Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/08/15 09:40:14.521303 GMT+0530
मुख्य / पोर्टल धोरणे
शेअर करा

T3 2020/08/15 09:40:14.523628 GMT+0530

T4 2020/08/15 09:40:14.525301 GMT+0530

पोर्टल धोरणे

पोर्टल धोरणे

विकासपीडीयावर स्वागत!!!

vikaspedia.in हे बहुभाषिक पोर्टल इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि भारत सरकार ह्यांच्या पुढाकाराने तयार केले गेले आहे. स्थानिक भाषांमधून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्ञान पुरवून गरिबांचे सबलीकरण करणे हा त्यामागील हेतू आहे.

कृपया खाली या वेब पोर्टल ला भेट देणारे याचा वापर करणारे इ. तसेच या पोर्टलच्या वापर संदर्भात काही अटी व धोरणे दिलेली आहेत. ह्या पोर्टलचा वापर करण्यापूर्वी अथवा इथे कुठल्याही प्रकारची माहिती टाकण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचा. ह्या धोरणां मध्ये कधीही बदल केला जाऊ शकतो. तथापि हे सुधारित धोरण पोर्टल वर प्रकाशित केले जाईल.

आशय लेखन, मर्यादन आणि मान्यता धोरण

विकासपीडियावरील आशय दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या शेती, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, ऊर्जा आणि इ-शासन ह्या सहा मुख्य विषयांशी संबंधित असेल. मान्यताप्राप्त आशय-लेखक, राज्य नोडल संस्था (SNA), तज्ञ आणि तज्ञ संस्था ह्यांच्याकडून आलेला आशय (मजकूर) स्वीकारला जाईल. माहितीची एकसामानता तसेच संबंधित मेटाडेटा आणि कीवर्डसचे प्रमाणीकरण टिकवण्यासाठी आशय सातत्यपूर्ण असणे गरजेचे आहे. वापरकर्त्याला गरजेनुसार आशय मिळण्यासाठी आशयाचे योग्यरीतीने वर्गीकरण आणि संयोजन केले जाणे आणि संबंधित मजकूर कार्यक्षमतेने मिळवता येणे आवश्यक असते. ह्यासाठी वेबवर आधारित आणि वापरकर्त्यास सोयीस्कर संवादमाध्यम (इंटरफेस) असलेली आशय व्यवस्थापन प्रणाली वापरण्यात आली आहे.

पोर्टलवर दाखवल्या जाणार्‍या आशयावर खालील विभागांद्वारे सतत प्रक्रिया केली जाते -

 • मान्यताप्राप्त आशय-लेखक, राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था (SNA), तज्ञ आणि तज्ञ संस्था ह्यांच्याद्वारे आशयाची निर्मिती
 • मान्यताप्राप्त आशय-लेखक, राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था (SNA), तज्ञ आणि तज्ञ संस्था ह्यांच्यापैकी कोणाहीद्वारे आशयामध्ये फेरबदल
 • मान्यताप्राप्त आशय-लेखक, राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था (SNA), तज्ञ आणि तज्ञ संस्था ह्यांच्याद्वारे आशयाचे परीक्षण
 • आशयाची मुदतसमाप्ती – विषय / आशयाच्या प्रत्येक भागाच्या मुदतसमाप्तीचा निश्चित दिनांक असणे
 • मुदतबाह्य झालेल्या आशयाचे अभिलेखन (अर्काइव्हिंग) करणे

आशय सादर झाल्यानंतर तो वेब पोर्टलवर प्रकाशित होण्यापूर्वी त्याच्यावर परीक्षण तसेच नियंत्रणाची योग्य प्रक्रिया केली जाते. हे नियंत्रण बहुस्तरीय आणि पदानुसारी असते.

पोर्टलवरील आशयाचे विविध प्रकार:-

 • माहिती
 • ज्ञानाधारित मजकूर
 • सेवा
 • वापरकर्त्यांचा अभिप्राय आणि चर्चेतील मुद्दे

ज्ञान पोर्टलवरील आशयाचे व्यवस्थापन समविचारी व्यक्ती तसेच संस्था व लाभार्थींद्वारे केले जात असल्यामुळे हा आशय खालीलप्रमाणे असावा अशी वापरकर्त्यांची अपेक्षा असते -

 • अस्सल
 • अचूक
 • अद्यावत
 • सर्वसमावेशक
 • समर्पक
 • समजण्यास सोपा
 • शोधण्यास सोपा
 • वापरण्यास सोपा
 • सहाय्यकारी आणि माहितीपूर्ण

आशयाच्या नियंत्रणाची प्रक्रिया -

आशयातील शब्द, शैली, सादरीकरण आणि मांडणी ह्या बाबींची जबाबदारी मान्यताप्राप्त आशय-लेखकांची आहे.

आशयाची अचूकता, तांत्रिक वैधता, शैलीची एकसमानता, मजकुरातून ध्वनित होणारा अर्थ आणि सरकारी धोरणे तसेच लेखकाच्या मताशी सुसंगती ह्या बाबींची जबाबदारी राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था SNAs / डोमेन प्रमुखांची आहे.

