कृषीमालाची एका देशातून दुसऱ्या देशात निर्यात होत असताना किडी व रोगांचा प्रसार होऊ नये, तसेच त्यावर नियंत्रण रहावे म्हणुन जागतिक अन्न संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सन १९५१ मध्ये अंतरराष्ट्रीय पिकसंरक्षण करार ( (International Plant Protection Convention 1951) करण्यात आलेला आहे. हा करार आंतरराष्ट्रीय पीकसंरक्षण करार म्हणून ओळखला जातो. सदर कराराचा मुख्य उद्देश असा आहे, की कृषिमाल निर्यातीद्वारे कोड व रोगांच्या प्रसारामुळे मानव, प्राणी व पिकांना हानी होऊ नये. तसेच त्यांचा संरक्षणासाठी व ग्राहकाच्या आरोग्याच्या हितासाठी योग्य त्या कार्यप्रणालीचा अवलंब करण्याचा अधिकार प्रत्येक सदस्य देशांना आहे. सध्या या कराराचे १६५ देश सदस्य असुन भारत हा कराराचा सदस्य देश आहे. जागतिक व्यापार संघटनेत सन १९९५ साली 'कृषि' या विषयाचा प्रथमतः समावेश करण्यात आला आहे. जागतिक व्यापार संघटनेमध्ये कृषिविषयक विविध करार करण्यात आलेले आहेत. त्यामधील सॅनिटरी व फायटोसॅनिटरी करार (SPS Agreement) अत्यंत महत्वाचे आहे.
त्यानुसार प्रत्येक देशास ग्राहकाच्या रोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातुन अटी व नियमांचे बंधन घालण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार युरोपियन युनियनने किडनाशक अंश नियंत्रणाच्या हमीबाबत खास नियम तयार केलेले आहेत. भारत हा जगातील प्रमुख डाळिंब उत्पादक देश आहे. तर महाराष्ट्र हे मोठया प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात डाळिंबाची लागवड प्रामुख्याने नाशिक, सोलापूर, अहमदनगर, सांगली, पुणे, सातारा, उस्मानाबाद या औरंगाबाद, जळगाव व धुळे या जिल्ह्यांतही क्षेत्र वाढत आहे. भारतातून डाळिंब निर्यात ही प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती, बहरीन, ओमान, सौदी अरेबिया, श्रीलंका व बांग्लादेश इत्यादी देशांना केली जात होती. परंतु मागील २ वर्षापासून युरोपियन युनियनमधील इंग्लंड, जर्मनी, युनायटेड किंगडम, फ्रान्स, नेदरलँड, बेलाजियम इत्यादी देशांतही डाळिंबाच्या निर्यातीत वाढ होत आहे.
अ.क्र. |
देश |
सन २०१३-२०१४ |
सन २०१४-२०१५ |
सन २०१५-२०१६ |
वजन (मे.टन) |
मूल्य (कोटीत ) |
वजन (मे.टन) |
मूल्य (कोटीत ) |
वजन (मे.टन) |
मूल्य (कोटीत ) |
1 |
नेदरलॅड |
४६३ |
१७ |
८५६ |
१५ |
१०३२ |
२१ |
2 |
युनायटेड किंगडम |
३९१ |
१६ |
३०३ |
१४ |
४४१ |
१५ |
3 |
युनायटेड अरब अमिराती |
१७३२८ |
१५६ |
११२७७ |
१९७ |
१७३२० |
२५४ |
4 |
सौदी अरेबिया |
११४२ |
१२ |
१५६३ |
२१ |
२५५८ |
३२ |
5 |
नेपाळ |
१६६१ |
७ |
२१०७ |
९ |
१४८३ |
५ |
6 |
बांग्लादेश |
५१४८ |
१५ |
५२० |
३ |
२६५० |
६ |
7 |
इतर |
५१९५ |
७५ |
४३७१ |
६५ |
६९०४ |
८३ |
एकूण |
३१३२८ |
२९८ |
२०९९७ |
३२४ |
३२३६१ |
४१६ |
अरेबियन देशापेक्षा युरोपियन देशांचे गुणवत्ता, किडनाशक उर्वरित अंश आणि किडी व रोगांबाबत निकष हे अत्यंत कडक आहेत. निर्यातीकरिता युरोपियन देशांमध्ये जास्त संधी असल्याने त्या देशातील अटी व शर्तीच्या पुर्ततेची हमी देण्याकरीता सन २०१४-१५ पासुन राज्यात युरोपियन देशांना डाळिंब निर्यातीकरीता कोडनाशक उर्वरित अंश नियंत्रण (RMP) करण्यासाठी 'अनारनेट' द्वारे अंमलबजावणी करण्यात येत आहे.
युरोपियन देशांना डाळिंब निर्यातीकरिता आरएमपी (रेसिड्यु मॉनिटरींग प्लॅन - अनारनेट) युरोपियन देशांना निर्यात होणा-या डाळिंबामधील किडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाबाबत अपेडा, कृषि विभाग, डाळिंब संशोधन केंद्र व डाळिंब निर्यातदार
व डाळिंब उत्पादक यांचेशी तसेच युरोपियन युनियनने केलेल्या सुचना व इतर सर्व बाबींचा विचार करुन चालु वर्षापासून युरोपियन देशांना डाळिंब निर्यातीकरीता किडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाबाबत 'अनारनेट'द्वारे ऑनलाईन नियंत्रणाचे काम कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
'आरएमपी' चा मुख्य उद्देश
- निर्यातक्षम डाळिंब बागेतील कोडनाशकाचे उर्वरित अंश नियंत्रण करणे.
- निर्यातक्षम डाळिंब बागेतील किडी व रोगांच्या नियंत्रणाकरीता राष्ट्रीय संशोधन केंद्र यांनी शिफारस केलेल्या औषधांचा वापर करणे.
- कीडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाच्या आराखड्यानुसार विहित करण्यात आलेल्या उर्वरित अंशाच्या प्रमाणापेक्षा उर्वरित अंशाचे प्रमाण जास्त आढळून आले तर त्यासाठी योग्य ती सुधारणा करण्याकरीता पध्दत विहीत करणे व त्यानुसार शेतक-यांना मार्गदर्शन करणे.
- इंटरनेट अलर्ट माहिती संदर्भात योग्य ती उपाययोजना/अंमलबजावणी करण्याची पध्दत विहित करणे.
निर्यातक्षम डाळिंब बागांची नोंदणी करण्याची पध्दत
युरोपियन देशांना डाळिंब निर्यात करु इच्छिणा-या डाळिंब बागायतदारांना त्यांच्या डाळिंब बागेची कृषि विभागाकडे 'अनारनेट'द्वारे नोंदणी करणे सन २०१४-२०१५ पासून बंधनकारक करण्यात आलेले आहे. सन २०१६-१७ या वर्षांमध्ये युरोपियन युनियन व इतर देशांना ताजी फळे व भाजीपाला निर्यात करू इच्छिणा-या उत्पादकांना त्यांच्या बागांची/शेतांची नोंदणी/नुतणीकरण, हॉर्टीनेट ट्रेसेबिलीटी प्रणालीमध्ये नोंदणी करण्याकरीता महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.
- निर्यातक्षम शेतांची नोंदणी/नुतणीकरणास व्यापक प्रसिध्दी देण्यासाठी व नोंदणी/नुतणीकरण वेळेत करण्याकरीता स्थानिक वर्तमानपत्र, आकाशवाणी तसेच दूरदर्शनवरून इ.विविध प्रसिध्दी माध्यामांव्दारे प्रसिध्दी देण्यात येते.
- निर्यातक्षम डाळिंब उत्पादकांच्या तालुकास्तरावर बैठका आयोजित करून युरोपियन देशांना फळे व भाजीपाला निर्यात करू इच्छिणा-या उत्पादकांना त्यांच्या शेताची नवीन नोंदणी/नुतणीकरण करण्याकरीता मार्गदर्शन केले जाते.
- निर्यातक्षम डाळिंब बागांची नोंदणी करण्याकरिता प्रति प्लॉट (१ हेक्टर क्षेत्र ) याकरिता रु. ५0 एवढी फी निश्चित करण्यात आली आहे.
- अर्जासोबत बागेचा स्थळदर्शक नकाशा व गाव नमूना नं. सात बारा या उता-याची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- नोंदणीचा कालावधी माहे १ ऑक्टोबर २०१६ ते ३१ जानेवारी, २0१७ असा राहील.
- खास मोहिम घेऊन सर्व अर्ज तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात स्विकारण्याची व्यवस्था आहे. नवीन नोंदणी नुतणीकरण करण्याकरिता प्राप्त झालेल्या अर्जामधील माहिती अपेडाच्या वेबसाईटवर (http ://apeda .gov.in )
- करण्याची कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरुन निर्यातक्षम शेतांची नोंदणी/नोंदणीचे नुतणीकरण वेळेत करून शेतक-यांना नोंदणी प्रमाणपत्र त्वरीत उपलब्ध करून देणे शक्य होईल.
- सदर कामाकरिता तालुकास्तरावर एका स्वतंत्र कर्मचा-याची नियुक्ती करून सदरचे काम प्राधान्याने केले जाते.
- यासंबंधीचे सर्व प्रपत्रे http ://apeda .gov .in या संकेतस्थळावर हॉर्टीनेट या लिंकवर उपलब्ध आहेत.
नोंदणी अधिका-यांची कर्तव्ये व जबाबदा-या
- निर्यातक्षम शेतांची नोंदणी करण्यासाठी कार्यक्षेत्रातील शेतक-यांमध्ये विविध प्रचार व प्रसार माध्यमांद्वारे जागृती करणे.
- निर्यातक्षम शेतांची नोंदणी करण्याकरिता शेतक-यांनी करावयाचा अर्ज, तपासणी अनेक्झर/प्रपत्र (४अ व ४ ब), पाक्षिक कोड/रोग सर्वेक्षण अहवाल (अपेंडीक्स सी), नोंदणीकृत शेतक-यांनी ठेवावयाचे अभिलेख (अनेक्झर/प्रपत्र २अ) इ. विविध प्रपत्रे तीन प्रतीत छपाई करून घेणे.
- अर्ज प्राप्त झालेल्या शेतांची तपासणी करून घेऊन त्यांची नोंदणी करणे.
- नोंदणी प्रमाणपत्र प्रिंटींगकरिता हिरव्या रंगाचा कागद वापरणे.
- नोंदणी केलेल्या उत्पादकांना पिकावरील किडी व रोगांचे नियंत्रण करण्याकरिता केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समिती यांनी असलेली कीडनाशके वापरण्याबाबत तसेच संबंधित पिकासाठीच्या सुधारित पीक उत्पादन पद्धती, एकात्मिक कोड व्यवस्थापन, कोडनाशक उर्वरित अंश पातळी इ. विषयी शेतक-यांना प्रशिक्षित
- नोंदणी केलेल्या शेतांतील पिकांवरील किडींच्या स्थितीबाबत पाक्षिक अहवाल तयार करून तो शेतकरी, निर्यातदार, पॅकहाऊसधारक यांना उपलब्ध करून देणे.
- कार्यशाळा आयोजित करून शेतकरी, तपासणी अधिकारी व समन्वय अधिकारी यांना प्रशिक्षण देणे.
- तपासणी अधिकारी व समन्वय अधिकारी यांच्या कामाचे पर्यवेक्षण करणे.
नोंदणी करण्याकरीता शेतक-यांनी खालील कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे.
- विहीत प्रपत्रात अर्ज
- ७/१२ उतारा
- बागेचा नकाशा
- तपासणी अहवाल प्रपत्र (४अ)
- फी रु. ५o/- प्रति प्लॉट (१ हेक्टर क्षेत्राकरीता)
वरीलप्रमाणे सर्व माहिती संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर मंडळ कृषि अधिका-यांमार्फत बागेची प्रत्यक्ष तपासणी करुन प्रपत्र (४अ) मध्ये तपासणी अहवाल तयार करुन संबंधित शेतक-यांचा प्रस्ताव नोंदणी अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या
कार्यालयाकडे पाठविल्यानंतर 'अनारनेट'ऑनलाईन नोंदणी करण्यात येते व संबंधित शेतक-यांना एक वर्षाकरीता युरोपियन देशांना डाळिंब कोड, तालुका कोड, गाव कोड, फार्म व प्लॉट कोड नंबर संगणकाद्वारे देण्यात येतो. त्या नंबरनुसार पुढील सर्व कार्यवाही ऑनलाईनद्वारे करण्यात येते.
सन २०१६-१७ करीता युरोपियन देशांना डाळिंब निर्यातीकरीता नोंदणी करण्याचे काम ऑनलाईन पध्दतीने सुरु आहे. त्याची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र. | जिल्हा | नोंदणीकृत बागांची संख्या (सन २०१५-१६) |
१ |
नाशिक |
६८ |
२ |
जळगाव |
३१ |
३ |
धुळे |
२२ |
४ |
अहमदनगर |
३६९ |
५ |
पुणे |
३७६ |
६ |
सोलापूर |
६२६ |
७ |
सातारा |
५७ |
८ |
सांगली |
१७१ |
९ |
कोल्हापूर |
११ |
१० |
औरंगाबाद |
२९ |
११ |
बीड |
१० |
१२ |
जालना |
१० |
१३ |
लातूर |
३ |
१४ |
उस्मानाबाद |
२० |
१५ |
बुलडाणा |
११८ |
|
एकूण |
१९२१ |
नोंदणीकृत बागायतदारांच्या जबाबदा-या व कर्तव्ये
- डाळिंब बागेतील कोड व रोगांच्या नियंत्रणाकरीता आरएमपी व शिफारस केलेल्या औषधांचा वापर करणे व त्यांचा सविस्तर तपशील विहीत केलेल्या प्रपत्रात ठेवणे.
- मुदतबाह्य व बंदी घातलेल्या औषधांचा वापर न करणे.
- एकाच औषधाची सलग फवारणी न करणे.
- उर्वरित अंश तपासणी करण्याकरीता नमुने घेतल्यानंतर औषधाची फवारणी न करणे.
- औषधांच्या पीएचआर अनुसार औषधांची फवारणी करणे.
- खरेदी केलेल्या सर्व औषधे व खतांचे रेकॉर्ड ठेवणे.
- उर्वरित अंश तपासणी करण्याकरीता नमुने घेण्यापुर्वी तपासणी अधिका-यांकडुन निर्यातक्षम डाळिंब बागांची प्रपत्र (४अ) मध्ये तपासणी करुन घेणे.
- युरोपियन देशांना डाळिंब निर्यातकरीता ऑनलाईन (अनारनेट) द्वारे फायटोसॅनेटरी प्रमाणपत्र देण्याकरीता पुणे, नाशिक, सांगली व सोलापूर येथे कृषि विभागामार्फत सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत.
डाळिंब निर्यात करु इच्छिणा-या उत्पादक शेतकरी निर्यातदारांनी त्यांची माहिती कृषि विभागाकडे देणे आवश्यक आहे.
नोंदणीकृत डाळिंब बागायतदारांनी ठेवावयाचे रेकॉर्ड
- डाळिंब बागेवरील कोड व रोगांच्या नियंत्रणाकरीता वापरण्यात आलेल्या किडकनाशकाचा सविस्तर तपशिल विहीत प्रपत्रात ठेवणे.
- औषधे व खते खरेदीचा तपशिल ठेवणे.
- डाळिंब बागेच्या नोंदणीनंतर उर्वरित अंश तपासणी करण्यापूर्वी प्रपत्र ४अ व ४ब मध्ये तपासणी अधिका-यामार्फत बागेची तपासणी करुन घवून त्याचे रेकॉर्ड ठेवणे.
- उर्वरित अंश तपासणीकरीता डाळिंबाचे नमुने घेतल्यानंतर बागेत औषध फवारणी केली नसल्याचे हमीपत्र देणे.
निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन
जागतिक बाजारपेठेतील गुणवत्तेची मागणी लक्षात घेवून डाळिंबाचे निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी शेतक-यांनी खालील बाबीस विशेष महत्व दिले पाहिजे.
- डाळिंब फळाची गुणवत्ता, आकार, रंग इत्यादीकरीता एकात्मिक सुक्ष्मद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करणे.
- डाळिंब फळावरील किडी व रोगांच्या नियंत्रणाकरीता एकात्मिक किड व्यवस्थापनाची अंबमलबलावणी करणे.
- फळामधील कोडनाशक उर्वरित अंशचे प्रमाण शक्य मर्यादेच्या आत राहण्यासाठी एकाच औषधाचा सलग वापर न करणे.
- रासायनिक खते व रासायनिक औषधाचा गरजेनुसार व आवश्यकतेनुसार वापर करणे.
- डाळिंबावरील किडी व रोगांचे विशेषतः तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांनी शिफारस केलेल्या औषधांचाच वापर करणे.
- गुड अॅग्रीकल्चर प्रॅक्टीसेसचा (GAP) वापर करण्यासाठी ग्लोबलगॅप प्रमाणिकरण करुन घेणे. ७) फळांची काढणी, वाहतुक, हातळणी, पॅकिंग व लेबलींग योग्य प्रकारे करणे व त्याकरीता योग्य त्या सुविधा निर्माण करणे.
- फळांची प्रतवारी आकार, रंग व वजनानुसार करणे.
- वर्ग-१ दर्जाच्या मालाचे जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी नियोजन करणे.
युरोपियन देशांना डाळिंब निर्यातीकरीता फायटोसॅनिटरी प्रमाणापत्र घेणे बंधनकारक आहे. कृषि विभागामार्फत कृषि प्रक्रिया व नियोजन विभाग, कृषि आयुक्तालय, साखर संकुल, पुणे-५ व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयातून डाळिंब निर्यातीकरीता फायटोसॅनिटरीचे प्रमाणपत्र देण्यात येते.
निर्यातीसाठी डाळिंबाची गुणवत्ता खालीलप्रमाणे असावी
- बियांचा रंग गडद गुलाबी असावा.
- फळांचे वजन अंदाजे ३५0 ग्रॅम ते ४५0 ग्रॅम दरम्यानच असावे.
- फळांचे कोपरे कमी होऊन गोलाई आलेली असावी.
- सारख्या आकाराच्या फळांची एकत्र रचना करावी.
- सुमारे १७ टक्के ब्रिक्स असावा.
- फळे स्वच्छ, फळांवर ओरखडे, डाग, रोगाची लक्षणे, कीटकांनी पडलेले डाग नसावेत.
- फळांचा रंग तजेलदार, आकर्षक असावा व दाण्यांची चव चांगली असावी.
- फळांमध्ये काळे दाणे नसावेत.
- योग्य पक्वतेला काढणी करावी. (फळधारणेनंतर १३५ दिवसांच्या आत फळांची काढणी करावी.) १o)निर्यातीसाठी डाळिंब पाठविताना आयातदारांच्या मागणीनुसार पॅकिंग करावे. आखाती देशात प्रामुख्याने ५ किलो डाळिंबाचे पॅकिंग करावे लागते. इंग्लंड/युरोपियन देशात ३ ते ४ किलो डाळिंब पॅकिंग करावे लागते.
घ्यावयाची काळजी व उपाय
- डाळिंब पिकावरील किडी व रोगांचे नियंत्रण करण्याकरिता शिफारस केलेल्या औषधांचाच (कीटकनाशके/ बुरशीनाशके) वापर करण्यात यावा. शिफारस न केलेल्या व वापरास बंदी घातलेल्या औषधांचा वापर करु नये.
- औषधांची फवारणी शिफारस केलेल्या मात्रेत आणि योग्यवेळी व योग्य प्रमाणात करणे.
- युरोपियन कमिशन/कोडेक्स अलियेनटॉस कमिशन यांनी निर्धारित केलेल्या मर्यादेच्या आत उर्वरित अंशचे प्रमाण असणे आवश्यक आहे.
