অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

'टर्मिनल मार्केट' संकल्पना

फळे भाजापीला यासारख्या नाशवंत फलोत्पादनाचे काढणीपश्चात 30-40 टक्के  नुकसान होत आहे.
  1. केद्र शासनाने सन 2005-06 साली राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (NHM) सुरु केलेले आहे.
  2. या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतक-याने उत्पादीत केलेल्या नाशवंत फलोत्पादनाचे नुकसन कमी करुन त्यांना जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी व मध्यस्थांची साखळी कमी करण्यासाठी टर्मिनल मार्केटची संकल्पना पुढे आलेली आहे.
  3. टर्मिनल मार्केट हे देशातील मोठा शहरांजवळ निर्माण करुन असे मार्केटस फलोत्पादन होणा-या भागामधील संकलन केंद्राशी जोडण्याचे नियोजित केलेले आहे.
  4. अशा संकलन केंद्रांमध्ये  नाशवंत फलोत्पादन संकलीत करुन त्याठिकाणी क्लिनिंग (स्वच्छ) करुन जास्तीत जास्त गार्बेज  त्याच ठिकाणी काढून स्वच्छ केलेला माल टर्मिनल मार्केटमध्ये पाठविण्यात येणार आहे.
  5. उत्पादित क्षेत्रातील संकलन केंद्र व टर्मिनल मार्केटस् ही रिफर व्हॅन्सने जोडली जाणार असल्यामुळे काढणीपश्चात नुकसान टाळणे शक्य होणार आहे.
  6. टर्मिनल मार्केटमध्ये आलेले फलोत्पादन प्रिकुलिंग व ग्रेडींग (छाटणी) करुन कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणूक करण्याचे नियोजित आहे.
  7. टर्मिनल मार्केट मध्ये इलेक्ट्रॉनिक लिलावगृहाद्वारे मालाची विक्री होणार आहे. तसेच सदर मार्केटमधून देशांतर्गत विक्री व्यवस्था, फलोत्पादनाच्या प्रक्रियेची व्यवस्था अपेक्षित आहे.
  8. टर्मिनल मार्केटमधून फलोत्पादन निर्यातीस पाठविणेही अपेक्षित आहे.
  9. यासाठी टर्मिनल मार्केटमध्ये प्रशितकरण, शितगॉह, रायपनिंग चेंबर, ग्रेडींग पॅकींग, गोडावून, प्रक्रिया केंद्र , बँक, पोस्ट ऑफिस, इलेक्ट्रॉनिक लिलावगृह इ. मूलभूत सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे.
  10. टर्मिनल मार्केटची उभारणी सार्वजनिक व खाजगी क्षेत्राच्या सहभागातून (Public-Private-Partnership) अपेक्षित आहे.
  11. टर्मिनल मार्केट हे हब (Hub) व स्पिक (Speak) संकल्पनेवर आधारित चालविण्यात येणार आहे.
  12. टर्मिनल मार्केटमध्ये 70 टक्के फळे व भाजीपाला, 15 टक्के अन्नधान्य व 15 टक्के पोल्ट्री, मौंस, दुग्धजन्य पदार्थांची हाताळणी अपेक्षित आहे

टर्मिनल मार्केट संकल्पनेचा उद्देश

  1. फलोत्पादनाच्या विक्रीचे प्रचलित पध्दतीमुळे होणारे नुकसान कमी करणे.
  2. शेतक-यांना थेट बाजारांशी संपर्क प्रस्थापित करुन उत्पादनाच्या विक्रीस पर्याय उपलब्ध करुन देणे व मध्यस्थांची साखळी कमी करणे.
  3. फलोत्पादन पणन व्यवस्थेत आधुनिक साधनांचा उपयोग करणे व खाजगी गुंतवणूकदारांच्या सहाय्याने शीतसाखळी निर्माण करणे.
  4. फलोत्पादन खरेदी- विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता आणणे.
  5. फलोत्पादन निर्यातीस प्रोत्साहन
  6. फलोत्पादन प्रक्रियेचे प्रमाण वाढविणे.
  7. टर्मिनल मार्केटची उभारणी
  8. स्पर्धात्मक निविदांद्वारे निवड केलेल्या खाजगी उद्योजकांकडून टर्मिनल मार्केटची उभारणी BOO (Build Own Operate) पध्दतीने अपेक्षित आहे.
  9. खाजगी उद्योजकांमध्ये व्यक्तिगत उद्योग, शेतकरी उत्पादक, ग्राहकांचा समूह, पार्टनरशीप, प्रोपरायर फर्म, कंपनी, कृषि पणन मंडळ, कॉर्पोरेशन, सहकारी संस्था इ. चा समावेश आहे.

केंद्र शासनाचा सहभाग

  • केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खाजगी भागीदारास 25 ते 40 टक्के (जास्तित जास्त रु. 50 कोटी)  अनुदान मागणी करता येते अशी तरतुद आहे.

राज्य शासनाची भुमिका

  1. टर्मिनल मार्केटसाठी जागा निश्चित करणे, शासकीय जागा उपलब्ध करुन देणे.
  2. खाजगी गुंतवणुकदारास आकर्षित करण्यासाठी वित्तीय संस्थांची निवड करणे, शक्य असलेल्या सर्व प्रकारच्या परवानग्या देणे.
  3. आवश्यकतेप्रमाणे प्रकल्पात आर्थिक सहभाग घेणे.
  4. टर्मिनल मार्केट संदर्भातनिविदा प्रक्रिया व खाजगी उद्योगांची निवड करण्यासाठी मा. पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची स्थापना झालेली आहे. मा.प्रधान सचिव, सहकार व पणन यांची नोडल ऑफिसर व मा.पणन संचालक यांची अतिरिक्त नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केलेली आहे.
  5. राज्यात उभारण्यात येणा-या टर्मिनल मार्केटकरिता राज्य स्तरीय समितीने खालीलप्रमाणे संस्थांची वित्तीय संस्था म्हणून नियुक्ती केली आहे.
अ.क्र. टर्मिनल मार्केट संस्थेचे नाव
1. मुंबई (ठाणे) येस बँक लि.
2. नाशिक नाबार्ड कन्सलटन्सी सर्व्हिसेस प्रा. लि.
3. नागपूर अॅपिटको लि., हैद्राबाद

टर्मिनल मार्केट सद्यस्थिती

  • केंद्र शासनाने विविध राज्यात प्रथम 8 व नंतर 21 टर्मिनल मार्केटस उभारण्याचा निर्णय घेतला.
  • राज्यामध्ये मुंबई, नाशिक व नागपूर येथे टर्मिनल मार्केट उभारण्यात येणार आहेत.

मुंबई टर्मिनल मार्केट

  1. प्रकल्पाची अंदाजित किंमत रु.200-250 कोटी
  2. प्रकल्पाची प्रति दिन हाताळणी क्षमता 3000 मे.टन इतकी अपेक्षित.
  3. प्रकल्पास आवश्यक जागा 125 एकर आहे. मौजे बाबगाव, जि.ठाणे येथील 92 एकर जागा पणन मंडळास हस्तांतर करणेचा शासन निर्णय झालेला आहे. सदरची जागा पणन मंडळाने ताब्यात घेतली आहे.
  4. एकूण मागणी 125 एकर पैकी उर्वरीत जागा विनामूल्य पणन मंडळास हस्तांतर करणेकरिताचा तसेच खाजगी जागा संपादीत करुन मिळणेबाबत जिल्हा अधिकारी, ठाणे यांचे दि.15/11/2007 च्या पत्रान्वये विनंती केली आहे.
  5. खाजगी भागीदार निवड प्रक्रियाचा पहिला टप्पा (Request For Qualification- RFQ) पुर्ण. दुसरा टप्पा (Request For Proposal- RFP) अंतिम टप्यात.

नाशिक टर्मिनल मार्केट

  • प्रकल्पाची अंदाजित किंमत रु.60 कोटी.
  • प्रकल्पास आवश्यक जागा 100 एकर
  • प्रकल्पाची प्रति दिन हाताळणी क्षमता 1000 मे.टन इतकी अपेक्षीत.
  • प्रकल्पाकरीता पिंप्री सय्यद येथील शासकीय जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु आहे

नागपूर टर्मिनल मार्केट

  • प्रकल्पाची अंदाजित किंमत रु.70 कोटी.
  • प्रकल्पास मौजे वारंगा, ता व जि. नागपुर येथील आवश्यक  100 एकर शासकीय जागा पणन मंडळास हस्तांतर करणेचा निर्णय झाला. जागा हस्तांतर करणेची प्रक्रिया सुरु.
  • प्रकल्पाची प्रति दिन हाताळणी क्षमता 750 मे.टन इतकी अपेक्षित.
  • खाजगी भागीदार निवड प्रक्रियाचा पहिला टप्पा (Request For Qualification- RFQ) पुर्ण. दुसरा टप्पा (Request For Proposal- RFP) दि. 12.7.2013 रोजी सुरु करणेत आला आहे.
  •  

    माहिती संकलक : अतुल पगार

    स्त्रोत : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ

अंतिम सुधारित : 6/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate