जपान येथील खासगी कंपनीने रोपांच्या लागवडीसाठी सोपे आणि अत्यंत कार्यक्षम असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याला ‘चेन पॉट’ किंवा ‘पेपर पॉट’ असे म्हणतात.
जाड कागदाच्या साह्याने मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे षटकोनी आकार तयार केले जातात. या कागदी पट्ट्या तीन ते चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.
त्यात कोकोपीट भरून बिया लावल्या जातात. एकाच वेळी संपूर्ण ट्रेमध्ये बिया लावण्यासाठीही खास प्लेट तयार केली आहे.
लागवडयोग्य रोपे तयार झाली की त्यांची लागवड करण्यासाठी ‘पेपर पॉट ट्रान्स्प्लॅंटर’ या यंत्राचा वापर करावा. हे यंत्रही एका माणसांच्या साह्याने खेचून चालवता येते.
ग्रीन सिटी एकर फार्मचे मालक कुर्टीस स्टोन यांनी सांगितले, की पालक लागवडीसाठी पेपरपॉट रोपवाटिका आणि लागवड यंत्राचा वापर करत असून, वेळेमध्ये ८८ टक्के बचत झाली आहे. पूर्वी जो बेड लावण्यासाठी माणसांना एक तास लागत असे, तो आता केवळ सात मिनिटांमध्ये लावून पूर्ण होतो.
जपान येथील खासगी कंपनीने रोपांच्या लागवडीसाठी सोपे आणि अत्यंत कार्यक्षम असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याला ‘चेन पॉट’ किंवा ‘पेपर पॉट’ असे म्हणतात.
जाड कागदाच्या साह्याने मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे षटकोनी आकार तयार केले जातात. या कागदी पट्ट्या तीन ते चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. त्यात कोकोपीट भरून बिया लावल्या जातात. एकाच वेळी संपूर्ण ट्रेमध्ये बिया लावण्यासाठीही खास प्लेट तयार केली आहे. लागवडयोग्य रोपे तयार झाली की त्यांची लागवड करण्यासाठी ‘पेपर पॉट ट्रान्स्प्लॅंटर’ या यंत्राचा वापर करावा. हे यंत्रही एका माणसांच्या साह्याने खेचून चालवता येते.वेगवान आणि कार्यक्षमग्रीन सिटी एकर फार्मचे मालक कुर्टीस स्टोन यांनी सांगितले, की पालक लागवडीसाठी पेपरपॉट रोपवाटिका आणि लागवड यंत्राचा वापर करत असून, वेळेमध्ये ८८ टक्के बचत झाली आहे. पूर्वी जो बेड लावण्यासाठी माणसांना एक तास लागत असे, तो आता केवळ सात मिनिटांमध्ये लावून पूर्ण होतो.
स्त्रोत : अग्रोवोन
अंतिम सुधारित : 6/5/2020