- औषधांची फवारणी प्रशिक्षित व्यक्तिद्वारे व योग्य त्या मात्रेत व योग्य पध्दतीने करणे.
- वापर करण्यात आलेल्या औषधांचा तपशील ठेवणे.
- डाळिंबाची काढणी व अंतिम फवारणीमध्ये किती अंतर ठेवले होते, याचा तपशील ठेवणे.
- फवारणी करण्याकरीता वापरण्यात आलेले फवारणी यंत्र व औषधे, कंटेनरची स्वच्छता काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. जेणेकरुन
- कीड व रोगांच्या नियंत्रणाकरीता शिफारस केलेल्या औषधांची खरेदी ही अधिकृत किटकनाशक विक्रेत्याकडून रितसर पावती घेवून करावी.
- निर्यातक्षम डाळिंब बागेतील डाळिंबाचा रॅण्डम पध्दतीने नमुना काढणीच्या एक महिना अगोदर घेवून त्यामधील उर्वरित अंश तपासणीकरिता उर्वरित चाचणी प्रयोगशाळेत पाठविताना नमुन्यासोबत स्पेअर शेडयुलची माहिती देण्यात यावी.
- डाळिंब पिकावरील किडी व रोगांच्या प्रभावीपणे नियंत्रण करण्याकरीता एकात्मिक किड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करावा.
- उर्वरित अंश चाचणी प्रयोगशाळेतील अहवालात उर्वरित अंशाचे प्रमाण शक्य मर्यादेच्या आत असेल तरच निर्यातीकरीता डाळिंबाची काढणी करावी.
डाळिंब निर्यातीकरीता खालील बाबींची पुर्तता करणे आवश्यक आहे.
- विहित प्रपत्र -१ मध्ये अर्ज
- आष्यातदार व निर्यातदार यांच्यात करण्यात आलेल्या कराराची प्रत (पहिल्यांदा)
- प्रोफार्मा इनव्हाईसाची प्रत।
- पॅकिंग लिस्ट
- आयात निर्यात कोड नंबर (पहिल्यांदा)
- कीटकनाशक उर्वरित अंश तपासणी अहवाल (युरोपियन देशांकरिता आवश्यक
- प्रतवारी एगमार्क प्रमाणपत्र (युरोपियन देशांकरिता आवश्यक )
- विहित फी
वरील सर्व कागदपत्राची पुर्तता केल्यानुसार संबंधित मालाची प्रत्यक्ष पहाणी करुन आयातदार देशाच्या निकषानुसार मालाची गुणवत्ता आहे किंवा कसे तसेच कोड व रोगमुक्त असल्याची खात्री करुनच संबंधित आयातदार देशाच्या प्लॅट क्वारनटाईन अॅथॉरिटीचे फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र दिले बाजारपेठ ही स्पर्धेची बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेमध्ये वेळोवेळी होणा-या बदलाची माहिती अद्ययावत करुन घेण्यासाठी वेबसाईटचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण बरीचशी बाजारपेठांची अद्ययावत माहिती व क्वारनटाईन विषयक माहिती ही वेबसाईटवर उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच डाळिंबाच्या गुणवत्ता व इतर हमीकरीता प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. त्याचा फायदा निर्यातीबरोबरच स्थानिक बाजारपेठेतील सुपरमॉलद्वारे विक्रीकरीता निश्चित होणार आहे.
युरोपियन देशांना डाळिंबाची निर्यात करण्याकरीता जास्तीतजास्त तसेच ज्या डाळिंब उत्पादक शेतक-यांनी अनारनेटद्वारे बागेची नोंदणी केलेली आहे. त्यांनी २0१६ या वर्षांकरिता त्यांच्या डाळिंब बागांचे नुतणीकरण करुन घेणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी डाळींब उत्पादक शेतक-यांनी संबधित तालुक्यातील क्षेत्रिय पातळीवर काम करणारे तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. अनारनेटबाबत अधिक माहिती www.apeda.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शिवाजीनगर, पुणे-५ या कार्यालयाशी संपर्क साधावा.
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन