार करतात. या गवती ओट्यांवर 20 सें.मी ु 30 सें.मी. अंतरावर बी टोचले जाते. गवताच्या बियांबरोबर हमाटा बी वाफ्यांवर पेरले जाते. उरळीच्या उंचवट्यावर गवत प्रजातीचे बी एका ओळीत टोकण पद्धतीने पेरले जाते, पावसाळा सुरू होताच अंजन, शिसू, शिवण, शिरसच्या वृक्षप्रजातींच्या रोपांची लागवड करतात. पावसाळ्यात दोनदा निंदणी करतात. रोपांभोवती मातीचा थर घालतात. गुरांपासून संरक्षणासाठी रखवालदार ठेवला जातो. पाऊस पडल्यावर झुडपे तोडण्यात येतात. दुसर्‍या वर्षी पाऊस सुरू झाल्यावर पहिल्या वर्षी गवताचे बी उगवले नाही, अशा मोकळ्या राहिलेल्या जागी गवताचे ठोंब लावण्यात येतात. वैरण वृक्षप‘जातीच्या रोपांभोवती दोनदा निंदणी करून मुळांभोवती मातीची भर घातली जाते. गवती ओट्यांची एकदा निंदणी केली जाते.

जानेवारी महिन्यात कुरणक्षेत्राभोवती जाळरेषा घेतली जाते. तिसर्‍या वर्षी वृक्षप्रजातीच्या रोपांभोवती एकदा निंदणी करून मातीची भर घातली जाते. जानेवारी महिन्यात जाळरेषा घेतली जाते. चौथ्या व पाचव्या वर्षात अनावश्यक झुडपे तोडणे, जाळरेषा घेणे इत्यादी कामे केली जातात. पाच वर्षांपर्यंत रखवालदार ठेवला जातो. या कार्यपद्धतीमुळे, पावसाने दगा दिल्यास अपवाद वगळता, जमीन सुस्थितीत असेल तर कुरण सुधारणेचा प्रश्‍न कायमचा मिटतो. उपलब्ध आकडेवारीनुसार कुरणक्षेत्र विकास कामाुंळे सरासरी वैरण उत्पादन प्रती हेक्टरी 18 क्विंटलपर्यंत येते. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान गवताचे बी गोळा केले जाते. मारवेल, शेडा, बेर, मोशी या गवत प्रजातींचे 10 ते 15 मेट्रिक टन बी दरवर्षी गोळा केले जाते. सधनतृण विकास विभागाची बियांची गरज दरवर्षी भागवून उरलेले बी वनविभागाच्या इतर भागांना पुरवले जाते. 1992-93 पासून कुरणविकासाच्या तंत्रज्ञानात बदल करण्यात आला आहे. या नवीन कार्यपद्धतीत प्रती हेक्टरी 100 गवती ओटे व 50 चर तयार केले जातात.

प्रत्येक चरावर वैरण देणार्‍या 3 वृक्षांची रोपे लावली जातात. या पद्धतीत इंग‘जी व्ही आकाराच्या सरी किंवा उरळींचा अंतर्भाव नाही. खोल नांगरटही वगळण्यात आली आहे. परंतु पहिल्या विभागात उताराच्या व मातीची खोली कमी असलेल्या भागात जलसंधारण व मृदसंधारण या दोन्ही दृष्टीने सरी (उरळ्या) परिणामकारक ठरतात. भारतीय कुरण क्षेत्र व चारा संशोधन संस्था, झाशी येथे केलेल्या अभ्यास व निरीक्षणानुसार आठ ते दहा मीटर अंतरावरील समतल चरींमुळे वैरणीचे उत्पादन 6 पटींने वाढले.

गवताची विल्हेवाट

 

1 कुरणातील गवत उघड लिलाव पद्धतीने गवत मक्तेदारांना विकण्यात येते.

2 अवर्षणग‘स्त किंवा दुष्काळी भागातील कुरण क्षेत्रात तयार झालेले गवत गरजेनुसार राज्यभर पुरवठा करण्यासाठी राज्यसरकारच्या प्रतिनिधींच्या ताब्यात दिले जाते.

3 ज्या कुरण क्षेत्रातील गवत लिलाव पद्धतीने विकले जात नाही, तेथील गवत स्थानिक लोकांना कापून व वाहून नेण्यासाठी विकले जाते.

4 ग्रामपंचायती, दुग्धविकास सहकारी संस्था आणि विविध सहकारी संस्थांना सुधारित कु रणे ठरविलेल्या किंमतीस वाटली जातात.

कुरण क्षेत्रविकास योजनेध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. परवानगी न घेता गुरे चारण्याचे गुन्हे नेहमी घडतात. अशा वेळी प्रत्येक जनावरामागे दंड म्हणून ठराविक रक्कम वसूल केली जाते. कुरणांसाठी केवळ रखवालदार ठेवून कुरणांचे संरक्षण करता येणार नाही. गवती कुरणातील लिलाव मक्तेदारांना करून विक्री करण्याच्या पद्धतीमुळे स्थानिक लोकांना जवळच असलेला चारा मिळत नाही. यासाठी विकसित कुरणातील गवत परवाना पद्धतीने कापून व वाहून नेऊ द्यावे असे शेतकर्‍यांचे सर्वसाधारण मत आहे. अशी व्यवस्था केल्यास कुरणक्षेत्रात आपलाही अधिकार आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण होईल आणि कुरण क्षेत्राचे रक्षण करण्यात त्यांचाही सहभाग असेल. जवळपास राहणार्‍या लोकांध्ये गवत समप्रमाणात विभागून देणेही जरुरीचे आहे. वन अधिकारी यांनी एक ठराविक पद्धती सगळीकडे न अनुसरता गावकर्‍यांशी चर्चा करून, कोणती पद्धत वापरायची,किती फी घ्यायची हे ठरवावे. 1986 मध्ये वनविभागाने खडकी (ता. मालेगाव) येथे कुरण सुधारण्याचे कार्य लोकांच्या सकि‘य सहभागाने सुरू केले. हे याबाबतीत आदर्श उदाहरण ठरावे.

गावकर्‍यांना गवत कापून वाहून नेण्याची मुभा आहे. याचा परिणाम म्हणजे सर्व कुरण क्षेत्रात शेडा, मारवेल तांबडगोटा या गवतप्रजातींचे आच्छादन वाढले आहे. झाडांची उत्तम वाढ झाली असून, अंजनवृक्षाची नैसर्गिक पुनरुत्पत्ती होऊ लागली आहे. इतर ठिकाणी रखवालदाराची नेणूक आवश्यक असते. परंतु येथे रखवालदार न ठेवताही कुरणाचे रक्षण करता येते. वनखात्याचा या योजनेचा अनुभव लक्षात घेऊन काही निष्कर्ष काढता येतात. हे निष्कर्ष खाजगी व सामायिक मालकीच्या कुरणांच्या बाबतीतही मार्गदर्शक ठरतील. कुरणे ही वनस्पती समाजाच्या विकासातील पहिली किंवा दुसरी पायरी आहे. कुरणात वृक्ष प्रजातींची खोडमुळे मोठ्या प्रमाणावर असतात. मानवी हस्तक्षेपापासून संरक्षण मिळताच ही खोडमुळे फुटवे निर्माण करतात. काही वेळा त्यांची फार दाट वाढ होते. त्याचा गवताच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. विभाग एकमध्ये वृक्षप्रजातींचे फुटवे काढावेत. कारण तेथे जमीन फारशी खोल नसते. विभाग तीनमध्ये जमीन जास्त खोल असल्यामुळे अशा ठिकाणी प्रत्येक खुंटावर एक-एक फुटवा ठेवून ठराविक कालावधीनंतर फांद्या छाटून त्यांच्यात योग्य अंतर ठेवले तर फुटव्यांचा गवताच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होणार नाही.

संरक्षण मिळाल्याने झुडपे मोठ्या सं‘येने वाढतात. याचा गवताच्या उत्पादनावर परिणाम होऊन ते कमी होते. झुडपांची वाढ मर्यादित ठेवण्यासाठी ठराविक कालावधीनंतर त्यांच्या फांद्या कापणे आणि शेळ्या-मेंढ्या चारणे हे उपाय करता येतील. मात्र शेळ्या-मेंढ्यांची सं‘या कुरण क्षेत्राचा आकार लक्षात घेऊन मर्यादित ठेवावी. लेंंड्याुंळे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढेल. लोकांकडून आवश्यक असलेले सहकार्य व सहभागाची भावनाही वाढेल. सध्या शेडा व मारवेल या गवत प्रजातींचे बी जमिनीचा प्रकार व स्थिती न पाहता सरसकट पेरण्यात येते. डोंगरउतार, लालसर मुरमाची जमीन तसेच पाण्याचा निचरा होणार्‍या जमिनीवर शेडा गवत हे नैसर्गिकरीत्या येते. मध्यम खोलीच्या व लालसर जमिनीवर डोंगरी जातींच्या गवताचे उत्त्पादन अधिक येते. मारवेल प्रजातींचे गवत मध्यम ते खोल काळ्या जमिनीत उत्तम वाढते. तेव्हा जमिनीचा र?कार व खोली लक्षात घेऊन विविध प्रजाती लावाव्यात. खोल नांगरटीत बी लावल्यास उगवण कमी होते. असे दिसून आले आहे. चांगल्या उगवणीसाठी हलकी, कमी खोलीची नांगरट करून 50 सें.मी.अंतरावर प्रती हेक्टरी चार ते सहा किलो बी ओळीत पेरण्यात यावे. गवताचे बी लागण्याअगोदर गवत बी, गाळाची माती, शेणखत व रेती (1:3:1:1) या प्रमाणात मिसळून त्याच्या गोळ्या कराव्यात. गवताचे बी 0.८ सें.मी.पेक्षा जास्त खोल व शिंबी वनस्पतींचे बी, 1.2 सें.मी.पेक्षा अधिक खोल पेरू नये.

 

माहिती लेखन : वनराई संस्था

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate