जागतिक बाजारपेठेत कृषि मालावर प्रक्रिया करण्याकरीता चांगल्या उत्पादन पध्दतीचा वापर करुन कृषि प्रक्रिया करीता हॅसेप प्रमाणीकरण करुन घेतलेल्या कृषि व कृषि प्रक्रिया मालाच्या वापरास ग्राहकाची मागणी वाढत आहे.
ग्राहकामध्ये आरोग्याच्या दृष्टिने जागरुकता निर्माण होत आहे. येथून पुढे ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातुन स्वच्छ व सुरक्षित कृषि प्रक्रिया माल उत्पादन व विक्री करीता हॅसेप प्रमाणीकरणाची मागणी वाढत आहे.
HACCP: Hazard Analysis Criticle Control Point.
अन्न प्रक्रिया क्षेत्रात अनेक वेळा निषकाळजीपणा केल्यामुळे दरवर्षी अन्नाव्दारे विषबांधाची प्रकरणे आढळून येत आहेत. तसेच उत्पादनाच्या अनेक पातळीवर सुक्ष्म जंतुचा सर्जन्य झाल्यामुळे खाद्यपदार्थ सुरक्षित राहात नाहीत. त्यामुळे रोगजंतुचा सर्जन्य होतो. रोगजंतुचा प्रादुर्भाव प्रामुख्याने खालील नमुद केलेल्या बॅक्टेरीया,जिवाणू विषाणू, यांच्याव्दारे होतो त्या तपशिल खाली दिलेला आहे. त्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
बॅक्टेरीया :
Clotridium botulinum
Bacillus cereus
E.coli
Salmonella spp.
Shigella spp.
जिवाणू :
Hepatitis A & E
Norwalk virus group
प्रोटोझा आणि पॅरासाईट :
cryptosporidium Parvum
Rntamoeba histolytica
Giardia Lamblia
Toxoplasma gondii
Ascaris Lumbricoides
बुरशी आणि मोल्ड :
As pergillus flavus
As pergillus Parasiticus
As pergillus ochraceus
Pencillum islandicum
Fusarium solani
Fusarium sporotrichoides
वरील सर्व बुरशी, जिवाणू, विषाणू इत्यादी रोगाचा प्रादुर्भाव पाणी, माती, वनस्पती, हाताळणी करणारे कामगार व साठवणुक, वाहतुकी या माध्यमातुन कृषि मालाव्दारे माणसाना व प्राण्याना होता. तो होवू नये म्हणून कृषि मालाचे उत्पादन, काढणी, हाताळणी, प्रक्रिया करण्याकरीता स्वच्छता व सुरक्षितेला अन्यन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. त्याची ग्राहकांना हमी देण्यासाठी हॅसेप प्रमाणीकरणास महत्व प्राप्त झाले आहे.
हॅसेप प्रमाणीकरण करण्याकरीता अपेडा मार्फत खालील एजन्सीना प्राधिकृत केलेले आहे.
युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरीता फायटोसॅनिटरी प्रमाणीकरणाची आवश्यकता
एका देशातुन दुस-या देशास कृषि मालाची निर्यात करण्याकरिता जागतिक पिकसंरक्षण करार १९५१ (Internation Plant Protection Convertion, 1951) नुसार फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जागतिक पिकसंरक्षण कराराचे १६५ देश सदस्य असून भारत एक सदस्य देश आहे. केंद्र शासनाने अधिसुचना क्रमांक पीपीआय/९८/ दिनांक २९/१०/१९९३ अन्वये राज्यातील ११ अधिका-यांना फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देणारे अधिकारी म्हणून अधिसुचित केलेले आहे. त्यामध्ये पुणे,सांगली,नाशिक, सोलापूर, अमरावती, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्हयातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयातील अधिका-यांचा समावेश व सदर अधिका-यामार्फत कृषि मालाच्या निर्यातीकरीता फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाते.
राज्यातून द्राक्ष पिकांचे मोठया प्रमाणात युरोपियन देशांन निर्यात केली जाते य़ुरोपियन देशांने द्राक्षाचे निर्यातीकरीता किडनाशकांचा उर्वरीत अंश तपासणीचे कडक निकष तयार केलेले आहेत. त्यामध्ये ९० किटकनाशक औषधाची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या सर्व बाबीचा विचार करुन युरोपियान देशांना जास्तीतजास्त द्राक्ष निर्यात होण्याकरीता सन २००६-०७ या वर्षात अपेडा यांच्या मार्गदर्शनाखाली युरोपियन देशांना द्राक्षाची निर्यात करण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत ट्रेड नोटीस क्रमांक क्युएमसी/०४९/२००५ दिनांक २६ ऑक्टोबर २००६ अन्वये सविस्तर मार्गदर्शन सुचना तयार करण्यात आलेले आहेत. त्याची अंमलबजावणी संचालक,कृषि प्रक्रिया व व्यापारक्षम शेती, साखर संकुल, पुणे-५ यांच्या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
अ. क़्र. |
युरोपियन युनियनमधील प्रमुख आयातदार देशांची नांवे |
१ |
युनायटेड किंगडम (युके) |
२ |
नैदरलँड |
३ |
बेल्जियम |
४ |
जर्मनी |
५ |
फ्रान्स |
६ |
इटली |
७ |
पोलंड |
८ |
स्पेन |
९ |
स्विडन |
१० |
ग्रीस |
सन २००६-०७ या वर्षामध्ये युरोपियन देशांना निर्यात होणा-या द्राक्षामधील उर्वरित अंश नियंत्रणाबाबत अपेडामार्फत तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये मागील वर्षी आढळून आलेल्या अडचणी व त्रुटींचा विचार करुन तसेच युरोपियन युनियनने केलेल्या सुचना व इतर सर्व बाबींचा विचार करुन चालू वर्षाकरिता युरोपियन देशांना निर्यात होणा-या द्राक्षामधील किडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत खालीलप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येत आहेत.
युरोपियन देशांना निर्यात करु इच्छिणा-या द्राक्ष बागायतदारांनी त्यांच्या द्राक्ष बागेची नोंदणी संबंधित जिल्हयाचे नोंदणी अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे दि. २५ डिसेंबर २००६ पुर्वी करणे आवश्यक आहे. तसेच निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर, बीड, बुलढाणा, जळगांव व नांदेड यांना निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे.
निर्यातक्षम द्राक्ष बागाची नोंदणी करण्याकरीता प्रती प्लॉट (१ हैक्टर क्षेत्र) करिता रु. ५०/- फी विहित करण्यात आलेली आहे. निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी व नुतणीकरण चालू वर्षी अपेडाच्या वेबसाईटवर ऑन लाईनव्दारे करण्यात आलेली आहे (www.apeda.com)
निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांना युरोपियन देशांना निर्यात करु इच्छिणा-या द्राक्ष बागायतदारांना त्यांचे बागेची नोंदणी / नुतनीकरण संबधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत अपेडाच्या ऑन लाईन साईटवरुन प्रपत्र २-अ मध्ये संबधित द्राक्ष बागायतदारांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
युरोपियन देशांना निर्यात करण्याकरिता नोंदणी केलेल्या द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष बागेवरील किडी व रोगांचे नियंत्रण करण्याकरिता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी यांनी प्रपत्र ७ मध्ये शिफारस केल्यानुसार वापरण्याबाबत व त्याचा रकॉर्ड प्रपत्र-४ मध्ये ठेवण्याबाबत बंधनकारक करण्यात आलेले आहे.
युरोपियन देशांना निर्यात करण्याकरिता नोंदणी करण्यात आलेल्या द्राक्ष बागांची तपासणी करण्याकरिता संबंधित मंडल कृषि अधिकारी / कृषि पर्यवेक्षक यांना तपासणी अधिकारी म्हणून ३०० अधिका-यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
निर्यातक्षम द्राक्ष बागांमधील उर्वरित अंश नियंत्रणाकरिता शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन तपासण्या विहित करण्यात आलेल्या आहेत. पहिली तपासणी द्राक्ष बागेचे नुतनीकरण / नवीन नोंदणी प्रमाणपत्र देण्यापुर्वी करावयाची आहे. दुसरी तपासणी अनुक्रमे ४० ते ६० दिवसांच्या फरकाने करावयाची आहे.
निर्यातक्षम द्राक्ष बागांची तपासणी करण्याकरिता प्रपत्र ६-अ व ब विहित करण्यात आलेले आहे. त्या विहित केलेल्या प्रपत्रामध्ये संबंधित नोंदणीकृत द्राक्ष बागांची तपासणी अधिका-याने तपासणी करुन तपासणीचा अहवाल संबंधित नोंदणीकृत द्राक्ष बागायतदार व नोंदणी अधिकारी यांना द्यावयाचा आहे.
तपासणी अधिका-याने त्याच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत सर्व द्राक्ष बागायतदारांना वेळोवेळी निर्यातक्षम द्राक्ष बागेमधील उर्वरित किडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाकरिता अपेडा यांनी तयार केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार संबंधित शेतक-यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. तपासणी अधिका-याने तपासणी अहवालामध्ये त्याचे पुर्ण नाव, हुद्दा, कार्यालयाचा पत्ता व दुरध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे तसेच जेवढया क्षेत्राची नोंदणी करण्यात आलेली आहे तेवढया क्षेत्राकरिता तपासणी अहवाल देणे आवश्यक आहे.
तपासणीचे वेळी नोंदणी करण्यात आलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र आढळून आले तर वाढीव क्षेत्राची नोंद नोंदणी प्रमाणपत्रात करुन घेण्याकरिता संबंधित शेतक-यांनी संबधित शेतक-यांकडे नोंदणी करणेकरीता कळविणे आवश्यक आहे. नोदणींकृत द्राक्ष बागायतदारंने तपासणी अधिका-यांच्या मार्गदर्शना नुसार तपासणी ठेवणे आवश्यक आहे.
तपासणी अहवालाच्या प्रती संबंधित शेतक-यांनी तपासणी अधिका-याकडून वेळोवेळी उपलब्ध करुन घेणे आवश्यक आहे.
निर्यातक्षम नोंदणीकृत द्राक्ष बागेमधील उर्वरित अंश नियंत्रणाकरिता नमुने घेण्याची विहित पध्दत
निर्यातक्षम नोंदणीकृत द्राक्ष बागेमधील उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता चालू वर्षी एकूण ७ प्रयोगशाळांना अपेडा यांनी अधिसुचित केलेले आहेत त्याची नांवे खालीलप्रमाणे आहेत.
अ. क़्र. |
प्रयोग शाळेचे नांव |
१ |
किडनाशक उर्वरीत अंश प्रयोगशाळा ,पुणे-५ |
२ |
विमटा लॅबस लि.हैद्राबाद |
३ |
रिलायबल ऍनालिटीकल लॅबोरेटरी, ठाणे |
४ |
जिओक लॅब लिमिटेड,मुंबई |
५ |
श्रीराम इन्स्टीटयुट लॅब बगलोर |
६ |
एसजीएस इंडीया लि.चैन्नई |
७ |
एनएचआरडीएफ नाशिक |
निर्यातक्षम द्राक्ष बागेमधील उर्वरित अंश तपासणीकरिता द्राक्षाचे नमुने घेण्यासाठी अपेडा यानी प्रपत्र-८ मध्ये अधिसुचित केलेल्या उर्वरित अंश प्रयोगशाळेच्या प्रतिनिधीव्दारेच द्राक्षाचे नमुने घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता द्राक्षाचे नमुने घेण्यासाठी लागणारे पॅकिंग मटेरियल व इतर साहित्त्य व नमुना स्लीप विहित करण्यात आली आहे त्यानुसार व प्रपत्र ९ मध्ये विहित केलेल्या पध्दतीचा वापर करुन नमुने घेणे बंधनकारक आहे.
उर्वरित अंश तपासणीकरिता घेण्यात आलेल्या द्राक्षांचे नमुने दोन पॅकिंगमध्ये २ किलो व ३ किलोमध्ये दोन नमुने घेवुन २४ तासांचे आत संबंधित किडनाशक उर्वरित अंश प्रयोगशाळेस पाठविणे आवश्यक आहे. नमुन्यासोबत प्रपत्र ४, प्रपत्र ५ व प्रपत्र ६-ब जोडणे आवश्यक आहे.
उर्वरीत अंश तपासणी करण्याकरीता प्राधिकृत केलेल्या प्रयोगशाळांची जबाबदारी :-
द्राक्ष निर्यातदारांनी युरोपियन देशांना द्राक्षाची निर्यात सुरु करण्यापूर्वी खालील बाबीबाबत माहिती करुन घेणे आवश्यक आहे.
वरील सर्व मुद्याबाबतची माहिती सादर केल्यानंतर फायटोसॅनिटरी सर्टीफिकेट ऍथोरिटीव्दारे निर्यातीकरिता तयार करण्यात आलेल्या द्राक्षाची तपासणी करुन त्यातून नमुना घेवून सदरची द्राक्षे किड व रोगमुक्त तसेच उर्वरीत अंश मध्ये प्रमाणीत असल्याचे तसेच आयातदार देशाच्या मागणीप्रमाणे असल्याची खात्री करुन सदर द्राक्षाच्या निर्यातीकरिता संबधीत देशाच्या प्लॅन्ट प्रोटेक्शन ऍथोरिटीच्या नावाने फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र अपेडाच्या साईटवर आउन लाईनव्दारे तयार करुन दिले जाणार आहे.चालू वर्षी युरेपियान देशांना द्राक्ष निर्यातीकरीता द्राक्ष बागाची नोंदणी,नोदणी केलेल्या द्राक्ष बागायाची तपासणी, उर्वरीत अंश तपासणी अहवाल, ऍगमार्क प्रमाणीकरण तसेच फाटोसॅनिटरी प्रमाणीकरणाचे काम अपेडाच्या वेबसाईटवरुन ऑनलाईनव्दारे करण्यात येणार आहे. द्राक्ष बागायतदार/निर्यातदारांनी वरील बाबीची पुर्तता करण्याकरिता योग्य ते नियोजन करण्याची आवश्यकता आहे .
अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी कृषि प्रक्रिया व व्यापारक्षम शेती, साखर संकुल, पुणे४११००५ कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घ्यावी. (फोन नं.२०-२५५३४३४९, ९४२३५७५९५६)
लेखक : गोविंद ग. हांडे (एमएससी, कृषि किटक शास्त्र), कृषि अधिकारी
स्त्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन -
अंतिम सुधारित : 6/6/2020
सातारा जिल्ह्यात गटशेतीची पाळेमुळे चांगलीच रुजली आ...
उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत हिंगोली शहरात जिल्ह...
येत्या काळातील कडधान्यांची वाढती मागणी लक्षात घेता...
कडधान्य पिकांचे मानवी आह्यरात महत्वाचे स्थान आहे. ...