कार्यप्रक्रिया कमीतकमी ठेवली जाते.

पोर्टल काही प्रमाणात खुले केलेले असल्यामुळे आशय नागरिकांना तसेच मान्यताप्राप्त आशय-लेखक, राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था (SNAs), तज्ञ आणि तज्ञ संस्थांना पाहण्यासाठी व फेरबदल करण्यासाठी प्रत्येक पातळीवर उपलब्ध आहे.

पद आणि जबाबदार्‍या

1) वेब प्रशासक/  व्यवस्थापक

 • वेब पोर्टलचा एकंदर विकास आणि देखभाल
 • (संघटनात्मक, नियामक, कायदेशीर इ.) धोरणांशी सुसंगती असल्याची खात्री करणे कारण त्यानुसार वेब पोर्टलवरील आशय, रचना, सुरक्षितता आणि प्रक्रियांमध्ये कदाचित फेरबदल करावे लागतात
 • मुख्य सुधारणांनुसार वेब पोर्टलच्या सुरक्षिततेची परीक्षा (ऑडिट) करणे
 • वापरकर्त्यांनी वेब पोर्टलला दिलेल्या भेटींचे विश्लेषण करून प्रकल्प व्यवस्थापकांना अभिप्राय कळवणे
2) राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था /  डोमेन प्रमुख
 • एखाद्या राज्यातील विशिष्ट भाषा बोलणार्‍या वेब पोर्टलच्या वापरकर्त्यांना समर्पक ठरणारी अचूक आणि अद्यावत माहिती प्रकाशित करणे
 • धोरणे ठरवणे, वेब पोर्टल व त्यासंदर्भातील आशयाचा विकास, मान्यता, अद्यतन, कार्यवाही, अंमलबजावणी आणि व्यवस्थापनाशी संबंधित प्रक्रियांची संकल्पना करून त्या अमलात आणणे.
 • पोर्टलवरील शेती, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, ऊर्जा आणि इ-शासन ह्या दैनंदिन जीवनाशी निगडित सहा मुख्य विषयांशी संबंधित आशय प्रत्येक भाषेत नियमितपणे सादर करणे
 • वेब प्रशासक / व्यवस्थापकाच्या सहयोगाने भाषा पोर्टल व त्याच्या कामगिरीवर देखरेख करणे, वेब पोर्टलचे वापरकर्ते तसेच इतर माहितीचा प्रसार करणे
 • पोर्टलवरील आशयाचे परीक्षण आणि मान्यतेसाठी भाषा व विषयांचे प्राधिकृत तज्ञ नेमणे तसेच आशय सादर करण्यासाठी प्राधिकृत आशय-लेखक नेमणे
 • आशयाशी संबंधित धोरण, योजना, कायदे व नियमांचे वेळेवर अद्यतन करणे

राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था /  डोमेन प्रमुखांद्वारे वेबवरील त्यांच्याशी संबंधित भाषा आणि डोमेनमधील आशयाचे नियमितपणे परीक्षण केले जाईल. पोर्टलवर सादर होणार्‍या सर्व आशयाचे यथायोग्य नियंत्रण राज्य नोडल एजन्सीद्वारे केले जाणे आवश्यक आहे.

आशय परीक्षण धोरण

वरील हेतू ध्यानात घेता पोर्टलवरील आशय (मजकूर) सत्य तसेच अद्यावत ठेवणे आणि ह्यासाठीच आशय परीक्षण धोरणही असणे गरजेचे आहे. आशयाचा विस्तार फारच अजस्त्र असल्यामुळे विविध प्रकारच्या मजकुरानुसार विभिन्न परीक्षण-धोरणे निश्चित केलेली आहेत. आशयाचे विविध प्रकार, त्यांची वैधता, समर्पकता तसेच लेखारक्षण धोरणावर परीक्षण धोरण आधारित आहे. मान्यताप्राप्त आशय-लेखक, पोर्टलवरील अधिकांश आशय (मजकूर) राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था (SNAs), तज्ञ आणि तज्ञ संस्था ह्यांच्याकडून आलेला असतो.

पोर्टलच्या कार्यपद्धतीमध्ये परस्परसहकार्यातून आशयाची निर्मिती करण्यास परवानगी असल्याने हा आशय मान्यताप्राप्त आशय-लेखक, राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था (SNAs), तज्ञ आणि तज्ञ संस्था ह्यांच्यापैकी कोणाहीद्वारे संपादन आणि परीक्षणासाठी खुला केला जातो.

पोर्टलवरील आशयाचा काही भाग संरक्षित असतो व हा मजकूर संपादन / परीक्षणासाठी खुला केला जात नाही. परंतु निवडक प्राधिकृत व्यक्तींद्वारे ह्या आशयाचे संपादन / परीक्षण केले जाऊ शकते.

चर्चा मंच, सूचना आणि अभिप्रायांशी संबंधित आशय, सर्वांना पाहण्यासाठी खुला करण्यापूर्वी, राज्य नोडल संस्थांद्वारे नियंत्रित केला जातो.

खालील तक्त्यामध्ये आशय परीक्षण धोरण स्पष्ट केले आहे:

अनुक्र.आशय व सेवेचा प्रकारपरीक्षणाची वारंवारतापरीक्षक आणि मान्यतादायकसंरक्षित आशयाचे परीक्षण ह्यांच्याद्वारे -
1 पोर्टलमधील डेटा (माहिती) * नियमित SNAs, परीक्षक, विकासपीडियाचे डोमेन प्रमुख SNAs, विकासपीडियाचे डोमेन प्रमुख
2 धोरण/ कायदे/ योजना/ नियम त्रैमासिक.
नवीन कायदे / नियमांसाठी त्वरित
SNAs, परीक्षक, विकासपीडियाचे डोमेन प्रमुख -
3 दस्तऐवज/प्रकाशने/अहवाल त्रैमासिक
SNAs, परीक्षक, विकासपीडियाचे डोमेन प्रमुख -
4 बातम्या दररोज SNAs -
5 फोटो / व्हीडिओ गॅलरी नियमित SNAs, विकासपीडिया व्यवस्थापक -
6 तांत्रिक अद्यतन नियमित विकासपीडिया वेब व्यवस्थापक -
7 शेती, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, ऊर्जा आणि इ-शासन ह्या दैनंदिन जीवनाशी निगडित सहा मुख्य विषयांशी संबंधित असलेला आशय नियमित SNAs, परीक्षक, विकासपीडियाचे डोमेन प्रमुख SNAs, विकासपीडियाचे डोमेन प्रमुख
8 ऑनलाइन सेवा. उदा. –इ-व्यापार, स्मरणक, प्रश्नमंजूषा नियमित डोमेन प्रमुख आणि विकासपीडियाचे वेब व्यवस्थापक विकासपीडिया वेब व्यवस्थापक
9 पताका (बॅनर)

त्रैमासिक. एखाद्या घटनेनंतर त्वरित

डोमेन प्रमुख आणि विकासपीडियाचे वेब व्यवस्थापक -

वर उल्लेख केलेल्या डेटाच्या परीक्षणाच्या वारंवारतेचे व्यवस्थापन आणि परीक्षण मान्यताप्राप्त आशय-लेखक / संपादक तसेच राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था (SNAs) आणि डोमेन प्रमुखांद्वारे केले जाऊ शकते. पोर्टलवरील संपूर्ण आशयाचे परीक्षण वाक्यरचनेच्या संदर्भात नियमितपणे केले जाईल.

*: "डेटा" ह्याचा अर्थ संगणक प्रणाली किंवा संगणकीय जालामध्ये प्रक्रिया झालेली किंवा प्रक्रिया होत असलेली किंवा प्रक्रिया होणार असलेली तसेच विशिष्ट प्रकारे बनवलेली किंवा बनवली जात असलेली आणि कोणत्याही प्रकारे (प्रिंटआउट, मॅग्नेटिक किंवा ऑप्टिकल साधने, पंच्ड कार्डस् वा टेप्स किंवा संगणकाच्या अंतर्गत मेमरीमध्ये) साठवली जात असलेली माहिती, ज्ञान, वस्तुस्थिती, संकल्पना अथवा सूचना ह्यांचे प्रातिनिधिक सादरीकरण. (माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2009)

आशय अभिलेखन धोरण

विकासपीडियावरील आशयाच्या प्रत्येक घटकासोबत मेटाडेटा, स्रोत आणि वैधता दिनांक पुरवलेला असतो. काही घटकांचा वैधता दिनांक माहीत नसण्याची शक्यता असते. अशावेळी सदर आशय कायमस्वरूपी असल्याचे सांगितले जाते. ह्या प्रसंगी वैधता दिनांक दहा वर्षांनंतरचा असतो व ह्या वैधता दिनांकानंतर सदर आशय वेबसाइटवर दर्शवला जाणार नाही.

ज्या थेट आशयाचा वैधता दिनांक चालू दिनांकानंतरचा असेल ते घटक (उदा. उद्घोषणा, बातम्या) पोर्टलवर दाखवले जातात. दस्तऐवज, योजना, सेवासुविधा, प्रपत्रे (फॉर्म्स), संदर्भित वेबसाइट्स आणि संपर्क निर्देशिकेचे, आशय परीक्षण धोरणानुसार, नियमित कालावधीनंतर परीक्षण केले जात आहे. वैधता दिनांकापूर्वी दोन आठवडे संबंधित आशय-लेखकांना संबंधित मजकुराचे पुनपरीक्षण करण्याची आणि गरज असल्यास वैधता दिनांकामध्ये फेरबदल करण्याची सूचना पाठवली जाते. त्यांच्याकडून काही प्रतिसाद न मिळाल्यास वैधता दिनांकापूर्वी एक आठवडा स्मरणक पाठवला जातो. त्यानंतर सदर आशय पोर्टलवर प्रकाशित न करता अभिलेखित केला जातो. ह्यामुळे भविष्यात तो परत मिळवणे शक्य होते.

विकासपीडिया पोर्टलवरील आशयाचे प्राधिकृत सदस्यांद्वारे नियमित परीक्षण केले जाते. स्वीकृत धोरणांनुसार हे सदस्य म्हणजे आशय-लेखक, परीक्षक, राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था, तज्ञ व तज्ञ संस्था असतात. पोर्टलमधील आशयाबाबत असलेली विविध आगमन /निर्गमन तसेच अभिलेखन धोरणे खालीलप्राणे आहेत:-

अनुक्र.आशयाचा प्रकारअभिलेखगृहातील नोंदनिर्गमन (अभिलेखगृहातून हटवणे)
1 कार्यक्रम / योजना कार्यक्रम / योजना थांबवणे अभिलेखगृहात 5 वर्षांपर्यंत ठेवला जातो
2 धोरणे धोरण थांबवणे अभिलेखगृहात कायमचा ठेवला जातो
3 कायदे/नियम अधिसूचना रद्द करणे अभिलेखगृहात कायमचा ठेवला जातो
4 नवीन काय, बातम्या समर्पकता संपणे वैधता कालवाधी संपल्यानंतर लगेच
5 पोर्टलमध्ये समाविष्ट असलेल्या दैनंदिन जीवनाशी निगडित सहा मुख्य विषयांशी निगडित आशय व मजकूर वैधता कालवाधी संपल्यानंतर लगेच काढून टाकल्याच्या दिनांकापासून पाच वर्षांपर्यंत
6 दस्तऐवज/प्रकाशने/अहवाल वैधता कालावधीची पूर्तता दस्तऐवज / अहवाल संग्रहालयात उपलब्ध
7 फोटो-गॅलरी समर्पकता संपणे काढून टाकल्याच्या दिनांकापासून पाच वर्षांपर्यंत
8 पताका समर्पकता संपणे काढून टाकल्याच्या दिनांकापासून पाच वर्षांपर्यंत

 

मालकीहक्क धोरण

या पोर्टलवर उपलब्ध असलेली माहिती, मेलद्वारे आमची पूर्वपरवानगी घेतल्यानंतर विनामुल्य पुनर्वापर करता येऊ शकते.  तथापि पुनर्वापर करताना ती अचूकपणे तयार करावी आणि त्याचा वापर हानिकारक किंवा गैरसमज पसरवणार्‍या मार्गाने करू नये.  या माहितीचे  पुनर्प्रकाशन करताना किंवा त्यांचा इतरत्र वापर करताना स्रोताची दखल घेतलेली दिसणे आवश्यक आहे.  ज्या माहितींचा मालकीहक्क अन्य पक्षाकडे असेल, त्यांचा वापर करण्यासाठीची परवानगी, तेथे नमूद केल्यानुसार, संबंधित संस्थांकडून / हक्कधारकाकडून मिळवावी.

गुप्तता धोरण

आपण आम्हांस पुरवलेली स्वतःविषयीची माहिती आम्ही सुरक्षित ठेवू इच्छितो. ह्या गोपनीयता  धोरणाची रचना आपणांस आपण ह्या पोर्टलवर पुरवलेली माहिती साठवणे, वापरणे तसेच वितरित करण्याबाबतच्या आमच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासाठी केली आहे. पोर्टलवरील माहिती वापरण्यापूर्वी किंवा ती सादर करण्यापूर्वी हे गोपनीयता धोरण पूर्णपणे वाचल्याची खात्री करा. अटी व शर्ती, सदर गोपनीयता धोरणासहित, कधीही बदलू शकतात. हे बदल ह्या पोर्टलवर प्रकाशित केले जातात. आपण हे पोर्टल वापरत आहात ह्याचा अर्थ असा होतो की आपण आमची गोपनीयता विषयक कार्यपद्धती वाचली आहे व ती आपणांस मान्य आहे जी सदर गुप्तता धोरणामध्ये विशद केली आहे आणि आमच्या गोपनीयता धोरणास आपली मान्यता आहे. सदर गोपनीयता विधानाबाबत आपणांस काही शंका किंवा प्रश्न असल्यास आपण ह्या पोर्टलमध्ये पुरवलेल्या आमच्या संपर्क-तपशिलाद्वारे आमच्यापर्यंत पोहोचू शकता.

ह्या धोरणामध्ये खालील विषय समाविष्ट आहेत:

 • आपली संमती

हे पोर्टल वापरल्याने आपण ह्या गोपनीयता धोरणाच्या अटींना मान्यता देत आहात. जेव्हा आपण ह्या पोर्टलद्वारे माहिती सादर करता तेव्हा, सदर गोपनीयता धोरणानुसार, त्या माहितीची साठवण, वापर तसेच वितरणास आपण मान्यता देत असता

 • माहिथीचे सक्रिय संकलन

हे पोर्टल, त्याला भेट देणार्‍यांकडून, इमेल तसेच अभिप्राय-प्रपत्रांद्वारे थेट संपर्क साधण्याची परवानगी देऊन, सक्रिय पद्धतीने माहितीचे संकलन करते. आपण सादर केलेल्या माहितीच्या काही भागांवरून आपली वैयक्तिक ओळख पटू शकते (उदा. नाव, पत्ता, इमेल पत्ता, दूरध्वनी क्र. इ. सारख्या बाबी आपल्याशी अद्वितीय पद्धतीने निगडित असतात).

ह्या पोर्टलच्या काही भागांमध्ये आपणांस, तेथील सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी, विशिष्ट माहिती सादर करावी लागेल (उदा. सदस्यत्वासाठी वर्गणी देणे). माहिती संकलनाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणती माहिती अनिवार्य आहे आणि कोणती वैकल्पिक आहे ह्याबाबत सांगितले जाईल.

 • माहितीचे निष्क्रिय संकलन

आपण पोर्टलमध्ये असताना काही माहिती निष्क्रिय पद्धतीने (म्हणजेच आपण ती प्रत्यक्ष न पुरवताही) संकलित होत असते. ह्यासाठी विविध मार्ग आणि तंत्रज्ञान वापरले जाते, उदा. नेव्हिगेशनल डेटा कलेक्शन.

ह्या पोर्टलद्वारे इंटरनेट प्रोटोकॉल (IP) पत्त्यांचा वापर केला जाऊ शकतो. IP पत्ता म्हणजे आपल्या इंटरनेट सेवा प्रदात्याने आपल्या संगणकाला दिलेला एक क्रमांक असतो ज्यायोगे आपण इंटरनेटवर प्रवेश करू शकता. IP पत्ता हा साधारणतः वैयक्तिक ओळख-पडताळणी होऊ न शकणार्‍या प्रकारचा असतो कारण बरेचदा हा पत्ता चल (डायनॅमिक) प्रकारचा असून आपण दर वेळी इंटरनेटशी जोडता तेव्हा बदलणारा असतो, वापरकर्त्याच्या संगणकाशी संबंधित अद्वितीय प्रकारचा नव्हे. आम्ही आपल्या IP पत्त्याचा उपयोग आमच्या सर्व्हरशी संबंधित समस्यांचे निदान करण्यासाठी, सकल माहितीचा अहवाल देण्यासाठी, आपला संगणक आणि पोर्टल ह्यांना जोडणारा सर्वात गतिमान मार्ग शोधण्यासाठी तसेच पोर्टलचे व्यवस्थापन आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी करतो.

माहिती वापरणे आणि ती उघड करणे

अन्यथा वर नमूद केले नसल्यास, आम्हा आपल्या माहितीचा वापर आमच्या पोर्टलची उपयुक्तता वाढवण्यासाठी, (आपण मागवली असल्यास) आपणांस माहिती पाठवण्यासाठी, आमच्या विपणन (मार्केटिंग) आणि संशोधनकार्यासाठी (उदा. वापरकर्त्याचे भौगोलिक स्थान, आवडीनिवडी आणि वर्तणूक) तसेच आमच्याकडे स्वतःच्या उत्पादनांची आणि सेवांची थेट विपणनाच्या हेतूने प्रसिद्धी करणार्‍या सहयोगी व तृतीय पक्षांची अद्यावत माहिती (आपणांस तीमध्ये रस असल्यास) कळवण्यासाठी कदाचित करू. तसेच सदर माहिती आम्हांस कदाचित, लागू कायदे आणि मानकांच्या, आवश्यकतांनुसार उघड करावी लागेल. आपणांस असलेला निवडीचा अधिकार आमच्यासाठी अर्थातच महत्त्वाचा आहे. त्यामुळे इतर उत्पादने आणि सेवासुविधांबाबत आपणांस आमच्याकडून माहिती नको असल्यास आपण तसे आम्हाला पोर्टलवरील संपर्क-तपशिलांच्या आधारे कळवू शकता.

वैयक्तिक ओळख-पडताळणी होऊ शकेल अशी माहिती आपण पोर्टलवर पुरवली असल्यास आम्हा अशा माहितीचे संयुक्तन, माहिती-संकलनाच्या स्थानावरच आम्ही तसे अन्यथा सांगितले नसल्यास, सक्रिय प्रकारे संकलित केलेल्या इतर माहितीसोबत कदाचित करू. वैयक्तिक ओळख-पडताळणी होऊ शकेल अशा माहितीचे संयुक्तन निष्क्रिय प्रकारे संकलित केलेल्या माहितीसोबत होणे टाळण्यासाठी, आपली अन्यथा संमती नसल्यास, आम्ही व्यावहारिक दृष्ट्या शक्य ती सर्व काळजी घेऊ.

ओळख-पडताळणी होऊ शकेल अशी आपली माहिती, त्या माहितीची हाताळणी सदर गुप्तता धोरणानुसार करण्यास मान्यता देणार्‍या, C-DAC च्या जागतिक पातळीवरील सहयोगींकडे कदाचित उघड करू. ह्याशिवाय ओळख-पडताळणी होऊ शकेल अशी आपली माहिती भारतातील आणि/अथवा परदेशांतील तृतीय पक्षांकडे, ते खालील अटी पूर्ण करीत असल्यास, कदाचित उघड करू -

(i) ते कंत्राटदार असून आमच्या व्यवसायास समर्थन देत असतील (उदा. – परिपूर्ती सेवा, तांत्रिक समर्थन, पोचवणी सेवा, वित्तसंस्था) आणि सदर माहितीची हाताळणी ह्या गुप्तता धोरणानुसार करण्याचे मान्य करतील

(ii) व्यावसायिक विक्री, नेमणूक, सदर माहितीचा संबंध असेल अशी ह्या पोर्टलच्या व्यवसायाची अन्य हस्तांतरणे. अशा वेळी जे ग्राहक सदर माहितीची हाताळणी ह्या गुप्तता धोरणानुसार करण्याचे मान्य करतील. अथवा

(iii) लागू कायदे, न्यायालयीन हुकूम किंवा सरकारी नियमने. ह्याशिवाय ह्या पोर्टलद्वारे संकलित केलेल्या आणि जीवरून वैयक्तिक ओळख-पडताळणी शक्य नाही अशा सर्व माहितीचा पूर्ण उपयोग आम्ही करू.

इतर वेबसाइट्सवरील लिंक्स

आमच्या पोर्टवर लिंक्स असलेल्या वेबसाइट्सद्वारे आपली ओळख-पडताळणी होऊ शकेल अशा माहितीचे संकलन कदाचित होऊ शकते. सदर धोरणाच्या आशयामध्ये ह्या पोर्टलला लिंक झालेल्या वेबसाइट्सच्या माहिती-संरक्षण कार्यपद्धतींचा समावेश होत नाही. अशा तृतीयपक्षी वेबसाइट्सच्या माहिती-संरक्षण कार्यपद्धतींची तपासणी, त्यांचा वापर करण्यापूर्ली, आपण तपासून पहावी असा सल्ला आम्ही देत आहोत. कृपया ध्यानात ठेवा की कोणत्याही तृतीयपक्षी वेबसाइट्सच्या माहिती-संरक्षण कार्यपद्धतींची जबाबदारी आमच्यावर नाही. हे गुप्तता विधान फक्त ह्या पोर्टलने संकलित केलेल्या माहितीला लागू आहे.

सुरक्षितता

आपण आपली माहिती आपल्या संगणकाकडून आमच्या पोर्टलकडे पाठवता तेव्हा जीवरून आपली ओळख-पडताळणी होऊ शकेल अशी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच अशी माहिती हरवणे, तिचा दुरूपयोग होणे, तीवर अनधिकृत रीत्या प्रवेश केला जाणे किंवा ती उघड केली जाणे किंवा तीमध्ये फेरबदल केला जाणे किंवा ती नष्ट केली जाणे ह्या बाबी टाळण्यासाठी आम्ही व्यावहारिक दृष्ट्या शक्य ती सर्व काळजी घेतो.

आम्ही आपल्या आर्थिक माहितीचा वापर, आपणांशी आर्थिक व्यवहार करण्याखेरीज इतर बाबींसाठी, आम्ही करणार नाही. आमचे अधिकृत प्रतिनिधी आणि सहयोगी ह्यांच्याशिवाय इतर कोणालाही आम्ही आपला इमेल पत्ता देणार नाही किंवा कोणाहीसोबत देवाण घेवाण करणार नाही. परंतु इंटरनेटवरील कोणताही व्यवहार 100% सुरक्षित असल्याची हमी कोणीही देऊ शकत नाही. परिणामी आम्ही आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचा शक्य तितका प्रयत्न करीत असलो तरीही आपण इंटरनेटवरून आम्हांस पाठवलेल्या कोणत्याही माहितीच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही व आपण ही कृती आपल्या स्वतःच्या जोखमीवर करीत असता. आमच्या प्रणालीपर्यंत पोचलेल्या आपल्या माहितीच्या सुरक्षिततेबाबत आम्ही शक्य ती सर्व दक्षता घेऊ.

अवयस्कांबाबतचे धोरण

मुलामुलींच्या गुप्ततेचे रक्षण करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ह्याच कारणासाठी १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्ती आमचे पोर्टल वापरण्यास पात्र नाहीत आणि अवयस्कांनी आमच्याकडे कोणतीही वैयक्तिक माहिती पाठवू नये असा आमचा सल्ला आहे. आपले वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्यास आपण ह्या पोर्टलवरून खरेदी, विक्री तसेच बोली लावण्याचे व्यवहार करू शकत नाही. आपणांस असे व्यवहार करायचे असल्यास ते, पोर्टलवर वापरकर्त्यांच्या रूपात नोंदलेल्या, पालकांद्वारे करणे आवश्यक आहे. अर्थात हे व्यवहार फक्त प्रौढांसाठी असलेल्या वस्तूंबाबत नसणेही आवश्यक आहे कारण अशा वस्तूंबाबतचे व्यवहार अवयस्कांशी करणे प्रतिबंधित आहे.

खात्याची सुरक्षितता

आपल्या खात्याची किल्ली म्हणजे आपला पासवर्ड (पारशब्द) होय. पासवर्डसाठी अद्वितीय अंक, अक्षरे आणि चिह्नांचा वापर करा. आपला पासवर्ड कोणालाही सांगू नका. ध्यानात ठेवा की आपण आपला पासवर्ड अथवा वैयक्तिक माहिती कोणालाही सांगितली नसल्यास आपल्या खात्याद्वारे केल्या जाणार्‍या सर्व व्यवहारांना आपणच जबाबदार आहात. आपल्या पासवर्डवर आपण नियंत्रण ठेवले नाही तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या वैयक्तिक माहितीवर होतील तसेच आपल्यावतीने केल्या गेलेल्या कृतींची कायदेशीर जबाबदारी आपल्यावरच राहील. म्हणूनच, आपल्या पासवर्डबाबत अशी काही घटना घडल्यास आपण ‘पासवर्ड विसरला’ लिंकद्वारे आम्हाला तसे त्वरित कळवा आणि आपला पासवर्ड बदला.

सुरक्षितता धोरण

सुरक्षिततेच्या कारणास्तव तसेच पोर्टलवरील माहिती सर्व वापरकर्त्यांना सतत उपलब्ध व्हावी ह्याकरता नेटवर्कच्या वापरावर (ट्रॅफिक) सतत नजर ठेवली जाते ज्यायोगे पोर्टलवरील आशय व माहितीचे नुकसान करण्याचे अनधिकृत प्रयत्न ओळखता येतात. अनधिकृत रीतीने पोर्टलवर माहिती सादर करणे वा तेथे असलेली माहिती बदलणे इ. कृती प्रतिबंधित असून भारतीय माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत दंडनीय आहेत.

ह्या पोर्टलचे लेखापरीक्षण CERT-In च्या सूचीमधील लेखापालाने केले असून सर्व प्रकारच्या संदिग्धतेचे निराकरण केले गेले आहे. ह्या पूर्ततेनंतर CERT-In च्या सूचीमधील लेखापालांकडून सुरक्षितता-मुक्तीचे प्रमाणपत्र मिळवले गेले आहे.

टीप – सुरक्षितता प्रमाणपत्रात लिहिल्यानुसार, कार्यप्रणाली किंवा परिस्थितीमध्ये फेरबदल झाल्यास, पोर्टलच्या सुरक्षिततेच्या संदर्भात नियमित तपासणी केली जाईल.

आकस्मिकता व्यवस्थापन

www.vikaspedia.in हे बहुभाषिक पोर्टल इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि भारत सरकार ह्यांच्या पुढाकाराने तयार केले गेले आहे. स्थानिक भाषांमधून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्ञान पुरवून गरिबांचे सबलीकरण करणे हा त्यामागील हेतू आहे.

वरील हेतू ध्यानात घेता कोणत्याही वेळी हे पोर्टल पूर्ण कार्यक्षमतेने उपलब्ध असणे आवश्यक आहे. माहिती आणि सेवा 24x7 पुरवली जाण्यासाठी आवश्यक त्या सर्व कृती करणे गरजेचे आहे. पोर्टल बंद राहण्याचा काळ (डाउनटाइम) कमीतकमी ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न नेहमीच केले जातील.

पोर्टलचे दृश्यचित्र खराब होणे आणि डेटा (माहिती) दूषित होण्याच्या प्रकरणी, पोर्टल त्याच्या मूळ स्थितीत आणण्यासाठी, संबंधित प्राधिकृत व्यक्तींद्वारे योग्य कारवाई त्वरेने केली जाईल.

पोर्टल देखरेख धोरण

वेब हे सतत बदलणारे माध्यम असल्यामुळे तंत्रज्ञान, वेबपर्यंत पोचण्याची साधने आणि वापरकर्त्यांच्या गरजा तसेच अपेक्षांमध्येही वारंवार बदल होत असतात. हे ध्यानात घेऊन आम्ही पोर्टलवर देखरेख ठेवण्यासंबंधीचे धोरण निश्चित केले आहे. ह्या धोरणानुसार, दर्जा आणि सुसंगतीविषयक खालील मुद्द्यांमधील समस्यानिवारणासाठी, पोर्टलवर नियमित देखरेख ठेवली जाते –

 • कामगिरी व पोर्टल बंद असण्याचा काळ
 • कार्यप्रणाली
 • खंडित लिंक्स
 • उपयुक्तता समजण्यासाठी वापराचे (ट्रॅफिक) विश्लेषण
 • भेट देणार्‍यांचा अभिप्राय ज्याचा उपयोग पोर्टल सुधारण्यासाठी तसेच वेब सुरक्षिततेसाठी होतो

वापराच्या अटी

www.vikaspedia.in ह्या बहुभाषिक पोर्टलद्वारे खुल्या स्रोतांकडून मिळवलेली शक्य तितकी खात्रीशीर माहिती आणि डेटा पुरवण्याचा हेतू आहे. तरीही विविध स्रोतांकडून (उदा. इतर वेबसाइटस तसेच आशय पुरवणार्‍या संस्था इ.) एकत्रित केलेल्या सदर डेटाच्या लेखनासंबंधीची कोणतीही जबाबदारी C-DAC घेत नाही. आशय माहितीवर आधारित असल्यास त्याच्या अचूकतेची शक्यतितकी खात्री केली जाते. लेख, वेबसाइट्सवरून उद्धृत केलेले स्फुट लेखन ह्यांमध्ये व्यक्त झालेली तसेच आशयाचे अंशदान करणार्‍यांनी योजना व धोरणांबाबत मांडलेली मते म्हणजे C-DAC चे अधिकृत मत किंवा विचार नव्हे.

 • पोर्टलशी संबंधित किंवा पोर्टलवर संदर्भ दिलेल्या कोणत्याही आशयाबाबत C-DAC कोणतीही हमी आणि /अथवा अट, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, स्वीकारत नाही. ह्यामध्ये व्यापारयोग्यता, एखाद्या विशिष्ट कामासंदर्भातील समाधानकारक दर्जा व योग्यता इ. चा समावेश आहे परंतु हे विधान ह्या समावेशापुरते मर्यादित नाही.
 • पोर्टलवरील बाबींच्या वापरामुळे किंवा त्यांचा वापर न करता आल्यामुळे होणारे संभाव्य व्यावसायिक नुकसान, अडथळा, माहिती नष्ट होणे इ. बाबत C-DAC ला असे नुकसान होण्याची शक्यता असल्याची सूचना मिळाली असली तरीदेखील, C-DAC  कोणत्याही प्रकारे जबाबदार व उत्तरदायी राहणार नाही.
 • सदर पोर्टल तसेच हे पोर्टल उपलब्ध करवून देणारा सर्व्हर व्हायरस किंवा अन्य धोकादायक बाबींपासून मुक्त असल्याची किंवा पोर्टलवरील बाबींमध्ये समाविष्ट कार्यप्रणाली अखंडित अथवा दोषमुक्त असल्याची किंवा त्यांमधील दोष दुरुस्त करण्याची कोणतीही हमी C-DAC देत नाही.
 • वापरकर्त्यास ही जाणीव दिली जात आहे की कोणतीही बाब पोर्टलवरून उतरवून घेण्याचा (डाउनलोड) किंवा ह्या पोर्टलचा वापर करून मिळवण्याच निर्णय त्याचा स्वतःचा आहे आणि ह्या कृतीमधून त्याच्या संगणकास होऊ शकणार्‍या संभाव्य नुकसानीची किंवा माहिती नष्ट होण्याची जबाबदारी संपूर्णपणे त्याची आहे.
 • सदर पोर्टलचा वापर करून खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तू तसेच सेवेबाबत आणि पोर्टलचा वापर करून केलेल्या व्यावसायिक वा अन्य व्यवहारांबाबत C-DAC कोणतीही हमी देत नाही.
 • खालील मुद्दयांमधून उद्भवणार्‍या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, प्रासंगिक, दंडात्मक, विशेष किंवा परिणामस्वरूप नुकसानीस C-DAC कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही:
  1. पोर्टलचा वापर करणे किंवा करता न येणे.
  2. पोर्टलचा वापर करून खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तू तसेच सेवेच्या बदली वस्तू तसेच सेवा मिळवण्यासाठी आणि पोर्टलचा वापर करून केलेल्या व्यावसायिक वा अन्य व्यवहारांसाठी येणारा खर्च
  3. पोर्टलमधील समाविष्ट बाबी.
  4. पोर्टलशी संबंधित इतर बाबी (C-DAC ला असे नुकसान होण्याची शक्यता असल्याची सूचना मिळाली असली तरीदेखील)

परिणामस्वरूपी किंवा प्रासंगिक नुकसानीबाबतच्या जबाबदारी वगळण्यास किंवा मर्यादेत ठेवण्यास काही अधिकारक्षेत्रांद्वारे प्रतिबंध केला जात असल्यामुळे वरील मर्यादा आपणांस कदाचित लागू होणार नाही

C-DAC द्वारे C-DAC च्या आंतरराष्ट्रीय माहितीपर्यंत पोचण्याचा मार्ग कदाचित पुरवला जाऊ शकतो. परिणामी आपल्या देशात उपलब्ध नसलेल्या सेवा, वस्तू अथवा कार्यक्रमांची माहिती अथवा संदर्भ आपणांस कदाचित दिसू शकतो. परंतु C-DAC आपल्या देशात सदर सेवा, वस्तू अथवा कार्यक्रम पुरवीत आहे असा त्याचा अर्थ नव्हे.

आमच्या संपर्क माहितीसाठी,  कृपया संपर्क पृष्ठास भेट द्या.


T5 2020/08/15 09:40:14.533883 GMT+0530

T24 2020/08/15 09:40:14.540389 GMT+0530
Back to top

T12020/08/15 09:40:14.495629 GMT+0530

T612020/08/15 09:40:14.511360 GMT+0530

T622020/08/15 09:40:14.511881 GMT+0530

T632020/08/15 09:40:14.512372 GMT+0530