भारत आंबा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे . जगाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंबा उत्पादन भारतात होते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत हापूस, केशर, या वाणांची लागवड करण्यात मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. राज्यातून निर्यात होणा-या फळांमध्ये द्राक्ष, आंबा, डाळींब, लिंबूवर्गीय फळे आणि काजू यांचा मोठा वाटा आहे. सध्याच्या काळात निर्यातक्षम हापूस आणि केशर आंब्याला परदेशात मागणी वाढत आहे.
अांब्याचा पल्प हा मोठया प्रमाणात निर्यात होत आहे. ही निर्यात वाढविण्यासाठी दर्जेदार उत्पादनाबरोबरच त्यासाठी लागणा-या गुणवत्ता प्रमाणकाकडेही तेवढेच लक्ष शेतक-यांना द्यावे लागणार आहे. भारताच्या जागतीक व्यापार संघटनेच्या सदस्यत्वामुळे आणि कृषि क्षेत्राच्या जागतीक व्यापारामधील समावेशामुळे फळांच्या निर्यातीसाठी चांगल्या संधी निर्माण झालेल्या आहेत. विशेषत: आंब्याची मोठयाप्रमाणात झालेली लागवड आणि उत्पादन पाहता या फळांच्या निर्यातीस चांगला वाव राहणार आहे.
जागतीक बाजारपेठांमध्ये आंब्याचा व्यापार
जाती : टामी अटकिन, डेडन, केंट, इरविन, हापूस तोतापूरी, बेगमपल्ली, चौसा, सुवर्णरेखा, केशर इत्यादी जातींपैकी महाराष्ट्रात हापूस व केशर या जातीच्या अांब्याची मोठया प्रमाणात लागवड केली जाते.
गुणवत्ता
- आकार: २०० ते ८०० ग्रॅम (आकारमानानुसार प्रतवारी आवश्यक ) व अंडाकृती
- रंग - पिवळा किंवा तांबूस लालसर
- वाढ : फळाची पूर्ण वाढ झालेली असावी.
- चव : टरपेन्टाइन चव चालत नाही. आंब्यातील कोय काढण्यास सोपी तसेच तंतूमय धागा नसावा.
प्रमुख आंबा निर्यातदार देशांचा हंगाम
- मेक्सीको ; मे ते आॉगस्ट
- ब्राझील : ऑक्टोंबर ते डिसेंबर (वर्षभर उपलब्ध)
- व्हेनेझुएला : एप्रिल ते जून
- भारत : एप्रिल ते जून
- पाकिस्तान : जून ते जूले
- अमेरिका : सप्टेबर
- कोस्टारीका : एप्रिल ते जूलै
- पेरू : डिसेंबर ते फेबूवारी
- आयव्हरीकोस्ट : जून ते जुलै
भारतामधून आंबा व आंब्याचा पल्प मोठ्या प्रमाणात विविध देशांना निर्यात केला जातो. सन २o१२-१३, २o१३-१४ व २o१४-१५ या वर्षात निर्यात झालेल्या आंबा व आंबापल्पची माहिती पुढीलप्रमाणे.
अ.क्र. |
बाब |
सन २०१२-१३ |
सन २०१३-१४ |
सन २०१४-१५ |
साठा (मे.टन) |
मूल्य (कोटी रु.) |
साठा (मे.टन) |
मूल्य (कोटी रु.) |
साठा (मे.टन) |
मूल्य (कोटी रु.) |
१ |
आंबा |
५५५४ |
२६४ |
४१२८० |
२८५ |
४२९९८ |
३०३ |
२ |
अंबापल्प |
१४७८१५ |
६०८ |
१७४८६० |
७७२ |
१५४८२१ |
८४१ |
एकूण |
२०३३९९ |
८७२ |
२१६१४० |
१०५७ |
१९७८१९ |
११४४ |
ताज्या आंब्याची निर्यात प्रामुख्याने ७२ देशांना केली जाते . मागील तीन वर्षात भारतातून निर्यात झालेल्या आंब्याची प्रमुख पाच देशांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र. |
देश |
सन २०१२-१३ |
सन २०१३-१४ |
सन २०१४-१५ |
साठा (मे.टन) |
मूल्य (कोटी रु.) |
साठा (मे.टन) |
मूल्य (कोटी रु.) |
साठा (मे.टन) |
मूल्य (कोटी रु.) |
१ |
यु.ए.ई. |
३५५९८ |
१६२ |
२३०४६ |
१७३ |
२५५३७ |
१८१ |
२ |
बंग्कला देश |
४६५० |
८ |
२८०० |
५ |
२५०० |
६ |
३ |
यु.के. |
३३०४ |
३३ |
३३८१ |
४५ |
६४४ |
१२ |
४ |
सौदी अरेबिया |
१६६५ |
१२ |
१७२१ |
१२ |
३८७९ |
२६ |
५ |
नेपाळ |
२२३७ |
६ |
११०६ |
४ |
५३७४ |
१० |
६ |
इतरदेश |
८१३० |
३३ |
९२२६ |
४६ |
५०६४ |
६८
|
आंब्या प्रमाणेच देशातून आंब्याचा पल्पहि मोठ्या प्रमाणात विविध १४१ देशांना निर्यात केला जातो. मागील तीन वर्षात भारतातून निर्यात झालेल्या आंबा पल्पची प्रमुख देशनिहाय माहिती खालीलप्रमाणे :
अ.क्र. |
देश |
सन २०१२-१३ |
सन २०१३-१४ |
सन २०१४-१५ |
साठा (मे.टन) |
मूल्य (कोटी रु.) |
साठा (मे.टन) |
मूल्य (कोटी रु.) |
साठा (मे.टन) |
मूल्य (कोटी रु.) |
१ |
सौदी अमेबिया |
४३४४८ |
१३२ |
४४३९० |
२१६ |
५२४५६ |
२५० |
२ |
नेदरलँड्स |
११२३६ |
६४ |
१४२२८ |
९९ |
१३६५८ |
१०१ |
३ |
येमेन |
२५२०२ |
८२ |
३७१७८ |
११३ |
२८७१९ |
१२० |
४ |
यु.ए.ई |
११७३७ |
४४ |
९०९६ |
४६ |
१०२०३ |
५३ |
५ |
कुवेत |
४७६० |
२१ |
२९२१ |
१७ |
१०१७८ |
५२ |
६ |
यु.के. |
३१९८ |
२१ |
३२२३ |
२४ |
५७३२ |
४१ |
७ |
इतर देश |
४९८१६ |
२४४ |
६७००० |
२५७ |
३३८७५ |
२२४ |
एकूण |
१४९३९७ |
६०८ |
१८८०३६ |
७७२ |
१५४८२१ |
८४१ |
जागतिक व्यापार करारामध्ये सन १९९३ मध्ये कृषीमालाचा समावेश करण्यात आला असून त्याची अमलबजावणी सन २००५ पासून करण्यात आल्यामुळे कृषिमालाकारीता बाजारपेठ खुली झालेली आहे. त्यामुळे कृषिमाल विविध देशांना निर्यात करण्याकरिता संधी निर्माण झालेल्या आहेत. त्याचबरोबर कृषिमालाची गुणवत्ता, कीड व रोगमुक्तता, उर्वरित अंश, वेष्टण इ. बाबींना जागतीक बाजारपेठेत विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. कृषिमालाच्या निर्यातीकरिता फायटोसॅनिटरी प्रमाणिकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचा मुख्य उद्येश असा आहे की, एका देशातून दुस-या देशात कृषिमालाच्या निर्यातीव्दारे किडी व रोगांचा तसेच तणांचा प्रसार होऊ नये. याकरिता नियमावली करण्यात येत आहे.
राज्यातून मोठयाप्रमाणात ताजी फळे, भाजीपाला, फुले, रोपे व कलमे इत्यादीची निर्यात विविध देशांना केली जाते. त्यामध्ये आंब्याची निर्यात ७२ देशांना व आंबापल्पची निर्यात १४१ देशांना केली जाते. आंबा निर्यातीतील संधी लक्षात घेता शेतक-यांचा कल निर्यातक्षम अांबा उत्पादन व त्याची निर्यात करण्याकडे वाढत आहे. परंतु सध्या जागतीक बाजारपेठेत नियम, अटी, शर्ती, इत्यादी बाबतची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याबाबत शेतक-यांची मागणी आहे.
वरील सर्व बाबीं विचारात घेऊन निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यातील कृषिमालाची निर्यात लक्षात घेऊन व राज्यातून जास्तीतजास्त कृषिमाल सुलभरित्या निर्यात होण्याकरिता राज्यातील पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर, अमरावती, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील अधिका-यांना फायटोसॅनिटरी ऑथॉरीटी म्हणून केंद्र शासनाने अधिसुचित केलेले आहे. केंद्र शासनाने १ जानेवारी २०११ पासून कृषिमाल निर्यातीकरीता फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्याकरीता प्लॅट क्रारंटाइन इन्फारमेशन सिस्टम (पीक्यूआयएस) व्दारे ऑनलाइन सुविधा निर्माण करून देण्यात आल्या आहेत.
निर्यातीसाठी गुणवत्ता मागणी
शेतक-यांनी आगामी काळात मोठयाप्रमाणात आांब्याची निर्यात करण्यासाठी काढणी पश्चात तंत्रज्ञान अवगत करुन आबा निर्यातीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याची गरज आहे. हापूस आंबा कृषि निर्यात क्षेत्रांतर्गत कृषि पणन मंडाळाने रत्नागिरी, जामसंडे तसेच जालना येथे हापूस व केशर आंबा निर्यात सुविधा केंद्राची उभारणी केली आहे. या ठिकाणी पूर्वशितकरणगृह, शितगृह, आणि आंब्यासाठी अत्याधुनिक हाताळणी यंत्र व रायपनिंग चेंबर या सुविधांची उभारणी केलेली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया, जपान या देशात आंबा निर्यातीसाठी वाशी येथे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्हेपर
हीट ट्रीटमेंट सुविधांची उभारणी केली आहे. सदरच्या सुविधा नाममात्र शुल्क आकारून शेतकरी, सहकारी संस्था व निर्यातदार यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कृषि पणन मंडळाने उभारलेल्या पायाभूत सुविधांचा वापर करून आपल्या देशाला निर्यातीच्या क्षेत्रात एक नविन दिशा निश्चितच मिळेल, अशी खात्री आहे.
राज्यातून हापूस आंबा व केशर आंबा उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये आणि निर्यातीमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने केंद्र आणि राज्य शासनामार्फत महाराष्ट्रामध्ये संबंधीत उत्पादनासाठी कृषि निर्यात क्षेत्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. या कृषि निर्यात क्षेत्रांतर्गत कृषिमालाची करावयाची निर्यात आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
अ.क्र. | तपशील | हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्र , नाचणे (क्षमता) | हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्र , जामसंडे (क्षमता) | हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्र,जालना (क्षमता)
|
१ |
प्रीकुलिंग |
५ मे.टन |
५ मे.टन |
५ मे.टन |
२ |
कोल्ड स्टोरेज |
२५ मे.टन |
२५ मे.टन |
२५ मे.टन |
३ |
रायपनिंग चेंबर |
५ मे.टन |
५ मे. टन |
५ मे. टन |
४ |
ग्रेडिंग , पॅकिंग |
१.५ मी.टन/तास |
१.५ मे. टन/तास |
१.५ मे. टन/तास |
५ |
साठवणूक |
- |
- |
- |
आंब्याचा दर्जा व प्रमाणके
युरोपियन देशांना आंबा निर्यातीकरिता उर्वरित अंश तपासणीबरोबरच अंगमार्क प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. आवेष्टन व प्रतवारी अधिनियम १९३७ नुसार आंब्याची प्रतवारी करीता प्रमाणके निर्धारीत केलेली आहेत. सर्वसाधारण आवश्यकता : आंबा पुर्णपणे वाढ झालेला, दिसण्यास ताजा, स्वच्छ, कीड व रोगमुक्त असावा.
अ.क्र. | दर्जा | प्रमाणके |
१ |
विशेष दर्जा |
या वर्गातील आंबा हा अप्रतिम दर्जाचे असावा. जातीच्या गुणधर्मानुसार आकार व रंग असावा . गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नसावी. |
२ |
वर्ग -१ |
चांगल्या दर्जाचा आंबा असावा , जातीच्या गुणधर्मनुसार आकार व रंग असावा . आकारामध्ये काही प्रमाणात सवलत . |
३ |
वर्ग -२ |
या वर्गातील आंबा हा वरील विशेष वर्ग वर्ग - १ चा नसला तरी कमीतकमी सर्वसाधारण गुणवत्तेचा असावा. आकारामध्ये काही प्रमाणात सवलत , फळाचे वजन अ, ब,क प्रतवारीनुसार असले पाहिजे |
अ.क्र. | बाब | मध्यपूर्व देश | नेदरलँड्स / जर्मनी | यु.के. |
१ |
वजन |
२००-२५०ग्रॅम |
२००-३०० ग्रॅम |
२००-२५० ग्रॅम |
२ |
पॅकिंग |
१ डझन (२.५ कि.ग्रॅॅ किंवा जास्त) |
१ डझन (२.५ कि.ग्रॅ) |
१ डझन (२.५ कि.ग्रॅ) |
३ |
साठवनुक(तापमान ) |
१० अंश से.ग्रे. |
१३ अंश से.ग्रे. |
१३ अंश से.ग्रे. |
४ |
निर्यात मार्ग |
जहाज मार्ग |
विमान मार्गे |
जहाज मार्ग/
|
निर्यातक्षम अांब्याच्या उत्पादनाकरिता शेतक-यांनी घ्यावयाची काळजी
- आंब्यावरील प्रमुख किडी व रोगांचे प्राथमिक अवस्थेत नियंत्रण करावे. त्यामुळे फळांचा दर्जा खराब होत नाही व उर्वरित अंश मर्यादेत ठेवता येते.
- फळांचा दर्जा हा वजन ,आकार व रंग यावर ठरविला जात असल्याने अशा दर्जाची फळे जास्तीतजास्त उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रीत करावे.
- विशेषत: फळमाशी व स्टोनव्हीवील या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घ्यावी व एकात्मिक किंड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करावा.
- साक्याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने हापूस आंब्यात होतो त्याकरिता सुक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. तसेच आंबे २ टक्के मिठाच्या पाण्याच्या द्रावणांत बुडवल्यास जो आंबा पाण्यावर तरंगतो, असा आंबा बाजुला काढ़ावा.
- युरोपियन देशांना आंबा निर्यात करावयाचा झाल्यास उर्वरित अंश तपासून घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या पुणे येथील किडनाशक उर्वरित अंश प्रयोगशाळेत तपासणीच्या सुविधा उपलब्ध आहेत.
- आयातदार देशाच्या मागणीनुसार आंब्याची प्रतवारी करणे आवश्यक आहे.
फळाच्या आकारानुसार वर्गवारी
आकार गट | वजन ( ग्रॅममध्ये | जास्तीत जास्त वजनातील फरक |
अ |
२००-३००- |
७५ |
ब |
३५१-५५० |
१०० |
क |
५५१-८००- |
१२५ |
गुणवत्तेत सुट मर्यादा : विशेष दर्जा ५ टक्के, वर्ग-१ साठी १० टक्के, व वर्ग-२ साठी १o टक्के आकारामध्ये सुट मर्यादा : सर्व वर्गाच्या आंब्याकरीता १० टक्के सवलत. कमीतकमी १८o ग्रॅम व जास्तीतजास्त ९२५ ग्रॅम अांब्याचे वजन असणे आवश्यक .
आंबा काढणीपूर्व व्यवस्थापन
- आंबा फळांना आकर्षक रंग येण्यासाठी झाडांच्या आतील भागांची विरळणी करावी. जेणेकरून सुर्यप्रकाश आतील फळांवर पडेल.
- फळांचा आकार वाढविण्यासाठी तसेच त्यांना तजेलदार व आकर्षक रंग येण्यासाठी फळे अंडाकृती झाल्यावर आणि कोय (बाष्ठा) तयार होण्याच्या अवस्थेत असतांना २ टक्के युरीया व १ टक्के पोटॅशची फवारणी करावी. फलधारणा झाल्यावर ज्या ठिकाणी पाण्याची सोय असेल अशा ठिकाणी १५ दिवसांनी ३ ते ४ वेळा पाणी द्यावे. (१५० ते २०० लिटर) परंतु फळे तोडणीच्या एक महिना अगोदर पाणी देणे बंद करावे.
- फळे काढणीपुर्वी किमान तीन आठवडे अगोदर कोणत्याही किटकनाशकाची अथवा बुरशीनाशकाची फवारणी करू नये.
- ज्या ठिकाणी फळे घोसाने येतात त्या ठिकाणी शक्य असल्यास दोन फळांमध्ये सुकलेले आंब्याचे पान ठेवावे तसेच मोहराच्या शेंडयाकडील फळावर घासणारे टोक कापून टाकावे. फळांचा आकार वाढविण्यासाठी शक्यतो प्रत्येक घोसावर एकच फळ ठेवावे.
सन २०१४-१५ पासून युरोपीयन व इतर देशांना आंबा निर्यातीकरीता फळमाशी व किडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाची हमी देण्याकरिता द्राक्षाप्रमाणेच मॅगोनेट या ऑनलाईन कार्यप्रणालीची अपेडाच्या मार्गदर्शनाखाली अवलंबविण्यात येत आहे.
निर्यातक्षम अांबा उत्पादक शेतक-यांची नोंदणी करण्याकरिता मॅगोनेटचा अवलंब करण्यात येणार आहे. त्याकरीता सन २0१५-१६ या वर्षांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, पालघर, अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, बीड व जालना या जिल्ह्यांकरिता तो अवलंबविण्यात येत आहे.
मॅगोनेटच्या अंमलबजावणी करिता सविस्तर मार्गदर्शक सुचना सर्व संबंधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना कळविण्यात आल्या अधिक्षक कृषि अधिकारी यांचेकडे नोंदणी करण्याकरिता कळविण्यात आले आहे.
आंब्याच्या निर्यातीकरिता काढणीपश्चात व्यवस्थापन
- काढणीसाठी १४ आणे (८५ टक्के) तयार आंबा निवडावा.
- फळाची काढणी सकाळी ११ वाजेपर्यंत किंवा सायंकाळी ४ वाजल्यानंतर कमी तापमानात करावी.
- काढणीनंतर फळे कमी तापमानात ठेवावीत.
- काढणी देठासहीत (३ ते ५ सें.मी.) करावी.
- काढणीनंतर कमीतकमी वेळा (६ तास) आंब्याची पॅकींगपुर्व हाताळणी प्लॅस्टीक आवेष्टनातून करावी.
- आंब्यामध्ये एकूण विद्राव्य घटक (टी एस एस) ८.१० टक्के असला पाहिजे.
- काढणी आणि वाहतूक करताना फळांची कमीतकमी हाताळणी करावी. त्या करीता प्लॅस्टीक क्रेट्सचा वापर करावा.
- काढलेल्या आंब्याचा ढिगारा न करता आणि आदळआपट न करता ते पेटीत भरावेत. कारण आदळ आपट केल्याने आंब्याच्या आतील भागाला इजा होवून फळ पिकण्याऐवजी सडण्याची प्रक्रिया जास्त होते.
- उन्हात वाहतूक केल्यास हापूस आंब्यामध्ये साक्याचे प्रमाण
- प्री-कुलींगला योग्य प्रकारे आल्यानंतर बॉक्सेसची मांडणी ११0 से.मी. x ८0 सें.मी. × १३ सें.मी. लाकड़ी प्लेंटफॉर्मवर करून त्यास आवेष्टीत करावे. कोल्ड स्टोअरेजचे तापमान १२.५ अंश से. ग्रे. ठेवावे.
- खालील द्रावणात आंबे पाच मिनिटे बुडवून ठेवावेत. आंबा फळे पिकताना कुजू नयेत म्हणून फळांना कार्बन्डॅझिमची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यासाठी १o लिटर पाण्यात १0 ग्रॅम काबॅन्डॅझिमचे द्रावण घेऊन प्रक्रिया करावी. त्यात बिनडागी, न कुजलेले, १४ आणे तयार झालेले व वजनानुसार प्रतवारी केलेले आंबे ५ मिनिटे बुडवून ठेवावेत नंतर अमेरिकेस आंबा निर्यातीकरिता कृषि पणन मंडळाच्या पॅकहाऊसकडे आंबा उत्पादकांची नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा नोंदणी केलेल्या आंबा उत्पादकांचा आंबा वि-किरण (इरॅडीकेशन) करण्याकरिता लासलगाव येथे सुविधा निर्माण केलेल्या आहेत. तेथे वि-किरण केल्यानंतरच आंबा फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्यात येते. सध्या फळे व भाजीपाला या पिकांची निर्यात प्रामुख्याने व्यापा-यांव्दारेच केली जाते. परंतू द्राक्ष, डाळींब, भाजीपाला व आंबा इ.
फळे व भाजीपाला उत्पादीत माल स्वत: शेतकरी निर्यात करण्याबाबत उत्सुक आहेत. त्याकरिता आंबा उत्पादक शेतक-यांनी द्राक्षाप्रमाणेच आंब्याची स्वतः निर्यात सुरू केल्यास निश्चित त्याचा फायदा आंबा उत्पादकांना होणार आहे.
भागीदारी संस्थांच्या कर्तव्य व जबाबदा-या कशासाठी
युरोपियन देशांना आंबा उत्पादन व निर्यातीकरीता मॅगोनेट भागीदारी संस्थांच्या कर्तव्य व जबाबदा-या मॅगोनेट कशासाठी
- प्रत्येक देशाचे स्वत:चे सर्वसाधारण स्वच्छतेविषयक तसेच पिकविषयक निकष आहेत.
- जागतीक व्यापार संघटनेच्या प्रत्येक सभासद निर्यातदार देशांना सर्वसाधारण स्वच्छतेविषयक व पिकस्वच्छते विषयक नियम पाळणे बंधनकारक आहे.
- युरोपीयन युनियनने भारतातून आयात होणा-या कृषिमालावर जिवंत किडींचा आढळ झाल्याने आंबा व काही भाजीपाल्यांच्या भारतातून होणा-या आयातीवर बंदी घातली.
- मॅगोनेट प्रणालीमध्ये आंब्याचा संपुर्ण पुर्वइतिहास (ट्रेसेबिलीटी) उपलब्ध असल्याची आयात देशांना खात्री देणे आवश्यक आहे. (उत्पादन ते अंतिम ग्राहकापर्यंत)
- मॅगोनेटमध्ये उत्पादनपूर्व साखळीचे टप्पे जोडण्याची पुर्तता करणे, म्हणजेच
- बागांची नोंदणी
- शेतकरी प्रशिक्षण
- बागांची तपासणी
- पीक संरक्षण अभिलेख ठेवणे आवश्यक आहे.
त्यामुळे आयातदार देशांच्या गरजांची/मागणीची पुर्तता होण्यास मदत होते.
उद्दिष्टे
- बागेच्यास्तरावर/शेतस्तरावर निर्यातक्षम आंब्यावरील किडनाशकांचा उर्वरित अंश नियंत्रण विषयक यंत्रणा उभारणे.
- आंबा बागेतील जमिनीमधील तसेच पाण्यातील किडनाशकांचा उर्वरित अंश नियंत्रण करणे.
- कोड व रोग व्यवस्थापनासाठी सर्वेक्षण यंत्रणा उभारणे.
- क्रारंटाईन कोड व रोग आढळल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा उभारणे.
- किडनाशक उर्वरित अंश प्रकरणी धोक्याची सुचना प्राप्त झाल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे.
- भारतातून युरोपीयन युनियन व इतर देशांना निर्यात होणारा आंबा हा कोड व रोगमुक्त असल्याची हमी देणे.
भागीदार संस्था (Stakeholders)
अपेडा (कृषि व प्रक्रिया पदार्थ निर्यात विकास संस्था).
- राष्ट्रीय पीकसंरक्षण संस्था (एनपीपीओ).
- फलोत्पादन विभाग
- कृषि विद्यापीठे
- निर्यातदार
- आबा बागायतदार
- अधिकृत पॅकहाऊस
- प्रक्रियादार
- किडनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा
भागीदार संस्थांच्या कर्तव्य व जबाबदान्या
अपेडा (APEDA)
- आंबा निर्यात करू इच्छिणा-या शेतक-यांच्या बागांची नोंदणी करण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे.
- नोंदणी केलेल्या शेतक-यांकडील निर्यात झालेल्या बागांची माहिती ठेवणे.
- बागांच्या नोंदणीसाठी राज्य शासनाशी समन्वय ठेवणे.
- उत्पादनपुर्व प्रक्रियांची साखळीचे सशक्तीकरण करण्यासाठी विकसित करणे.
- नोदणी केलेल्या बागांचे/शेतक-यांचे अभिलेख तपासणे.
राष्ट्रीय पीकसंरक्षण संस्था (NPPO)
- नोंदणीकृत शेतकरी/बागा यांचे अभिलेख वेळोवेळी तपासणीसाठी अपेडा व राज्यशासन यांच्याशी सहकार्य ठेवणे.
- नोंदणीकृत शेतांमधून / शेतक-यांकडून माल घेऊन अधिकृत पॅकहाऊसमध्येच फळे हाताळली जात असल्याची खात्री करून देणे.
- क्षेत्रियस्तरावर युरोपियन युनियनसाठी महत्वाच्या असलेल्या किडी व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत राज्यशासनास मार्गदर्शन करणे/ सल्ला देणे.
- युरोपीयन युनियनकडून किडींचा आढळ झाल्याबध्दल प्राप्त होणारा करण्यासाठी पोहचविणे.
- आंबा युरोपीयन युनियनला निर्यात करताना आवश्यक असलेल्या उष्णबाष्प प्रक्रिया इ. प्रक्रियांना मान्यता देणे/ मान्यतेचे नूतनीकरण करणे.
- प्रक्रिया संबंधिचे निकष ठरविणे.
फलोत्पादन विभाग-राज्यशासन (State Horticulture Department)
- आंबा निर्यातदार/शेतक-यांच्या विनंतीनुसार युरोपीयन युनियनला नोंदणी करणे.
- आंबा बागांची नोंदणी एक हंगाम/ एक वर्ष कालावधीसाठी करणे.
- नोंदणी केलेल्या शेतामध्ये कोड व रोगांचा प्रादुर्भाव स्थिती नियंत्रणात असल्याबाबत व शेतस्तरावर किडनाशक वापराचे अभिलेख ठेवण्याबाबत नियमीतपणे सनियंत्रण करणे.
- संबंधित नोंदणीकृत बागेमधील कोड व रोगांच्या नियंत्रणासाठी सुयोग्य सल्ला देणे. ५) पीक लागवडीपासून काढणीपर्यंत पीक व्यवस्थापन पध्दतींचे अभिलेख
शेतस्तरावर ठेवले असल्याबाबत सनियंत्रण करणे. ६) कोड व रोगमुक्त फळ उत्पादनासाठी शेतक-यांचे प्रशिक्षण आयेजीत करणे. ७) एकात्मिक कोड व्यवस्थापन/ उत्तम शेतीच्या पध्दती अंतर्गत निविष्ठा उदा. सापळे, जैविक किडनाशके शेतक-यांना उपलब्ध होत असल्याची खात्री करणे
कृषि विद्यापीठे (SAU's)
- शेतकरी आणि निर्यातदार यांच्या क्षमतावाढ कार्यक्रमामध्ये राज्यशासनास मदत करणे.
- उत्पादन तंत्रज्ञान आणि एकात्मिक कोड व्यवस्थापन याबाबत सल्ला देणे.
- शेतकरी आणि विस्तार अधिकारी यांच्यासाठी स्थानिक भाषेत तांत्रीक प्रशिक्षण साहित्य तयार करणे.
- कोड आणि रोगमुक्त फळांच्या उत्पादनासाठी शेतक-यांना प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमात मदत करणे.
- दर्जेदार उत्पादनासंबंधी क्षेत्रियस्तरावरून प्राप्त होणा-या प्रतिक्रियांवर कार्यवाही करणे.
निर्यातदार
- निर्यातक्षम आंबा उत्पादन घेणा-या शेतक-यांच्या बागा नोंदणीसाठी फलोत्पादन विभागास विनंती करणे.
- आंबा बागायतदार, त्यांची नोंदणी करणे, त्यांचे क्षेत्र व पत्ता आणि विभागास माहिती पुरविणे.
- निर्यातीसाठी नोंदणी केलेल्या शेतक-यांकडून माल घेणे.
- निर्यातीसाठी कोड व रोगमुक्त मालासाठी नोंदणीकृत शेतक-यांना तांत्रिक सहाय्य पुरविणे.
- प्रत्येक निर्यातीवेळी शेताचा नोंदणी क्रमांक पॅकहाऊसला पुरविणे.
- निर्यात करावयाच्या कृषिमालामध्ये अनोंदणीकृत मालाची भेसळ न करता पॅकहाऊसपर्यंत पेोहचविण्यासाठी मालाच्या सुरक्षित वाहतुकीची हमी देणे.
आंबा बागायतदार
- निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यासाठी फलोत्पादन विभागास विनंती करणे.
- दर पंधरवाडयास नोंदणीकृत शेतावर कोड व रोगस्थिती नियंत्रित ठेवणे तसेच लागवडीपासून काढणीपर्यंत कीड-रोग नियंत्रण करण्यासाठी केलेल्या पिक संरक्षण उपाययोजनेचे अभिलेख ठेवणे.
- नोंदणीकृत शेतावर लागवडीपासून काढणीपर्यंत केलेल्या व्यवस्थापन विषयक उपाययोजनांचे अभिलेख ठेवणे.
- कृषि विद्यापीठ, फलोत्पादन, निर्यातदार यांनी दिलेल्या कोड व रोग व्यवस्थापन पध्दती, किडनाशकांचा उर्वरित अंशासंबंधिचा प्रतिक्षाधिन कालावधी याबाबत दिलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करणे.
अधिकृत पॅक हाउस (Apporoved Packhoues)
- फक्त नोंदणीकृत शेतावरील माल स्विकारणे.
- प्रत्येक निर्यातीच्यावेळी स्विकृत माल, शेतक-याचे नाव, नोंदणी क्रमांक , याबाबत अभिलेख ठेवणे
उपचार प्रदाता
- प्रक्रिया सुविधेच्या मान्यतेसाठी किंवा मान्यतेच्या नुतनिष्करणासाठी राष्ट्रीय पीक संरक्षण संस्थेकडे अर्ज करणे.
- नोंदणीकृत शेतावरील प्राप्त मालावरच प्रक्रिया करणे.
- राष्ट्रीय पिक संरक्षण संस्थेने अधिकृत केलेल्या पध्दतीनुसार प्रक्रिया करणे.
- प्रत्येक प्रक्रिया संबंधिची माहिती, प्रक्रिया कालावधीतील तापमान, निर्यातदाराचे नाव, प्रक्रिया केलेल्या कृषि मालाचे वजन इ. बाबत अभिलेख ठेवणे.
- निर्यातदारास प्रक्रिया प्रमाणपत्र देणे.
किडनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा (Pesticide Residue Laboratories)
- किडनाशक उर्वरित अंश तपासणी सुविधेच्या मान्यतेसाठी किंवा मान्येतेच्या नुतनिष्करणासाठी कृषि व प्रक्रिया पदार्थ निर्यात विकास संस्था (अपेड़ा) यांच्याकडे अर्ज करणे.
- आंबा फळावरील किडनाशके उर्वरित अंश तपासणीसाठी नोंदणीकृत आंबाबागेतून नमुने घेणे.
- तपासणी केलेल्या नमुन्यांचे अभिलेख ठेवणे.
- युरोपीयन युनियनच्या आयातीविषयक निकषांनुसार प्रयोगशाळेतील सुविधा अद्यावत ठेवणे.
- आंबा निर्यातदार/ उत्पादक यांना किडनाशके उर्वरित अंश तपासणी अहवाल देणे.
- तपासणीमध्ये किडनाशके उर्वरित अंश मान्य महत्तम उर्वरित अंश पातळीपेक्षा जास्त आढळल्यास त्याबाबतची सुचना निर्गमित करणे.
अवलंब करावयाची पध्दती (Procedure for implementation)
- आंबा निर्यातदार/ उत्पादक आपल्या निर्यातक्षम बागेच्या नोंदणीसाठी विहित प्रपत्रात (प्रपत्र-अ) फलोत्पादन विभागास विनंती करील.
- फलोत्पादन विभाग नोंदणीकृत अर्जामधील माहितीची सत्यता पडताळणी करेल.
- फलोत्पादन विभाग नोंदणी केलेल्या आंबा बागांचे नोंदणी प्रमाणपत्र विहित प्रपत्रात (प्रपत्र-ब) अर्जदार शेतकरी/ निर्यातदार यांना निर्गमीत करेल.
- नोंदणीकृत आंबाबागांची यादी फलोत्पादन विभागास कृषि व प्रक्रिया पदार्थ निर्यात विकास संस्था यांना राष्ट्रीयस्तरावर नेोंद घेण्यासाठी सादर करील.
- फलोत्पादन विभागास नोदणी केलेल्या शेतक-यांची कोड व रोगमुक्त आंबा उत्पादनासाठी प्रशिक्षण आयोजीत करेल.
- फलोत्पादन विभाग दर पंधरवड्यास नोंदणीकृत आंबा बागांमधील कोड व रोगांची स्थिती योग्य असल्याची खात्री करेल तसेच लागवडी पासून काढणी पर्यंत नोंदणीकृत शेतावर अवलंब केलेल्या पीक संरक्षण उपाययोजनांचे अभिलेख ठेवल्याची खात्री करेल (प्रपत्र-क)
- निर्यातदार फक्त नोदणी केलेल्या या फळांची शेतावरून पॅकहाऊसपर्यंत कोणत्याही अनोंदणीकृत शेतावरील फळांची { भेसळ न होऊ देता सुरक्षित वाहतुक करेल. शेताचा नोंदणी क्रमांक व फळांचा लॉट क्रमांक ही माहिती निर्यातदार पॅकहाऊसला पुरवेल.
- नोंदणीकृत बागेमधून उत्पादन स्विकारल्यानंतर पॅकहाऊसधारक प्रत्येक वेळी स्विकृत मालांचे वजन, शेतक-यांचे नाव आणि नोंदणी क्रमांक याबाबतचे अभिलेख ठेवेल.
- ज्या निर्यातक्षम मालाला विशेष प्रक्रियेची आवश्यकता आहे आणि अशी प्रक्रिया संबंधित पॅकहाऊसवर उपलब्ध नसल्यास अशा मालांच्या सुरक्षित व सचोटीयुक्त वाहतुकीची जबाबदारी संबंधित निर्यातदारांची राहील.
- राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था माल नोंदणीकृत बागेतून प्राप्त झाल्याची सत्यता पडताळणी करेल. त्यानंतर त्या मालावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी आणि फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र अदा करण्याची अनुमती देईल.
आंबा निर्यातीकरिता प्रामुख्याने खालील कागदपत्र असणे आवश्यक आहे.
- प्रोप्रायटरी फर्म/संस्था/कंपनी स्थापन करणे.
- ज्या नावाने आंबा निर्यात करावयाचा आहे त्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत चालू खाते उघडणे.
- प्रोप्रायटरी फर्मच्या नांवे पॅन नंबर काढणे.
- प्रोप्रायटरी फर्मच्या नांवे आयात-निर्यात कोड नंबर (आयईसी) काढणे. सदरचा कोड डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेड (डीजी अॅन्ड टी) विभागामार्फत दिला जातो.
- अपेडा ही निर्यातीला प्रोत्साहन देणारी संस्था असुन त्यांच्याकडे नोंदणी करणे.
अपेडा ही वाणिज्य मंत्रालय अंतर्गत निर्यातीला प्रोत्साहन देण्याकरिता स्थापना केलेली संस्था आहे. अपेडाचे सभासद झाल्यामुळे अपेडाच्या वेबसाईटवर आपली आंबा उत्पादन निर्यातदार म्हणून नोंदणी केली जाते.त्याचा फायदा आयातदाराची निवड करण्याबरोबरच निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठीच्या अर्थसहाय्य योजनाचा लाभ घेण्यासाठी होतो. तेव्हा जास्तीतजास्त आंबा उत्पादकांनी स्वत: उत्पादित केलेल्या आंब्याची स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठेतील संधीचा फायदा घेण्यासाठी विक्री व निर्यातीचा फायदा घेणे आवश्यक आहे. तसेच सध्या प्रमुख आयातदाराचा कल हा ट्रेडर एक्सपोर्टर ऐवजी उत्पादक व निर्यातदाराकडुन घेणे आवश्यक आहे. आंब्याच्या निर्याकरीता फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्याकरिता
पीक्यूआयएस द्वारे ऑनलाईन सुविधा मुंबई एअरपोर्ट व सिपोर्ट तसेच पुणे,नाशिक, व सिंधुदुर्ग येथील जिल्हा अधिक्षक उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्याकरीता प्रथम निर्यातदारांनी साईटवर लॉगीन आयडी पासवर्ड नोंदणी करणे आवश्यक आहे.
सन २0१५-१६ मध्ये मॅगोनेट प्रणालीवर नोदणी केलेल्या आंबाबागांचा जिल्हानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
अ. क्र. | जिल्हा | एकूण नोदणी केलेल्या आंबाबागांची संख्या |
१ |
ठाणे |
21 |
२ |
पालघर |
172 |
३ |
रायगड |
968 |
४ |
रत्नागिरी |
2581 |
५ |
सिंधुदुर्ग |
1737 |
६ |
नाशिक |
5 |
७ |
अहमदनगर |
34 |
८ |
पुणे |
32 |
९ |
सोलापूर |
61 |
१० |
कोल्हापूर |
17 |
११ |
सातारा |
6 |
१२ |
सांगली |
16 |
१३ |
औरंगाबाद |
16 |
१४ |
बीड |
2 |
१५ |
जालना |
4 |
१६ |
लातूर |
12 |
१७ |
उस्मानाबाद |
19 |
१८ |
बुलढाणा |
15 |
१९ |
नांदेड |
11 |
|
एकूण |
5729 |
अशा प्रकारे शेतकरी बंधूनी मॅगोनेट प्रणालीचा अवलंब करून जास्तीतजास्त आंबा फळांची निर्यात करावी .
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
http://mahaagri.gov.in/Publications/Shetkari.aspx